साईमत न्यूज नेटवर्क – बिहारमधील बिहार राज्यातील बरह जिल्ह्यातून एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. आज पहाटे बरहमधील प्रसिद्ध उमानाथ गंगा घाटावर प्रवाशांनी भरलेली बोट अचानक उलटून मोठा अपघात झाला. या दुर्घटनेत आतापर्यंत दोघांचा मृत्यू झाला असून पाच जण अद्याप बेपत्ता आहेत. सात जणांना स्थानिक नागरिक आणि बचाव पथकाच्या मदतीने सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पहाटेच्या सुमारास सुमारे १४ प्रवाशांना घेऊन ही बोट दियारा भागाकडे निघाली होती. नदीच्या मध्यभागी पोहोचताच बोटीचा अचानक तोल गेला आणि काही क्षणांतच ती गंगा नदीत उलटली. बोट उलटताच प्रवाशांमध्ये मोठा गोंधळ उडाला आणि मदतीसाठी आरडाओरड सुरू झाली. घाटाजवळ उपस्थित स्थानिक नागरिकांनी तत्काळ…
Author: saimat
साईमत न्यूज नेटवर्क – राजस्थानातील अजमेर जिल्ह्यात गुरुवारी पहाटे एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली. श्रीरामपुरा गावाजवळ धावत्या कारला अचानक आग लागून एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच होरपळून मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून गावकऱ्यांमध्ये तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना बोराडा पोलीस ठाणे हद्दीत पहाटे सुमारे साडेपाचच्या सुमारास घडली. माजी सरपंच रामसिंह चौधरी हे आपल्या कुटुंबासोबत आई पूसी देवी यांना उपचारासाठी रुग्णालयात घेऊन जात होते. पूसी देवी यांना छातीत दुखत असल्याने तातडीने वैद्यकीय मदतीसाठी त्यांना शहराकडे नेले जात होते. मात्र, रुग्णालय गाठण्यापूर्वीच काळाने त्यांच्यावर घाला घातला. प्रवासादरम्यान कारला अचानक आग लागली. काही क्षणांतच आग…
आईला वाचवायला गेलेल्या मुलांवर काठीने बेदम मारहाण साईमत/रावेर / प्रतिनिधी : शेतातील रस्त्याच्या वापरावरून झालेल्या किरकोळ वादाने उग्र रूप धारण करत एका वृद्ध शेतकरी महिलेवर तसेच तिच्या दोन मुलांवर प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना रावेर तालुक्यातील आभोडा बुद्रुक शिवारात उघडकीस आली आहे. या प्रकरणामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, रावेर पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुमित्राबाई लक्ष्मण महाजन (वय ६५, रा. रसलपूर, ता. रावेर) या २७ मे रोजी सकाळी सुमारे १०:३० वाजता आभोडा बुद्रुक शिवारातील शेताच्या रस्त्याने जात असताना रस्ता वापरण्याच्या कारणावरून वाद निर्माण झाला. या वादातून गोपाल सोनजी महाजन, दीपक गोपाल महाजन (दोघेही रा.…
तरुणीला पाण्यातून गुंगीचे औषध १० जणांविरुद्ध गंभीर गुन्हा दाखल साईमत/रावेर / प्रतिनिधी : तालुक्यातील एका गावातील तरुणीला गुंगीचे औषध देऊन अपहरण करण्यात आल्याची, त्यानंतर पुणे जिल्ह्यातील आळंदी येथे नेऊन तिच्याशी जबरदस्तीने विवाह लावण्यात आल्याची आणि तिच्यावर अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात मुख्य आरोपीसह १० जणांविरोधात गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले असून, पोलिसांनी मध्य प्रदेशातील एका शिक्षकाला अटक केली आहे. इतर आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. पीडित तरुणी ही नेहमीप्रमाणे शिक्षणासाठी रावेर येथे जात असताना संशयित आरोपी आदित्य राजू महाजन याने तिला रस्त्यात अडवले. “तुझ्याशी काही महत्त्वाचे काम आहे,” असे सांगत आरोपीने…
अमळनेर तालुक्यात महसूल-पोलिसांची धडक कारवाई; १,४७० लिटर डिझेलसह पोकलेन, डंपर आणि बोटी जप्त साईमत/अमळनेर/ प्रतिनिधी : खरीप हंगामाच्या तोंडावर डिझेल टंचाईमुळे शेतकरी अक्षरशः हवालदिल झाले असताना दुसरीकडे वाळू माफियांच्या डेपोमध्ये हजारो लिटर डिझेलचा साठा आढळून आल्याने जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे. अमळनेर तालुक्यातील सावखेडा गावाजवळ तापी नदी पात्रात महसूल विभाग आणि पोलिसांनी संयुक्त धडक कारवाई करत तब्बल १ हजार ४७० लिटर डिझेल जप्त केले. या डिझेलची अंदाजे किंमत १ लाख ५५ हजार रुपये असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. गोपनीय माहितीच्या आधारे २७ मे रोजी दुपारी महसूल व पोलीस प्रशासनाचे संयुक्त पथक तापी नदीकाठावरील वाळू डेपो परिसरात दाखल झाले. उपविभागीय दंडाधिकारी…
सुपारी बाग परिसरात २२ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृतदेह आढळला साईमत/जामनेर / प्रतिनिधी : जळगाव जिल्ह्यातील जामनेर शहरात बुधवारी सकाळी घडलेल्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. सुपारी बाग परिसरातील निर्जन भागात एका २२ वर्षीय तरुणाचा संशयास्पद अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. रितेश उर्फ समा पन्नालाल बोरसे असे मृत तरुणाचे नाव असून तो मंगळवारी संध्याकाळपासून बेपत्ता होता. रात्री उशिरापर्यंत कुटुंबीय आणि मित्रांनी त्याचा शोध घेतला, मात्र तो सापडला नाही. अखेर बुधवारी सकाळी सुपारी बाग परिसरात त्याचा मृतदेह आढळून आल्याने ही बाब उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच परिसरात नागरिकांची मोठी गर्दी झाली. मृताच्या नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेत आक्रोश केला. पोलिसांनी…
मित्रांना वाचवताना जीव गमावला एमएसएफ जवानाचा दुर्दैवी अंत साईमत/यावल/ प्रतिनिधी : यावल तालुक्यातील दहिगाव येथील महाराष्ट्र सुरक्षा बलातील (एमएसएफ) जवानाचा चंद्रपूर येथील तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. विजय ओंकार काळे (वय ३४) असे मृत जवानाचे नाव असून, त्यांच्या निधनाने संपूर्ण दहिगाव परिसरात शोककळा पसरली आहे. विशेष म्हणजे, केवळ आठवडाभरात गावातील दुसऱ्या तरुणाच्या मृत्यूची ही घटना असल्याने गाव अक्षरशः शोकसागरात बुडाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दहिगाव येथील सुरेश आबा नगरातील रहिवासी असलेले विजय काळे हे मागील चार वर्षांपासून चंद्रपूर येथे महाराष्ट्र सुरक्षा बलात (एमएसएफ) कार्यरत होते. दिनांक २६ रोजी दुपारी सुमारे तीन वाजेच्या सुमारास ते आपल्या दोन…
बिलाडी शिवारात धक्कादायक घटना; कानाजवळून गोळी गेल्याने मोठा अनर्थ टळला नंदुरबार तालुक्यातील बिलाडी शिवारात उधारीचे पैसे परत न दिल्याच्या व शेतातील काम सोडल्याच्या कारणावरून एका मजुरावर बंदुकीने गोळी झाडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, संशयित आरोपीविरुद्ध नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, माळीवाडा येथील रहिवासी पप्पू ऊर्फ संजय आनंदा वाघ (माळी) याचे बिलाडी शिवारात शेत आहे. एकतानगर येथील संजय मन्साराम ठाकरे हा त्याच्या शेतात मजुरीचे काम करत होता. दरम्यान, ठाकरे यांनी संजय माळी यांच्याकडून काही रक्कम उसने घेतली होती. ही रक्कम परत न करणे तसेच शेतातील काम सोडणे या…
२३० प्रवासी सुखरूप; सुरक्षेच्या कारणास्तव परतवले विमान दिल्लीहून सॅन फ्रान्सिस्कोला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने मोठी घटना टळली आहे. उड्डाणानंतर तब्बल आठ तास हे विमान आकाशात घिरट्या घालत राहिले आणि अखेरीस सुरक्षेच्या कारणास्तव ते पुन्हा दिल्ली विमानतळावर सुरक्षितपणे उतरवण्यात आले. या विमानात एकूण २३० प्रवासी आणि क्रू सदस्य होते. अचानक उद्भवलेल्या तांत्रिक समस्येमुळे विमानाच्या पुढील प्रवासाबाबत धोका निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन पायलटने तातडीने निर्णय घेत विमान माघारी वळवले. एअर इंडियाच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, “दिल्ली–सॅन फ्रान्सिस्को विमानात तांत्रिक बिघाड झाल्याचे लक्षात येताच ते अर्ध्या मार्गातून परत आणण्यात आले. विमान दिल्लीत सुरक्षितपणे उतरवण्यात आले असून, बिघाडाचे कारण तपासले जाणार…
लोखंडी रॉड, काठ्यांनी हल्ला २२ जणांवर गुन्हे साईमत/पारोळा/ प्रतिनिधी : तालुक्यातील भोलाणे येथे जुन्या शिवीगाळ व मारहाण प्रकरणात दाखल गुन्हा मागे घेण्यास नकार दिल्याच्या कारणावरून दोन गटांत तुंबळ हाणामारी झाल्याची गंभीर घटना घडली आहे. या प्रकरणात दोन्ही बाजूंनी परस्पर तक्रारी दाखल करण्यात आल्या असून एकूण २२ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. प्राप्त माहितीनुसार, भूषण अधिकार पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, रविवारी ते घराच्या ओट्यावर बसले असताना भोलाणे येथील हितेश पाटील, हर्षल पाटील, मोहीत पाटील, ललित पाटील, शुभम पाटील, अजय पाटील आणि नरेश पाटील यांनी लोखंडी रॉड, काठ्या व बॅट…