Author: saimat

दहा दिवसांत चौथ्यांदा दरवाढ; भाजीपाला, किराणा, दूध आणि वाहतूक खर्चात मोठी वाढ साईमत न्यूज नेटवर्क – राज्यात मागील दहा दिवसांत चौथ्यांदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाल्याने सर्वसामान्य नागरिकांचे मासिक बजेट कोलमडू लागले आहे. इंधन दरवाढीचा थेट परिणाम वाहतूक खर्चावर होत असून, त्यातून भाजीपाला, फळे, दूध, किराणा, खाद्यतेल, गॅससह जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. परिणामी घरगुती खर्चात महिन्याला दीड ते दोन हजार रुपयांची भर पडत असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या १५ मे रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रत्येकी तीन रुपयांची वाढ करण्यात आली होती. त्यानंतर १९, २३ आणि २५ मे रोजीही इंधन दरात वाढ करण्यात…

Read More

साईमत न्यूज नेटवर्क – इगतपुरी तालुक्यातील घोटीवाडी परिसरात विजेच्या खांबाला स्पर्श झाल्याने एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. मुख्य वीजवाहिनीचा प्रवाह उतरलेल्या खांबाला धक्का लागल्याने हा अपघात झाला असून या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. राजेंद्र अशोक भगत (वय ४०, रा. घोटीवाडी, ता. इगतपुरी) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, घोटीवाडी परिसरात आवादा ग्रीन प्रोजेक्ट या खासगी ठेकेदारामार्फत वीज वितरण कंपनीकडून नवीन विद्युत वाहिनीचे काम सुरू होते. या कामांतर्गत मुख्य वीजवाहिनीचे खांब उभारण्यात आले होते. मात्र, सुरक्षेची आवश्यक काळजी न घेता वीजवाहिनी सुरू करण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. मंगळवारी (दि. २६) पहाटेच्या सुमारास…

Read More

घरात घुसून धारदार शस्त्राने हल्ला; आरोपी फरार, पोलिसांकडून शोधमोहीम सुरू साईमत न्यूज नेटवर्क – डोंबिवलीतील खंबाळपाडा परिसरात घर बांधकामाच्या वादातून एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शेजारी राहणाऱ्या तरुणाने घरात घुसून धारदार शस्त्राने हल्ला करत ही हत्या केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेनंतर आरोपी फरार झाला असून पोलिसांकडून त्याचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, डोंबिवलीच्या खंबाळपाडा परिसरात प्रताप चौधरी आणि आरोपी रोहित शेलार यांच्यात गेल्या काही दिवसांपासून घर बांधकामाच्या कारणावरून वाद सुरू होता. हा वाद विकोपाला गेल्यानंतर आज दुपारी सुमारे चार वाजण्याच्या सुमारास आरोपी रोहित शेलार याने प्रताप चौधरी…

Read More

महत्त्वाच्या एक्सप्रेस गाड्यांच्या थांब्यासाठी प्रतापराव पाटील यांची रेल्वे प्रशासनाकडे मागणी साईमत/जळगाव/पाळधी/ प्रतिनिधी :  धरणगाव तालुक्यातील पाळधी रेल्वे स्टेशनवर महत्त्वाच्या प्रवासी गाड्यांना थांबा मिळावा यासाठी आता स्थानिक स्तरावरून जोरदार मागणी पुढे येऊ लागली आहे. जिल्हा परिषद व स्थायी समितीचे माजी सदस्य प्रतापराव गुलाबराव पाटील यांनी भुसावळ विभागाच्या रेल्वे प्रशासनाला निवेदन देत पाळधी रेल्वे स्थानकावर काही महत्त्वाच्या एक्सप्रेस गाड्यांना अधिकृत थांबा देण्याची मागणी केली आहे. पाळधी हे परिसरातील नागरिकांसाठी महत्त्वाचे रेल्वे केंद्र मानले जाते. परिसरातील अनेक गावांतील नागरिक, विद्यार्थी, व्यापारी, शेतकरी तसेच नोकरदार वर्ग रेल्वे सेवेवर अवलंबून असून, अनेक प्रवाशांना दररोज जळगाव किंवा भुसावळ येथे जाऊन रेल्वे पकडावी लागते. त्यामुळे वेळेचा अपव्यय…

Read More

१५ लाखांचे ११० मोबाईल नागरिकांना परत साईमत/जळगाव/ प्रतिनिधी :  हरवलेले आणि चोरीस गेलेले मोबाईल शोधून काढण्यासाठी जळगाव जिल्हा पोलिसांनी राबविलेल्या विशेष मोहिमेला मोठे यश मिळाले असून, तब्बल १५ लाख रुपयांहून अधिक किमतीचे ११० मोबाईल शोधून मूळ मालकांच्या ताब्यात देण्यात आले आहेत. आधुनिक सायबर तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करत जिल्हा पोलिसांनी ही उल्लेखनीय कारवाई केली असून, नागरिकांकडून पोलिसांच्या कार्याचे कौतुक होत आहे. जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील विविध पोलीस ठाणे आणि सायबर सेलने समन्वयाने ही मोहीम राबवली. मोबाईल हरविल्यानंतर किंवा चोरीस गेल्यानंतर अनेक नागरिकांना आपला मोबाईल परत मिळण्याची आशा नसते. मात्र, पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण, मोबाईल ट्रॅकिंग आणि सायबर तपासाच्या माध्यमातून हे आव्हानात्मक…

Read More

पावसाळ्यापूर्वी रस्ते दुरुस्तीला वेग; महापालिकेचा निर्णय साईमत/जळगाव/ प्रतिनिधी : जळगाव शहरातील खराब व खड्डेमय रस्त्यांमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांसाठी अखेर दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. महापालिकेकडून शहरातील विविध प्रभागांमधील प्रमुख रस्त्यांच्या दुरुस्तीची व्यापक मोहीम हाती घेण्यात येणार असून, यासाठी प्राधान्यक्रमानुसार रस्त्यांची यादी तयार करण्यात आली आहे. ही कामे उद्या, मंगळवार दि. २६ मे पासून सुरू करण्यात येणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे. शहरातील नागरिकांना सुरक्षित व सुरळीत वाहतुकीची सुविधा मिळावी, यासाठी महापालिकेने हा निर्णय घेतला आहे. विशेषतः पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अपघातांचा धोका वाढत असल्याने ही कामे तातडीने हाती घेण्याची मागणी नागरिकांकडून सातत्याने केली जात होती. त्या पार्श्वभूमीवर ही…

Read More

रेल्वे स्टेशन परिसरात हातगाड्यांवर कारवाई साईमत/जळगाव/ प्रतिनिधी : शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी जळगाव महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने सोमवारी सकाळी मोठी धडक मोहीम राबवत फुले मार्केट, रेल्वे स्टेशन परिसरासह तीन प्रमुख ठिकाणी एकाच वेळी कारवाई केली. या कारवाईत रस्त्यावर अनधिकृतपणे लावलेली हातगाड्या व विविध व्यावसायिक साहित्य जप्त करण्यात आले. ही संयुक्त मोहीम जळगाव महानगरपालिका च्या अतिक्रमण निर्मूलन पथकांनी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत राबवली. तीन स्वतंत्र पथकांच्या मदतीने शहरातील गर्दीच्या भागांमध्ये अचानक कारवाई करत अतिक्रमण हटवण्यात आले. फुले मार्केट परिसरात काही फेरीवाले आणि दुकानदारांनी रस्त्यावरच व्यवसाय थाटल्याने नागरिक आणि मूळ दुकानदारांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. यापूर्वीही या भागात…

Read More

हरिनामाच्या गजरात दिव्य सोहळा; आकर्षक शृंगार, कीर्तन आणि महाप्रसादाने भाविक मंत्रमुग्ध साईमत/जळगाव/ प्रतिनिधी :  शहरातील इस्कॉन मंदिरात रविवारी ‘श्री श्री राधाकृष्ण आंबा महोत्सव २०२६’ अत्यंत भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघाच्या वतीने आयोजित या आगळ्यावेगळ्या महोत्सवात श्री श्री राधाकृष्ण तसेच श्री जगन्नाथ, बलदेव आणि सुभद्रामाई यांचा तब्बल २०० किलो रसाळ आंब्यांनी नयनरम्य शृंगार करण्यात आला. विविध रंग, सुगंध आणि आकारांच्या आंब्यांनी सजलेल्या देवमूर्तींचे विलोभनीय रूप पाहण्यासाठी दिवसभर भाविकांची मोठी गर्दी उसळली होती. उन्हाळ्याच्या दिवसांत आंब्याचा हंगाम आणि भक्तीचा संगम अनुभवायला मिळाल्याने या महोत्सवाला विशेष आकर्षण लाभले. मंदिर परिसर आकर्षक सजावट, फुलांची आरास आणि हरिनामाच्या अखंड गजराने…

Read More

साईमत न्यूज नेटवर्क – मालेगाव (नाशिक ग्रामीण) : नाशिक ग्रामीण पोलिस अधीक्षकांच्या आदेशानंतर स्थानिक गुन्हे शाखेने मालेगाव आणि परिसरात दुचाकी चोरी करणाऱ्या टोळ्यांविरुद्ध मोठी मोहीम राबवत चार आरोपींना अटक केली असून, तब्बल ७ चोरीच्या दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. या कारवाईमुळे शहर व ग्रामीण भागातील अनेक चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मोसम पूल परिसरात गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून दोन संशयितांना ताब्यात घेतले. साद मोहम्मद इरफान (२४, रा. रजा चौक) आणि मोमीन मोहम्मद दानिश (१९, रा. रमजानपुरा) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्या ताब्यातील दुचाकीबाबत विचारणा केली असता सुरुवातीला त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, कसून चौकशीनंतर त्यांनी ती…

Read More

साईमत न्यूज नेटवर्क – सातारा : महाबळेश्वर-पोलादपूर मार्गावरील आंबेनळी घाटात झालेल्या भीषण अपघातात आठ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. भरधाव कारवरील नियंत्रण सुटल्याने ती थेट सुमारे १८०० फूट खोल दरीत कोसळल्याची घटना मध्यरात्री घडली. या दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मृतांपैकी पाच तरुण कोरेगाव तालुक्यातील आसगाव येथील असून दोन जण मर्ढे गावातील तर एक जण खटाव तालुक्यातील असल्याची माहिती समोर आली आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस, स्थानिक बचाव पथके आणि सुरक्षा दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. ही दुर्घटना रात्री साधारणपणे २.४५ वाजण्याच्या सुमारास घडली. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, घाटातील तीव्र वळणावर चालकाचा कारवरील ताबा सुटला आणि वाहन…

Read More