साईमत न्यूज नेटवर्क – नाशिक शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी एसटी महामंडळाकडून मोठा निर्णय घेण्याचे नियोजन सुरू आहे. निमाणी बसस्थानक परिसरात होणारी प्रचंड वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी सुमारे ४०० बस फेऱ्या तपोवन येथील सिटीलिंक बस डेपोतून सुरू करण्याचा विचार केला जात आहे. द्वारका अंडरपासच्या कामामुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल झाले आहेत. सध्या मेळा आणि सीबीएस बसस्थानकांवरील काही बसफेऱ्या पंचवटीतील निमाणी बसस्थानकातून चालवल्या जात आहेत. मात्र अरुंद रस्ते आणि वाढती गर्दी यामुळे या परिसरात दररोज मोठी वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. ही कोंडी कमी करण्यासाठी एसटी महामंडळाने तात्पुरता उपाय म्हणून तपोवन आगार हा पर्याय समोर ठेवला आहे. धुळे, जळगाव…
Author: saimat
साईमत न्यूज नेटवर्क – पंढरपूर-मंगळवेढा रस्त्यावर आरोपींना घेऊन जाणाऱ्या पोलिस व्हॅनचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात पोलिस व्हॅनच्या चालकासह तीन जण गंभीर जखमी झाले असून सर्व जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींना न्यायालयात घेऊन जाणारी पोलिस व्हॅन अचानक नियंत्रणाबाहेर गेल्याने हा अपघात घडला. प्राथमिक अंदाजानुसार व्हॅनचे टायर फुटल्याने चालकाचा ताबा सुटला आणि वाहन अनियंत्रित झाले. त्यानंतर व्हॅनने समोरून येणाऱ्या दुचाकी आणि कारला जोरदार धडक दिली, त्यामुळे तिहेरी अपघाताची स्थिती निर्माण झाली. अपघात इतका भीषण होता की पोलिस व्हॅन रस्त्याच्या कडेला जाऊन झाडीजवळ आदळली. या धडकेत व्हॅनचा चालक गंभीर जखमी झाला असून दुचाकी आणि कारमधील दोन…
साईमत न्यूज नेटवर्क – रत्नागिरी जिल्ह्यात गावठी बॉम्ब स्फोटांच्या घटना थांबण्याचे नाव घेत नसून, खेड तालुक्यात पुन्हा एक धक्कादायक घटना घडली आहे. मुरडे गोठलवाडी परिसरात शिकारीसाठी वापरला जाणारा गावठी बॉम्ब हातात फुटल्याने १३ वर्षीय मुलगा गंभीर जखमी झाला आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. प्रणव प्रताप येसरे (वय १३) असे जखमी मुलाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रणव गुरे राखण्यासाठी मुरडे गोठलवाडी परिसरात गेला होता. त्यावेळी त्याला जंगल परिसरात शिकारीसाठी वापरला जाणारा गावठी बॉम्ब आढळला. उत्सुकतेपोटी त्याने तो हातात घेतला असता अचानक भीषण स्फोट झाला. स्फोट इतका तीव्र होता की प्रणवच्या हाताला, छातीला आणि…
साईमत न्यूज नेटवर्क – यंदाच्या मान्सून हंगामावर एल निनोचा प्रभाव राहण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने व्यक्त केली असून, देशभरात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) शुक्रवारी जाहीर केलेल्या सुधारित अंदाजानुसार, यंदा देशात सरासरीच्या केवळ ९० टक्के पावसाची शक्यता आहे. यापूर्वी एप्रिल महिन्यात ९२ टक्के पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र, एल निनोच्या तीव्र होत चाललेल्या प्रभावामुळे आता पावसाचा अंदाज कमी करण्यात आला आहे. हवामान तज्ज्ञांच्या मते, जून महिन्यात एल निनोचा प्रभाव तुलनेने कमी राहील. मात्र जुलै आणि ऑगस्टमध्ये त्याची तीव्रता वाढण्याची शक्यता असून सप्टेंबर महिन्यात त्याचा सर्वाधिक परिणाम जाणवू शकतो. त्यामुळे मान्सूनच्या पावसात…
साईमत न्यूज नेटवर्क – रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. मुंबईतील १५ वर्षीय अल्पवयीन मुलीची निर्घृण हत्या करून तिचा मृतदेह डोंगराळ व निर्जन भागात फेकून दिल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी माणगाव पोलिसांनी अवघ्या २४ तासांत आरोपीला अटक करत तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. माणगाव तालुक्यातील घरोशीवाडी परिसरातील डोंगर भागात एका अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळून आला होता. घटनेची माहिती मिळताच माणगाव पोलिसांसह फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवला. प्राथमिक तपासात मुलीच्या डोक्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आल्याचे तसेच गळा आवळून तिची हत्या केल्याचे स्पष्ट झाले. निधी उतेकर…
भुसावळ बाजारपेठ पोलिसांत गुन्हा दाखल साईमत/भुसावळ / प्रतिनिधी : ऑनलाइन व्यवहाराच्या नावाखाली विश्वास संपादन करून भुसावळ येथील एका ज्येष्ठ वकिलाची १० हजार रुपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान केली आहेत. भुसावळ शहरातील जामनेर रोड परिसरात राहणारे आणि वकिली व्यवसाय करणारे ५८ वर्षीय अॅड. संजय व्ही. तेलगोटे यांना संशयित आरोपी जिमी जोसेफ (पूर्ण नाव व पत्ता अद्याप अज्ञात) याने ऑनलाइन व्यवहाराच्या बहाण्याने गंडा घातल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. ही घटना १७ जुलै २०२५ रोजी दुपारी साधारण दोन वाजता भुसावळ येथे घडली होती. आरोपी जिमी…
निमगव्हाणमध्ये १,७०० ब्रास अवैध वाळूचा प्रचंड साठा जप्त, माफियांमध्ये खळबळ साईमत/चोपडा/ प्रतिनिधी : चोपडा तालुक्यात अवैध वाळू माफियांच्या मुसक्या आवळत पोलिसांनी आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई करत तब्बल १,७०० ब्रास अवैध वाळूचा प्रचंड साठा जप्त केला आहे. जळगाव जिल्ह्यातील अवैध वाळू व्यवसायाविरोधात सुरू असलेल्या मोहिमेला या कारवाईमुळे निर्णायक वळण मिळाले असून वाळू माफियांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. चोपडा तालुक्यातील निमगव्हाण गावात दादाजी धुनीवाले मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध वाळू साठवून ठेवण्यात आल्याची खात्रीशीर गोपनीय माहिती जळगाव पोलिसांना मिळाली होती. माहितीचे गांभीर्य ओळखून जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत ढिवरे यांनी तात्काळ कारवाईचे आदेश दिले. क्षणाचाही विलंब न लावता चोपड्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या…
साईमत न्यूज नेटवर्क – अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलात एक धक्कादायक घटना समोर आली असून नगर तालुका पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक गांगुर्डे याच्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) कारवाई केली आहे. आरोपीला मदत करण्यासाठी 1 लाख रुपयांची लाच स्वीकारण्यास संमती दर्शवल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे पोलीस वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नगर तालुका पोलीस ठाणे हद्दीत 15 जणांवर एक गुन्हा दाखल आहे. या प्रकरणात आरोपीला मदत करण्यासाठी कायदेशीर प्रक्रियेत सवलत देण्याच्या बदल्यात PSI गांगुर्डे याने 1 लाख रुपयांची मागणी केल्याचा आरोप आहे. या संदर्भात तक्रारदाराने Anti-Corruption Bureau (ACB) कडे तक्रार दाखल केली होती. त्यानंतर ACB पथकाने…
अन्नसुरक्षा विभागाची मोठी कारवाई साईमत/धरणगाव / प्रतिनिधी : धरणगाव तालुक्यात कृत्रिम दूध तयार करून त्याची विक्री करणाऱ्या रॅकेटचा पुन्हा एकदा पर्दाफाश झाला असून, अन्नसुरक्षा विभाग आणि पोलिसांच्या संयुक्त कारवाईमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. नागरिकांच्या आरोग्याशी थेट धोका निर्माण करणाऱ्या या प्रकरणात संबंधित संशयितावर गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भवरखेडा येथील सोमनाथ आनंद माळी (वय ३२) याच्यावर रिफाइंड पामोलीन तेल आणि विविध रासायनिक पदार्थांच्या साहाय्याने कृत्रिम दूध तयार केल्याचा आरोप आहे. हे भेसळयुक्त दूध मूळ दुधात मिसळून त्यातील फॅटचे प्रमाण वाढवले जात होते आणि आर्थिक लाभासाठी त्याची विक्री केली जात असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी अन्न सुरक्षा…
साईमत न्यूज नेटवर्क – अमेरिका आणि इराण यांच्यातील शांतता चर्चा फिसकटल्याचे संकेत मिळत असतानाच मध्यपूर्वेत तणाव अधिकच तीव्र झाला आहे. इराणच्या Islamic Revolutionary Guard Corps (IRGC) ने अब्बास पोर्टवरील अमेरिकेच्या कथित हल्ल्याचा बदला घेतल्याचा दावा केला आहे. या कारवाईत अमेरिकेच्या एअरबेसला लक्ष्य केल्याचेही IRGC कडून सांगण्यात आले आहे, मात्र नेमका कोणता एअरबेस याबाबत स्पष्ट माहिती देण्यात आलेली नाही. तसनीम वृत्त एजन्सीनुसार, IRGC ने गुरुवारी सकाळी स्थानिक वेळेनुसार ४.५० वाजता अब्बास पोर्ट परिसरात झालेल्या हल्ल्याचा प्रतिहल्ला केल्याचे जाहीर केले. या घडामोडीनंतर संपूर्ण प्रदेशात सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे. दरम्यान, कुवैतच्या संरक्षणमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या हवाई हद्दीकडे येणाऱ्या काही क्षेपणास्त्र आणि ड्रोनना…