Author: saimat

तातडीने दुरुस्तीची प्रहार संघटनेची मागणी, आंदोलनाचा इशारा साईमत /मलकापूर/ प्रतिनिधी – मलकापूर येथील शहरातील मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था आणि ठिकठिकाणी पडलेल्या मोठ्या खड्ड्यांमुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन अक्षरशः विस्कळीत झाले आहे. रस्त्यांच्या या दुरवस्थेमुळे वाहनचालक आणि पादचाऱ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत असून, अनेक ठिकाणी अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर प्रहार संघटनेच्या वतीने नगरपरिषद प्रशासनाकडे तातडीने रस्ते दुरुस्ती करण्याची ठाम मागणी करण्यात आली आहे. प्रहार संघटनेचे जिल्हा उपप्रमुख अजय टप यांनी नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देत शहरातील सर्व रस्त्यांची तातडीने पाहणी करून दुरुस्तीची कामे सुरू करण्याची मागणी केली आहे. निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे की, शहरातील प्रमुख मार्गांसह अंतर्गत…

Read More

साईमत न्यूज नेटवर्क – दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॅबिनेट बैठकीत दिल्ली ईव्ही धोरण 2026 ला मंजुरी देण्यात आली असून हे धोरण 1 जुलैपासून लागू होणार आहे. प्रदूषण कमी करणे आणि इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढवणे हा या धोरणाचा मुख्य उद्देश आहे. या धोरणाअंतर्गत इलेक्ट्रिक वाहन खरेदी करणाऱ्या नागरिकांना मोठ्या प्रमाणात आर्थिक सवलती जाहीर करण्यात आल्या आहेत. पहिल्या वर्षात इलेक्ट्रिक दुचाकी वाहन खरेदीवर 30 हजार रुपये तर तीनचाकी वाहनांवर 50 हजार रुपयांची सबसिडी मिळणार आहे. तसेच चारचाकी इलेक्ट्रिक वाहनांवर रोड टॅक्स आणि नोंदणी शुल्कात 100 टक्के सूट देण्यात येणार आहे, ही सवलत 30 लाख रुपयांपर्यंतच्या एक्स-शोरूम किंमतीच्या वाहनांवर लागू…

Read More

मुंबई-गोवा महामार्गावर कार-पिकअपची समोरासमोर धडक; चालक जखमी साईमत न्यूज नेटवर्क – मुंबई-गोवा महामार्गावरील पावशी येथील बेल नदीजवळ आज सकाळी भीषण अपघाताची घटना घडली. कणकवलीहून गोव्याच्या दिशेने जाणारी एक कार आणि समोरून येणारी पिकअप यांच्यात जोरदार समोरासमोर धडक झाली. धडकेचा परिणाम इतका भीषण होता की कारचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून कारचालक जखमी झाला आहे. अपघातानंतर परिसरात काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमी चालकाला तातडीने उपचारासाठी हलविण्यात आले असून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पुढील तपास सुरू केला आहे. समृद्धी महामार्गावर ट्रक-कार धडक; एकाच कुटुंबातील पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू दरम्यान, अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यात समृद्धी महामार्गावर टोलनाक्याजवळ…

Read More

गारबर्डी गावावर शोककळा  वीज कोसळून ३५ वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू   साईमत /भुसावळ/ प्रतिनिधी रावेर तालुक्यात गेल्या बुधवारपासून दररोज सायंकाळी सुरू असलेल्या दमदार पावसासह वादळी वाऱ्यांनी जनजीवन विस्कळीत केले असून, रविवारी सायंकाळी या बदलत्या हवामानाने पुन्हा एकदा जीवितहानी घडवली. तालुक्यातील गारबर्डी गावात वादळी पावसादरम्यान वीज कोसळून ३५ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. गणेश बल्लू भिल्ल (वय ३५) असे या दुर्दैवी युवकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सायंकाळी अचानक परिसरात ढग दाटून आले. काही क्षणांतच जोरदार वारे, विजांचा कडकडाट आणि मुसळधार पावसाने वातावरणात प्रचंड गोंधळ निर्माण केला. याचदरम्यान झालेल्या वीज कोसळण्याच्या घटनेत गणेश भिल्ल यांचा जागीच…

Read More

मंदिरात भयंकर प्रकार; 55 वर्षीय पुजाऱ्याचा डोक्यात वार करून खून साईमत /भुसावळ/ प्रतिनिधी : शहरालगत असलेल्या झेडटीआरआय बोगद्याजवळील निर्जन परिसरातील मंदिरात 55 वर्षीय पुजाऱ्याची डोक्यात टणक वस्तूने वार करून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेने भुसावळ शहरासह परिसरात मोठी खळबळ उडाली असून पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन तपासाची चक्रे वेगाने फिरविली आहेत. मृत पुजाऱ्याचे नाव संतोष रघुवीर मंचल (वय 55, रा. झेडटीआरआय परिसर, भुसावळ) असे आहे. आरपीडी रस्त्यावरील लष्करी डेपोपासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर असलेल्या तीन मंदिरांमध्ये ते पूजारी म्हणून कार्यरत होते. हा संपूर्ण परिसर निर्जन असल्याने येथे नागरिकांची वर्दळ अत्यंत कमी असते, अशी…

Read More

शिडी लावून सीलबंद घरात घुसण्याचा प्रयत्न; पोलिसांच्या कारवाईत दोघे ताब्यात साईमत /जळगाव/ प्रतिनिधी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) कारवाई केलेल्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या सीलबंद निवासस्थानी घुसखोरी झाल्याचा अत्यंत गंभीर प्रकार जळगावात उघडकीस आला असून संपूर्ण प्रशासकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी (वर्ग-१) किरण पुरुषोत्तम चौधरी यांच्या जळगावातील सीलबंद घरात कुलूप तोडून प्रवेश करणाऱ्या दोन संशयितांना जिल्हापेठ पोलिसांनी घटनास्थळीच पकडले आहे.ही घटना गणेश कॉलनी परिसरातील साईप्रभा आर्केड येथे शनिवारी रात्री उशिरा घडली. अकोला येथील एसीबी पथकाने काही दिवसांपूर्वी किरण चौधरी यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये कारवाई केली होती. त्यानंतर त्यांच्या जळगावातील निवासस्थानी तपासाशी संबंधित महत्त्वाची प्रक्रिया सुरू असल्याने…

Read More

पालकमंत्र्यांच्या हस्ते पोलिओ लसीकरण मोहिमेची सुरुवात साईमत /पाळधी(धरणगाव)/ प्रतिनिधी : जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा जिल्हास्तरीय प्रारंभ रविवारी (दि. २८ जून) पाळधी येथे मोठ्या उत्साहात करण्यात आला. पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते एका चिमुकल्या बालकाला पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब पाजून या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. या प्रसंगी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिष्मा नायर यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमात मार्गदर्शन करताना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पोलिओ निर्मूलनासाठी शासन सातत्याने राबवत असलेल्या मोहिमांमध्ये समाजाच्या सक्रिय सहभागाचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले की, “पाच वर्षांखालील प्रत्येक बालकाला पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब मिळणे अत्यावश्यक…

Read More

धन्वंतरी देवतेचे पूजन करून मान्यवरांच्या हस्ते लहान बालकांना पोलिओचे दोन थेंब देऊन अभियानाची सुरुवात राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण अभियान २०२६ अंतर्गत जळगाव शहर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने रविवारी (दि. २८ जून) शहरात पोलिओ लसीकरण मोहिमेचा उत्साहात प्रारंभ करण्यात आला. या प्रसंगी पारंपरिक पद्धतीने धन्वंतरी देवतेचे पूजन करून मोहिमेची अधिकृत सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमात आमदार राजूमामा भोळे आणि महापौर दीपमाला काळे यांच्या हस्ते लहान बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब पाजून अभियानाची सुरुवात करण्यात आली. या उपक्रमामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. कार्यक्रमात मार्गदर्शन करताना आमदार राजूमामा भोळे यांनी माता व बालकांच्या आरोग्यसेवेवर विशेष भर देण्याची गरज व्यक्त केली. निरोगी बालक हे…

Read More

 डोळ्याखाली गंभीर दुखापत, ₹88 हजारांचे नुकसान साईमत /भुसावळ/ प्रतिनिधी सीट न मिळाल्याच्या रागातून रेल्वे टीटीईवर प्राणघातक हल्ला झाल्याची गंभीर घटना भुसावळ रेल्वे स्थानकावर शनिवारी (२७ जून) रात्री घडली. एसी कोचमध्ये जागा उपलब्ध नसल्याचे सांगितल्यानंतर संतप्त झालेल्या प्रवाशाने टीटीईला शिवीगाळ करत बेदम मारहाण केली. या हल्ल्यात टीटीईच्या डोळ्याखाली गंभीर दुखापत होऊन रक्तस्राव झाला असून, सरकारी साहित्य व वैयक्तिक वस्तू मिळून सुमारे ₹88 हजारांचे नुकसान झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चुन्नीलाल रमेशचंद्र गुप्ता (वय 49), हे भुसावळ येथे हेड टीटीई म्हणून कार्यरत आहेत. शनिवारी रात्री नागपूर–मडगाव एक्सप्रेस (गाडी क्रमांक 11203) मध्ये ते भुसावळ ते पनवेल दरम्यान एसी कोच…

Read More

साईमत न्यूज नेटवर्क – रायगड : किल्ले रायगडावर जाणाऱ्या शिवभक्तांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. रायगड किल्ल्यावर रोपवेने प्रवास करणे आता अधिक सोपे आणि कमी खर्चिक होणार असून, तिकीट दरात मोठी कपात करण्यात आली आहे. पूर्वी प्रतिव्यक्ती सुमारे ३५० रुपये आकारले जात होते, मात्र आता हा दर ५० ते १०० रुपयांपर्यंत कमी होणार असल्याची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्र सरकारच्या या निर्णयामुळे शिवभक्तांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. स्वस्त दरात रोपवे सुविधा उपलब्ध झाल्यामुळे आता कोणत्याही वयोगटातील शिवभक्तांना कमी वेळेत आणि कमी खर्चात रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घेणे अधिक सुलभ होणार आहे. सध्या रोपवेचा उच्च खर्च सर्वसामान्यांना परवडत…

Read More