शेतातील चारीत अडकलेल्या नीलगायची ग्रामस्थ-वनविभागाच्या संयुक्त प्रयत्नातून सुटका साईमत /जळगाव (कंडारी) / प्रतिनिधी वाघुर धरण परिसरात मानवतेचे आणि वन्यजीव संवर्धनाचे उत्तम उदाहरण पाहायला मिळाले. शेतात अडकलेल्या जखमी नीलगायची ग्रामस्थ, वनविभाग आणि स्थानिकांच्या संयुक्त प्रयत्नातून सुखरूप सुटका करण्यात आली. वेळेवर दाखवलेल्या सतर्कतेमुळे एका वन्यजीवाचा जीव वाचविण्यात यश आले आहे. ही घटना रायपूर येथील वाघुर धरण परिसरात संध्याकाळच्या सुमारास घडली. शेतीची पाहणी करण्यासाठी गेलेले उपसरपंच वसंत लंके यांना शेताजवळील पाण्याच्या शोधात चारीमध्ये अडकलेली एक जखमी नीलगाय दिसून आली. नीलगायची अवस्था पाहून त्यांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. उपसरपंच वसंत लंके यांनी तत्काळ वनविभागाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; मात्र संपर्क क्रमांक उपलब्ध नसल्यामुळे काहीसा…
Author: saimat
साईमत न्यूज नेटवर्क – अमरावती : समृद्धी महामार्गावर धामणगाव रेल्वे तालुक्यातील टोलनाक्याजवळ कार आणि ट्रक यांच्यात झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील पाच जणांचा जागीच मृत्यू झाल्याची अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. मृतांमध्ये दोन पुरुष, दोन महिला आणि एका लहान मुलीचा समावेश असून हे सर्व चंद्रपूर जिल्ह्यातील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वॅगनआर कार (WagonR) चंद्रपूरहून मुंबईच्या दिशेने प्रवास करत होती. समृद्धी महामार्गावरील चॅनल क्रमांक १०५ जवळ या कारने पुढे चालणाऱ्या ट्रकला मागून जोरदार धडक दिली. धडकेचा जोर इतका भीषण होता की कारचा अक्षरशः चक्काचूर झाला आणि कारमधील पाचही जणांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर महामार्गावर काही काळ…
फिल्मी स्टाईल घटना ‘थार’ ने महसूल पथक रोखून डंपर फरार साईमत /शिरसोली / प्रतिनिधी जळगाव तालुक्यातील शिरसोली परिसरात अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या महसूल विभागाच्या पथकाला वाळू माफियांनी थेट आव्हान दिल्याची गंभीर घटना समोर आली आहे. शासकीय वाहनासमोर ‘थार’ आडवी लावून महसूल पथकाला रोखत अवैध वाळूने भरलेला डंपर पळवून नेल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. ही घटना २७ जून रोजी रात्री सुमारे साडेदहा वाजण्याच्या सुमारास शिरसोली प्र. न. येथील इंदिरानगर परिसरात घडली. नायब तहसीलदार राहुल नगराज वाघ (वय ३९, रा. अल्पबचत भवन परिसर, जळगाव) हे आपल्या पथकासह अवैध वाळू वाहतुकीविरोधात पेट्रोलिंग करत असताना त्यांना एक विना क्रमांकाचा टाटा कंपनीचा डंपर…
भरधाव ट्रॅव्हल्सवरील चालकाचा ताबा सुटला ट्रॅव्हल्स उलटली, २२ प्रवासी बचावले साईमत /चाळीसगाव / प्रतिनिधी धुळे–सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील गायरान फाट्याजवळ रविवारी सकाळी एका खाजगी प्रवासी ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात झाला. पाचोऱ्याकडून गुजरातच्या दिशेने निघालेली ट्रॅव्हल्स अचानक अनियंत्रित होऊन रस्त्याच्या कडेला पलटी झाली. या अपघातात सहा प्रवासी जखमी झाले असून, वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र, सर्व २२ प्रवाशांचे प्राण वाचल्याने मोठी दुर्घटना टळली. प्राथमिक माहितीनुसार, भरधाव वेगात असताना चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने ट्रॅव्हल्स रस्त्याबाहेर जाऊन उलटली. अपघात इतका भीषण होता की, वाहनात बसलेल्या प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला. काही प्रवासी वाहनात अडकून पडले होते. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिक आणि तरुणांनी कोणतीही पर्वा न…
रिंग रोडचे ‘व्हाइट टॉपिंग’ काँक्रिटीकरण सुरू डिसेंबरपर्यंत दोन्ही बाजूंचे काम पूर्ण होणार साईमत /जळगाव/ प्रतिनिधी : शहरातील वाहतूक व्यवस्थेला गती देणाऱ्या आणि दीर्घकाळापासून दुरवस्थेत असलेल्या रिंग रोडच्या काँक्रिटीकरणाच्या कामाचा शुभारंभ शनिवारी सायंकाळी आमदार राजूमामा भोळे यांच्या हस्ते करण्यात आला. या महत्त्वपूर्ण विकासकामामुळे जळगावकरांच्या प्रवासाचा मोठा प्रश्न सुटणार असल्याचे चित्र निर्माण झाले असून नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. या कार्यक्रमास भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, महापौर दीपमाला काळे, उपमहापौर मनोज चौधरी, स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील, गटनेते प्रकाश बालाणी, नगरसेविका ॲड . शुचिता हाडा, माजी महापौर तथा नगरसेवक नितीन लढ्ढा यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. गेल्या काही दिवसांपासून रिंग रोडची मोठ्या प्रमाणात…
साखरपुड्यानंतर महिन्यातच तरुणाची आत्महत्या साईमत /जळगाव/ प्रतिनिधी जळगाव शहरातील धांडे नगर परिसरात एका २८ वर्षीय तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची अत्यंत दु:खद घटना समोर आली आहे. राजस संजय पाटील (वय २८) असे मृत तरुणाचे नाव असून, काही दिवसांपूर्वीच त्याचा साखरपुडा झाला होता. लवकरच विवाह होणार असल्याने कुटुंबात आनंदाचे वातावरण होते, मात्र या अनपेक्षित घटनेने संपूर्ण कुटुंब हादरून गेले आहे. प्राथमिक माहितीनुसार, राजस पाटील हा ठेकेदारी व्यवसायाशी निगडित काम करत होता. शुक्रवारी दुपारच्या सुमारास तो घरातील वरच्या मजल्यावर गेला होता. बराच वेळ तो खाली न आल्याने कुटुंबीयांनी त्याला हाक मारली. प्रतिसाद न मिळाल्याने आई वर गेली असता त्याने गळफास…
टाळ-मृदंगाच्या गजरात नामघोषात चांदसर दिंडी पंढरपूरच्या दिशेने रवाना पालकमंत्र्यांनी साधला वारकऱ्यांशी संवाद साईमत /पाळधी, ता. धरणगाव / प्रतिनिधी श्रीक्षेत्र चांदसर येथून श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या जयघोषात, टाळ-मृदंगाच्या निनादात आणि अभंगांच्या गजरात पारंपरिक पालखी-दिंडीचे उत्साहपूर्ण वातावरणात प्रस्थान झाले. “ज्ञानोबा-तुकोबा”, “पुंडलिक वरदे हरी विठ्ठल” या अखंड नामगजराने संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. यावेळी राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी उपस्थित राहून वारकऱ्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी बोलताना पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, “वारी ही माझ्यासाठी केवळ परंपरा नसून आयुष्याचा श्वास आहे. गेल्या १७ वर्षांपासून मी या दिंडी प्रस्थान सोहळ्याला नियमित उपस्थित राहत असून, दरवर्षी विठ्ठलाच्या चरणी कृतज्ञतेने नतमस्तक होतो. वारीतून मला जनसेवेची…
भिवंडीत फुटला टीईटीचा पेपर; राज्यभरातील परीक्षा पुढे ढकलली साईमत /भिवंडी / प्रतिनिधी देशभरात ‘नीट’ प्रवेश परीक्षेतील पेपरफुटी प्रकरणाची धग अद्याप कायम असतानाच महाराष्ट्रातही परीक्षा व्यवस्थेच्या विश्वासार्हतेला तडा देणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. राज्यातील शिक्षक भरतीसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी ‘महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा’ (महा-टीईटी) ऐनवेळी स्थगित करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेला घ्यावा लागला आहे. ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथे पोलिसांनी केलेल्या कारवाईत टीईटीची प्रश्नपत्रिका फुटल्याचे उघड झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. रविवार, २८ जून रोजी राज्यभरात होणाऱ्या या परीक्षेसाठी सुमारे दोन लाख २६ हजार उमेदवारांनी तयारी केली होती. मात्र, परीक्षेच्या अवघ्या काही तासांपूर्वी प्रश्नपत्रिका लीक झाल्याची माहिती समोर आल्याने…
पावसाची हजेरी, तापमानात घसरण; जळगावात गारव्याची चाहूल साईमत /जळगाव/ प्रतिनिधी जून महिन्याचा उत्तरार्ध उजाडूनही पावसाने दडी मारल्याने जळगाव जिल्ह्यातील नागरिक प्रचंड उकाड्याने हैराण झाले होते. मात्र, गेल्या तीन दिवसांत जिल्ह्यात झालेल्या दमदार पावसामुळे वातावरणात मोठा बदल झाला असून नागरिकांना अखेर दिलासा मिळाला आहे. पावसाच्या या हजेरीनंतर तापमानात घट होऊन हवेत गारवा निर्माण झाला आहे. सलग तीन दिवस सुरू असलेल्या पावसानंतर गुरुवारी पावसाने विश्रांती घेतली. तरीही संपूर्ण दिवसभर आकाशात ढगांची गर्दी कायम होती. त्यामुळे वातावरणात ओलसरपणा आणि गारठा जाणवत राहिला. या पावसामुळे जिल्ह्याचा पारा खाली येत ३५ अंश सेल्सिअसपर्यंत स्थिरावला असून उष्णतेचा ताण काहीसा कमी झाला आहे. हवामान खात्याचा अंदाजभारतीय हवामान…
१३४ बुथची उभारणी; आरोग्य विभागाची जय्यत तयारी साईमत /मुक्ताईनगर/ प्रतिनिधी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण अभियानांतर्गत येत्या रविवार, दि. २८ जून रोजी मुक्ताईनगर तालुक्यात व्यापक स्वरूपात पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. शून्य ते पाच वर्षे वयोगटातील प्रत्येक बालकाला पोलिओ प्रतिबंधक ‘दोन थेंब’ देण्याच्या उद्देशाने आरोग्य विभागाने संपूर्ण तालुक्यात जय्यत तयारी केली आहे. या मोहिमेसाठी तालुका आरोग्य विभागाने एकूण १५,२१५ बालकांचे उद्दिष्ट निश्चित केले असून, प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत लस पोहोचवण्यासाठी सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे. तालुक्यातील चारही प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या अधिपत्याखाली एकूण १३४ पोलिओ लसीकरण बुथ उभारण्यात आले असून, या बुथवर प्रशिक्षित आरोग्य कर्मचारी व स्वयंसेवकांची नियुक्ती करण्यात आली आहे. या…