साईमत -जळगाव -प्रतिनिधी | जून महिना अर्ध्यापेक्षा जास्त उलटून गेला तरी जळगाव जिल्ह्यात अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही. यामुळे खरिपाची पेरणी पूर्णपणे रखडली असून, जिल्ह्यातील बळीराजा मोठ्या आर्थिक संकटाच्या छायेत सापडला आहे. पावसाअभावी शेतकर्यांच्या चिंतेत कमालीची वाढ झाली आहे. खरीप हंगामासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी एप्रिल महिन्यापासूनच शेताची मशागत, नांगरणी आणि कुळवणी करून ठेवली होती. २५ मे रोजी रोहिणी तर ७ जून रोजी मृग नक्षत्राची सुरुवात झाली. मात्र, पारंपरिकरीत्या पेरणीचा काळ मानल्या जाणाऱ्या मृग नक्षत्रानेही शेतकऱ्यांची पूर्ण निराशा केली. आता २२ जूनपासून ‘आद्रा’ नक्षत्राला सुरुवात होत असून, या काळात तरी वरुणराजा बरसेल का? याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत. जर पुढील काही…
Author: Bharati Bharsake
“पन्नास-शंभर कोटींसाठी विकल्या जाणाऱ्यांना जनता पुन्हा निवडून देणार का?” – राज ठाकरेंचा थेट सवाल. मुंबई: राज्यासह संपूर्ण देशभरात सध्या शिवसेनेच्या (UBT) ६ खासदारांनी केलेल्या बंडखोरीची म्हणजेच ‘ऑपरेशन टायगर’ची जोरदार चर्चा सुरू आहे. या संपूर्ण राजकीय भूकंपावर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) प्रमुख राज ठाकरे यांनी अत्यंत तीव्र शब्दांत भाष्य केले आहे. “ज्या प्रकारचं राजकारण सध्या महाराष्ट्र आणि देशात सुरू आहे, ते पाहता भविष्यात येणाऱ्या पिढ्यांना आपण काय उत्तर देणार आहोत?” असा उद्विग्न सवाल त्यांनी उपस्थित केला. मुंबईत आयोजित मनसेच्या जाहीर मेळाव्यात ते कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करत होते. ”आम्ही महाराष्ट्राचा स्वाभिमान विसरतोय!” मेळाव्यात बोलताना राज ठाकरे यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर…
अहमदाबादमधून चोरी झालेली कार जळगाव एम.आय.डी.सी. पोलिसांनी पकडली. जळगाव -प्रतिनिधी -भारती सवर्णे | गुजरात राज्यातील अहमदाबाद (ग्रामीण) येथून चोरीला गेलेली ९ लाख रुपये किमतीची ‘किया कॅरेन्स’ कार जळगाव शहरात जप्त करण्यात एम.आय.डी.सी. पोलिसांना मोठे यश आले आहे. पोलिसांचा इशारा धुडकावून पळणाऱ्या कारचा थरारक पाठलाग करून पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतले. १५ मे २०२६ रोजी अहमदाबादमधील बोपल पोलीस स्टेशनच्या हद्दीतून ‘किया’ कार (क्रमांक MP 04 ZL 5155) चोरीला गेली होती. १८ जून रोजी संध्याकाळी ही कार नशिराबाद टोलनाका ओलांडून जळगावकडे येत असल्याची गोपनीय माहिती गुजरात पोलिसांनी जळगाव पोलिसांना दिली. माहिती मिळताच एम.आय.डी.सी. वाहतूक शाखेच्या अंमलदारांनी काशिनाथ चौकात नाकाबंदी केली. पोलिसांना पाहताच चालकाने…
“उद्धव ठाकरेंनी मोठे केले नसते तर ते निवडून आले असते का?” – राऊतांचा सवाल. मुंबई : शिवसेना ठाकरे गटातून सहा खासदार फुटल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. पक्षाच्या ६० व्या वर्धापन दिनानिमित्त काल झालेल्या भव्य मेळाव्यानंतर, आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी बंडखोर खासदार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अत्यंत तिखट शब्दांत हल्लाबोल केला. “ओमराजे गेले, आष्टीकर गेले… जाऊ द्या ना, शेणातील किडा शेणात गेला,” अशा अत्यंत संतप्त आणि शेलक्या शब्दांत राऊतांनी बंडखोरांवर निशाणा साधला. काल मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात पार पडलेल्या मेळाव्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बंडखोरांवर कडाडून टीका केली होती. त्यानंतर आज सकाळी माध्यमांशी…
आदिवासी दुर्गम भागात पहिल्यांदाच रात्रीच्या वेळी ‘सीईओ’ थेट नागरिकांच्या दारात. जळगाव -प्रतिनिधी -भारती सवर्णे | जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) करिश्मा नायर यांनी शुक्रवार, १९ जून रोजी रावेर तालुक्यातील ‘पेसा’ (PESA) अंतर्गत येणाऱ्या विविध विकासकामांची अचानक व सविस्तर पाहणी केली. विशेष म्हणजे, आदिवासी आणि दुर्गम भागात पहिल्यांदाच जिल्हा परिषदेच्या सर्वोच्च अधिकाऱ्याने रात्रीच्या वेळी भेट देऊन थेट नागरिकांशी संवाद साधल्याने परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. ”आदिवासी पेसा क्षेत्रातील एकही नागरिक सुविधांपासून वंचित राहता कामा नये आणि सर्व विकासकामे दर्जेदारच झाली पाहिजेत,” अशा कडक सूचना त्यांनी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिल्या. रात्रीच्या वेळी त्यांनी थेट ‘चावडी बैठक’ घेऊन नागरिकांच्या समस्या…
शनिवारी सकाळीच वेगवेगळ्या प्रभागांमध्ये महापौरांचा ‘सप्राइज व्हिजिट’ दौरा साईमत -जळगाव -प्रतिनिधी | पावसाळा अगदी तोंडावर आलेला असतानाही शहरातील नालेसफाई आणि आपत्ती व्यवस्थापनाच्या कामात ढिसाळपणा करणाऱ्या महापालिका अधिकाऱ्यांना महापौर दीपमाला काळे यांनी चांगलाच दणका दिला आहे. शनिवारी शासकीय सुट्टी असतानाही महापौरांनी सकाळीच शहरात विविध ठिकाणी ‘ऑन द स्पॉट’ पाहणी दौरा केला.कामात हलगर्जीपणा करणाऱ्या जबाबदार अधिकाऱ्यांची त्यांनी जागेवरच कडक शब्दांत कानउघडणी केली. तसेच, संभाजीनगर आणि रामानंदनगर भागातील नाल्यांच्या गंभीर परिस्थितीवर सोमवारी तातडीने अहवाल सादर करण्याचे आदेश नगररचना (टाऊन प्लॅनिंग) विभागाला दिले आहेत. धक्कादायक! थेट नाल्यांवरच बांधली घरे; मुख्य स्वच्छता निरीक्षकांचा खुलासा दौऱ्याच्या सुरुवातीला महापौर दीपमाला काळे यांनी संभाजीनगर चौक, विवेक कॉलनी आणि…
साईमत -चाळीसगाव -प्रतिनिधी | चाळीसगाव शहरातील बसस्थानक परिसरात दुकान लावण्याच्या कारणावरून सुरू असलेल्या जुन्या वादाचे पर्यावसान एका तरुणाच्या हत्येत झाल्याची अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अक्षय भानुदास पाटील (वय २७, रा. लक्ष्मीनगर, चाळीसगाव) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी संशयित आरोपी निखिल ऊर्फ भोला सुनील अजबे याच्याविरुद्ध चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मृत अक्षय पाटील याचे चाळीसगाव बसस्थानकाच्या मागील भागात दुकान लावण्याच्या कारणावरून संशयित निखिल अजबे याच्याशी वारंवार वाद होत होते. गुरुवारी (दि. १८) रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास “निखिलने बोलावले आहे” असे सांगून अक्षय घरातून बाहेर पडला होता. मात्र,…
साईमत -जळगाव -प्रतिनिधी | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज ‘प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना’ अंतर्गत देशभरातील लाभार्थ्यांना थेट लाभ हस्तांतरण (DBT) द्वारे २,४०० कोटी रुपयांच्या प्रोत्साहन अनुदानाचे वितरण करण्यात आले. दिल्ली येथील विज्ञान भवनातून झालेल्या या राष्ट्रीय कार्यक्रमाचे देशभरातील २०० ठिकाणी थेट प्रक्षेपण करण्यात आले होते. जळगावात जैन हिल्स येथील ‘गांधी तीर्थ’च्या कस्तुरबा सभागृहात या विशेष ऑनलाईन कार्यक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आले होते. नाशिक विभागीय भविष्य निर्वाह निधी आयुक्त-१ अतुल कोतकर यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कार्यक्रमात जिल्ह्यातील नव्याने नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्रांचे वितरण करण्यात आले. गांधी तीर्थ येथील कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. या प्रसंगी जळगावच्या…
जळगाव/मुंबई: “आम्ही मशाल समोर बटन दाबा म्हणतात, पवार साहेब तुतारीचं बटन दाबा म्हणतात. पण भाजपवाले म्हणतात कोणाचंही बटण दाबा, माणूस आमच्याकडेच येणार! जर अशी परिस्थिती असेल, तर आता देशाला आणि आपल्या सगळ्यांना मिळून ‘ऑपरेशन कमळ’ राबवावं लागेल,” अशा कडक शब्दांत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. शिवसेनेच्या वर्धापन दिन सोहळ्यात बोलताना त्यांनी भाजपसह पक्ष सोडून गेलेल्या गद्दार खासदारांवर आणि ठाकरे कुटुंबावर टीका करणाऱ्यांवर कडाडून टीका केली. ‘मातोश्री’वर चिखलफेक करणाऱ्यांना सडेतोड उत्तर ठाकरे कुटुंबावर होत असलेल्या आरोपांचा समाचार घेताना उद्धव ठाकरे भावुक आणि तितकेच आक्रमक झालेले पाहायला मिळाले. “माझ्यावर, माझ्या पत्नीवर, आदित्य आणि तेजसवर आरोप…
बुलढाणा: भाजपचे संकटमोचक आणि राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांचा एका तरुणीसोबतचा आक्षेपार्ह फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या फोटोचा आधार घेत विरोधकांकडून महाजन यांना घेरण्याचा आणि त्यांची कोंडी करण्याचा जोरदार प्रयत्न सुरू आहे. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर आता स्वतः मंत्री गिरीश महाजन यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली असून त्यांनी विरोधकांचे सर्व आरोप फेटाळून लावत एक मोठा दावा केला आहे. ते बुलढाणा येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. “तो फोटो मॉर्फ्ड केलेला”, महाजनांचा दावा व्हायरल फोटोवर स्पष्टीकरण देताना गिरीश महाजन म्हणाले, “सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला संबंधित फोटो पूर्णपणे मॉर्फ (बनावट) केलेला आहे. मला माहित नाही की…