Author: Bharati Bharsake

साईमत न्यूज नेटवर्क – अमेरिका आणि इराण यांच्यात अखेर शांतता करार झाल्यानंतर 100 हून अधिक दिवस चाललेला तीव्र संघर्ष थांबला असला तरी या युद्धाची आर्थिक झळ किती मोठी होती, हे आता स्पष्ट होऊ लागले आहे. केवळ लष्करी कारवाईसाठी अमेरिकेने तब्बल 113 अब्ज डॉलर (सुमारे 1.06 लाख कोटी रुपये) खर्च केल्याचा अंदाज समोर आला आहे. 28 फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या या संघर्षात अमेरिका आणि इस्रायलने संयुक्तपणे इराणविरुद्ध कारवाई केली होती. सुमारे 108 दिवस चाललेल्या या युद्धादरम्यान अमेरिकेचा दररोजचा खर्च अब्जावधी डॉलरच्या घरात पोहोचला होता. पहिल्याच काही दिवसांत प्रचंड खर्च संरक्षण विभागाच्या माहितीनुसार, युद्धाच्या पहिल्या सहा दिवसांतच अमेरिकेने 11.3 अब्ज डॉलर खर्च केले.…

Read More

तांबापुरात मध्यरात्री दगडफेकीचा थरार; दोन घरांची तोडफोड, पोलिसांचा कडक बंदोबस्त साईमत /जळगाव/ प्रतिनिधी  शहरातील तांबापुरा परिसरातील बिस्मिला चौक येथे गुरुवारी मध्यरात्री दोन गटांमध्ये झालेल्या किरकोळ वादाचे रूपांतर तुफान दगडफेकीत झाल्याने परिसरात काही काळ दंगलसदृश परिस्थिती निर्माण झाली. या घटनेत दोन घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, संतप्त जमावाने पोलिसांवरही दगडफेक केल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनली. पोलिसांनी तातडीने अतिरिक्त बंदोबस्त तैनात करून परिस्थिती नियंत्रणात आणली असून, परिसरात सध्या तणावपूर्ण शांतता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी मध्यरात्री सुमारे एक वाजेच्या सुमारास एका महिला आणि तरुणामध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला. सुरुवातीला हा वाद मर्यादित स्वरूपाचा असला तरी काही वेळातच त्याचे रूपांतर दोन गटांमधील मोठ्या…

Read More

‘राजगड’ वरील संयुक्त पत्रकार परिषदेत नगरसेवकांचा धक्कादायक निर्णय; जळगाव विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ साईमत – चाळीसगाव- प्रतिनिधी | जळगाव जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य मतदारसंघातील विधान परिषदेच्या निवडणुकीच्या मतदानाच्या अगदी तोंडावर चाळीसगावमधून एक अत्यंत धक्कादायक आणि मोठी राजकीय बातमी समोर येत आहे. चाळीसगाव नगरपरिषदेतील लोकनेते अनिल देशमुख यांच्या ‘शहर विकास आघाडी’चे ११ नगरसेवक आणि २ अपक्ष नगरसेवक अशा एकूण १३ नगरसेवकांनी या निवडणुकीतील मतदानावर थेट आणि पूर्णपणे बहिष्कार टाकण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. या आक्रमक पवित्र्यामुळे जळगाव जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून भाजप उमेदवाराच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. चाळीसगाव येथे दुपारी २ वाजता स्वर्गीय…

Read More

कोयंबतूर/अहमदाबाद : NEET परीक्षेभोवती निर्माण झालेल्या अनिश्चिततेमुळे आणि वाढत्या मानसिक तणावामुळे देशभरात चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. अवघ्या दोन दिवसांत चार NEET विद्यार्थ्यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्याच्या घटनांनी पालक, विद्यार्थी आणि शिक्षण क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे. तामिळनाडूतील कोयंबतूर येथे NEET ची तयारी करणाऱ्या 19 वर्षीय अनुकिर्ती या विद्यार्थिनीने बुधवारी सकाळी विष प्राशन करून आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी तिने आपल्या काका आणि जवळच्या नातेवाईकांना व्हॉट्सअॅपवर संदेश पाठवला होता. या संदेशात तिने आपल्या मनातील भीती आणि नैराश्य व्यक्त केले होते. तिने लिहिले होते की, “मी NEET परीक्षा दिली होती आणि वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळण्याची आशा होती. मात्र परीक्षा रद्द झाल्यामुळे आता पुन्हा…

Read More

साईमत -जळगाव- प्रतिनिधी | उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या संसदीय बैठकीला सहा खासदार गैरहजर राहिल्यानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना कमालीचा वेग आला आहे. पक्षाचा व्हीप धुडकावल्याच्या आरोपावरून या खासदारांवर अपात्रतेची कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, या संपूर्ण प्रकरणावर ज्येष्ठ विधीज्ञ उज्ज्वल निकम यांनी कायद्यातील एका महत्त्वाच्या तरतुदीकडे लक्ष वेधत एक मोठा कायदेशीर पेच उपस्थित केला आहे. काय आहे उज्ज्वल निकम यांनी उपस्थित केलेला पेच? माध्यमांशी बोलताना उज्ज्वल निकम यांनी सांगितले की, संबंधित खासदारांचे दुसऱ्या गटात विलीनीकरण ‘व्हीप’ जारी होण्यापूर्वी झाले की नंतर, हा या प्रकरणातील सर्वात महत्त्वाचा आणि कळीचा मुद्दा ठरणार आहे. जर व्हीप जारी होण्यापूर्वीच कायदेशीररीत्या विलीनीकरण प्रक्रिया पूर्ण…

Read More

साईमत -जळगाव- प्रतिनिधी | जळगाव : जळगाव विधान परिषद स्थानिक प्राधिकरण मतदारसंघ निवडणुकीच्या मतदानाला आज सकाळपासून उत्साहात सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील सातही मतदान केंद्रांवर कडेकोट पोलीस बंदोबस्तात शांततेत मतदान सुरू असून पहिल्या दोन तासांत म्हणजेच सकाळी ८ ते १० या वेळेत एकूण ३४.४४ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे सुरुवातीच्या दोन तासांत पुरुषांच्या तुलनेत महिला मतदारांनी मतदानात आघाडी घेतल्याचे चित्र आहे. ​पहिले २ तास : पुरुष विरुद्ध महिला मतदान ​निवडणूक विभागाकडून मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, या निवडणुकीत एकूण ६३० मतदार मतदानासाठी पात्र आहेत, ज्यामध्ये ३१५ पुरुष आणि ३१५ महिला मतदार आहेत. पहिल्या दोन तासांत २१७ मतदारांनी हक्क बजावला: ​एकूण मतदान:…

Read More

साईमत -जळगाव- प्रतिनिधी | जळगाव विधान परिषद निवडणुकीच्या मतदानादरम्यान आज एका वेगळ्याच वादाने तोंड वर काढले आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार शरद तायडे यांनी मतदान केंद्रावर पुरवण्यात आलेल्या पेनच्या विश्वासार्हतेवरच थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. मतदान केंद्रात ठेवण्यात आलेला पेन हा ‘मॅजिक पेन’ असल्याचा संशय तायडे यांनी व्यक्त केल्याने राजकीय वर्तुळात आणि प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी आता थेट निवडणूक आयोगाकडे अधिकृत तक्रार करण्यात आली आहे. ​नेमका आक्षेप काय? ​मतदान प्रक्रिया सुरू असताना शरद तायडे यांनी मतदान केंद्रावरील पेनबाबत संबंधित निवडणूक अधिकाऱ्यांकडे विचारणा केली. “हा मॅजिक पेन तर नाही ना?” असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला. अशा प्रकारच्या पेनने केलेली…

Read More

साईमत ​-जळगाव -प्रतिनिधी | जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीच्या एका जागेसाठी आज सकाळपासूनच राजकीय वातावरण कमालीचे तापले असून, मतदानाला कमालीच्या उत्साहात सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील ७ मतदान केंद्रांवर कडेकोट पोलीस बंदोबस्तात ही प्रक्रिया पार पडत असून, संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष आता या हायव्होल्टेज लढतीकडे लागले आहे. ​या निवडणुकीत एकूण ६३० मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून, यंदाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे मतदारांमध्ये ३१५ पुरुष आणि ३१५ महिला अशी समसमान संख्या आहे. त्यामुळे महिला मतदारांची भूमिका या निवडणुकीत किंगमेकर ठरणार असल्याचे दिसते. ​’बॅलेट पेपर’चा नवा ट्रेंड; तरुण नगरसेवकांचा उत्साह ​जळगाव तहसील कार्यालयातील मतदान केंद्रावर आज एक वेगळाच उत्साह पाहायला मिळाला. स्थानिक…

Read More

सीसीटीव्हीमुळे हरवलेले सोन्याचे दागिने काही तासांतच परत बाजारपेठ पोलिसांची कामगिरी साईमत/भुसावळ / प्रतिनिधी रेल्वे स्थानक परिसरात हरवलेले सुमारे एक तोळा सोन्याचा हार आणि ३ ग्रॅम वजनाच्या कानातील रिंग बाजारपेठ पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने अवघ्या काही वेळात शोधून काढत मूळ मालकाच्या ताब्यात दिल्याची उल्लेखनीय घटना घडली आहे. पोलिसांच्या जलद आणि प्रभावी कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे. भोपाल (मध्यप्रदेश) येथील अशपाक कुरेशी हे भुसावळ रेल्वे स्थानक परिसरातून छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळून मोटारसायकलने जात असताना त्यांच्या ताब्यातील सोन्याचे दागिने रस्त्यात पडून हरवले. काही वेळाने दागिने गायब झाल्याचे लक्षात येताच त्यांनी तातडीने बाजारपेठ पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. तक्रारीची गांभीर्याने दखल घेत पोलीस…

Read More

साईमत -जळगाव- प्रतिनिधी | पंतप्रधान आवास योजनेतून घर मंजूर झालंय, पण अजूनही बांधकाम रडत-खडत सुरू आहे? तर मग आता सावधान! कारण जळगाव जिल्हा परिषदेच्या धडाकेबाज मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) करिश्मा नायर यांनी आता थेट ‘ॲक्शन मोड’ ऑन केला आहे. जिल्ह्यातील एकही पात्र लाभार्थी हक्काच्या घरापासून वंचित राहू नये, यासाठी त्यांनी थेट लाभार्थ्यांच्या घरांवर धडक देण्याची धडाकेबाज मोहीम हाती घेतली आहे! आकडा वाचून थक्क व्हाल! पंतप्रधान आवास योजना टप्पा-१ अंतर्गत जिल्ह्यात तब्बल 76,754 घरकुलांना मंजुरी मिळाली होती. त्यापैकी बहुतांश घरं चकाचक तयार झाली आहेत, पण… अजूनही 5,949 घरकुलं अपूर्ण अवस्थेत लटकलेली आहेत. हाच प्रलंबित आकडा संपवण्यासाठी आता प्रशासनाने कंबर कसली आहे.केवळ…

Read More