साईमत -जळगाव- प्रतिनिधी | शहरातील धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनी विद्यालयात लोकसेवक बाळासाहेब मधुकरराव चौधरी यांच्या भव्य पुतळ्याचा अनावरण सोहळा अत्यंत उत्साहात आणि मान्यवरांच्या मांदियाळीत पार पडला. भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या शुभहस्ते या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. लोकसेवक बाळासाहेब मधुकरराव चौधरी यांनी सामाजिक, शैक्षणिक आणि सार्वजनिक जीवनात दिलेले योगदान अतुलनीय आहे. त्यांच्या याच महान कार्याच्या स्मृतींना या पुतळ्याच्या माध्यमातून उजाळा मिळाला असून, त्यांचा वैचारिक वारसा नव्या पिढीसाठी नेहमीच प्रेरणादायी ठरेल, अशी भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली. या सोहळ्याला राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती. यामध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, माजी…
Author: Bharati Bharsake
साईमत -जळगाव- प्रतिनिधी | “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर केलेले खोटे बोलण्याचे आरोप म्हणजे निव्वळ ‘चोराच्या उलट्या बोंबा’ आहेत,” असा जोरदार पलटवार काँग्रेसचे नेते हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. जळगावात माध्यमांशी बोलताना त्यांनी फडणवीसांच्या जुन्या विधानांची आणि बदलेल्या भूमिकांची आठवण करून देत भाजपवर सडकून टीका केली. जळगावातील धनाजी नाना विद्या प्रबोधिनी येथे स्वर्गीय चौधरी यांच्या पुतळ्याचा अनावरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी आलेले हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातील सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांच्या मालिकेवर काँग्रेसची आक्रमक भूमिका मांडली. ’त्या’ विधानांचे काय झाले? सपकाळांचा सवाल देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधताना सपकाळ म्हणाले, “वेगळा विदर्भ…
बिल मंजूर करण्यासाठी आणि मोजमाप पुस्तिकेत नोंद करण्यासाठी मागितली होती लाच दोघा अभियंत्यांवर चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल साईमत -चाळीसगाव – प्रतिनिधी | जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता यथार्थ पांडुरंग निनावे आणि स्थापत्य अभियांत्रिकी सहायक कुलदिप विरूचंद गमे या दोघांना ७ हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात पकडले. धुळे एसीबीच्या पथकाने चाळीसगाव येथे रचलेल्या सापळ्यात हे दोन्ही अधिकारी अडकले असून, या कारवाईमुळे शासकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. तक्रारदार यांच्या मित्राने पंधराव्या वित्त आयोगांतर्गत रस्ता काँक्रिटीकरण आणि गाव हाडाचे काम केले होते. या कामाचे बिल मंजूर करण्यासाठी तसेच मोजमाप पुस्तिकेत (Measurement Book) नोंद करण्यासाठी…
साईमत -जळगाव- प्रतिनिधी | सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स (सिटू), जळगावतर्फे येथील खूबचंद सागरमल विद्यालय येथे बांधकाम व घरेलू कामगारांच्या विद्यार्थी पाल्यांसाठी शैक्षणिक सहाय्यता कार्यक्रमांतर्गत मोफत वह्यांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले. मोबाईलचा मर्यादित व विधायक वापर करा : अमोल कोल्हे व्यासपीठावरील प्रमुख अतिथी व मानवी हक्क संरक्षण व जागृती संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमोल कोल्हे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, ”विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम, शिस्त व प्रामाणिकपणाच्या बळावर शिक्षणात यश मिळवावे. शिक्षकांच्या आदेशांचे…
जीपीएस मित्रपरिवार, झुंझुनवाला हॉस्पिटल आणि शिवसेना यांचा स्तुत्य उपक्रम; १३४ नागरिकांची झाली तपासणी साईमत -नशिराबाद- प्रतिनिधी येथील आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गरजू नागरिकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या मोफत नेत्रतपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. जीपीएस मित्रपरिवार, आर. आर. झुंझुनवाला हॉस्पिटल आणि नशिराबाद शहर शिवसेना यांच्या संयुक्त विद्यमाने या आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरात नशिराबाद व परिसरातील एकूण १३४ नागरिकांची अत्याधुनिक उपकरणांद्वारे नेत्रतपासणी करण्यात आली. या तपासणीदरम्यान ५४ रुग्णांना मोतीबिंदू असल्याचे निदान झाले. या सर्व रुग्णांना पुढील शस्त्रक्रियेसाठी तातडीने लक्झरी बसद्वारे पनवेल येथील आर. आर. झुंझुनवाला हॉस्पिटलमध्ये रवाना करण्यात आले आहे. या रुग्णांवर पुढील दोन दिवसांत पूर्णपणे मोफत…
साईमत -अमळनेर- प्रतिनिधी | शहरात मंगळवारी सायंकाळी एक अत्यंत हृदयद्रावक आणि मन हेलावून टाकणारी घटना घडली. चोपडा रस्त्यावरील उड्डाणपुलाजवळ असलेल्या एका पाण्याने भरलेल्या खदाणीत बुडून तीन निष्पाप मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे अमळनेर शहरासह सिंधी कॉलनी परिसरावर शोककळा पसरली असून, सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. मानव बंटी रतनानी (वय १४), कार्तिक विकी उधवानी (वय १४) आणि दिनेश विजय पंजवानी (वय १७) अशी मृत मुलांची नावे आहेत. तिघेही एकाच परिसरातील रहिवासी असल्याने सिंधी कॉलनीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मित्राला वाचवण्याच्या प्रयत्नात तिघांवरही काळाचा घाला मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मंगळवारी सायंकाळी हे तिन्ही मित्र चोपडा रस्त्यावरील खदाण परिसरात फिरण्यासाठी गेले होते. खदाणीत…
वारंवार तक्रारी करूनही नगरपरिषद सुस्त; आंदोलनाचा इशारा साईमत -नशिराबाद -प्रतिनिधी | ‘विकास’ कोणासाठी आणि कसा असावा, याचा उत्तम नमुना सध्या नशिराबाद शहरात पाहायला मिळत आहे. अमृत योजनेअंतर्गत पाईपलाईन टाकण्यासाठी गणेश नगर आणि न्यू इंग्लिश स्कूलजवळील न्यू प्लॉट परिसरात रस्ते खोदण्यात आले. मात्र, काम संपून महिने उलटले तरी कंत्राटदाराने रस्ते पूर्ववत केले नाहीत. परिणामी, पहिल्याच पावसात या परिसराला चिखलाच्या दलदलीचे स्वरूप आले असून, नागरिक आणि चिमुरड्या विद्यार्थ्यांना रोज नरकयातना सहन कराव्या लागत आहेत. विशेष म्हणजे, नगरपरिषदेने अवघ्या वर्षभरापूर्वीच या भागात लाखो रुपये खर्च करून नवीन रस्ते चकाचक केले होते. मात्र, ‘एक कडे करायचे आणि दुसऱ्याने ते उखडायचे’ या शासकीय नियोजशून्यतेचा फटका…
ओबीसी, व्हीजेएनटी आणि एसबीसी प्रवर्गातील तरुणांसाठी सुवर्णसंधी नागपूर/जळगाव : इतर मागासवर्गीय (OBC), विमुक्त जाती-भटक्या जमाती (VJNT) आणि विशेष मागास प्रवर्ग (SBC) या प्रवर्गातील तरुणांना खाकी वर्दीचे स्वप्न पूर्ण करता यावे, यासाठी महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेने (महाज्योती) मोठे पाऊल उचलले आहे. महाज्योतीतर्फे सन २०२६-२७ या वर्षासाठी पोलिस व मिलिटरी भरती पूर्व परीक्षेचे पूर्णपणे मोफत आणि ऑफलाइन प्रशिक्षण दिले जाणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत १० जुलै २०२६ असून, पात्र व गरजू तरुणांनी तातडीने अर्ज करावेत, असे आवाहन राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे जळगाव तालुका अध्यक्ष मनोज नाले यांनी केले आहे. योजनेचे स्वरूप आणि पात्रता ही योजना…
खोटेनगर परिसरात चावरा स्कूलचा नवा विस्तार! साईमत -जळगाव -प्रतिनिधी | गुणवत्तेच्या जोरावर शैक्षणिक क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या तरसोद येथील चावरा इंटरनॅशनल स्कूलच्या नवीन शाखेचा विस्तार आता शहरात झाला आहे. खोटेनगर (पंडित कॉर्नर) परिसरात सोमवार, ६ जुलै रोजी अत्यंत उत्साहपूर्ण आणि भारावलेल्या वातावरणात या नवीन शाखेचे भव्य उद्घाटन संपन्न झाले. चावरा मिशनचे मॅनेजर फादर जॉय वटोली यांच्या शुभहस्ते फित कापून या नव्या ज्ञानमंदिराचे लोकार्पण करण्यात आले. तत्पूर्वी, भारतीय परंपरेनुसार त्यांचे औक्षण करून स्वागत करण्यात आले. या सोहळ्याला चावरा इंटरनॅशनल स्कूलचे मुख्याध्यापक फादर जोबी यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून राजेंद्र पाटील, फादर सीजो आणि फादर जेरीन व्यासपीठावर…
साईमत -जळगाव- प्रतिनिधी | पाचोरा शहरातील जळगाव-भडगाव रोडवर मध्यरात्रीच्या सुमारास एक अत्यंत भीषण आणि काळजाचा थरकाप उडवणारा कार अपघात घडला आहे. चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार थेट रस्त्याशेजारील झाडावर जाऊन आदळली. या भीषण अपघातात जळगाव चौफुली येथील चेतन सुकदेव हटकर (वय २२) या तरुण गमावल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. तर कारमधील इतर दोन मित्र गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मंगळवारी ७ जुलै रोजी मध्यरात्री साडेबारा वाजेच्या सुमारास (MH 03 AW 9107) क्रमांकाची कार पाचोरा शहरातील भडगाव रोडवरील अरिहंत ऑटोमोबाईल्स दुकानासमोरून जात असताना हा अपघात झाला. चालकाचा कारवरील ताबा सुटल्याने कार अत्यंत…