Author: Sharad Bhalerao

साईमत, भडगाव : प्रतिनिधी तालुक्यातील पिंपळगाव बु. येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी पुणे दर्शन सहलीचे नुकतेच आयोजन केले होते. सहलीचा आर्थिक भार गावातील निस्वार्थ भावनेने समाजाची सेवा करणारे शांताराम पोपट पाटील यांचे चिरंजीव भारत पाटील यांनी उचलून सहलीचे आयोजन आणि नियोजन करणे सहज शक्य झाले. भारत पाटील यांनी केलेल्या दातृत्वाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. पुणे येथे विद्यार्थ्यांची दोन दिवस सहल घेऊन जाणे म्हणजे प्रती विद्यार्थी किमान दोन हजार रुपये खर्च अपेक्षित होता. परंतु एवढा खर्च ग्रामीण भागातील जि. प. शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांना पेलवणारा नव्हता. अशावेळी गावातील शाळेचे माजी विद्यार्थी तथा इंजिनिअर भारत पाटील (ह.मु.पुणे) यांनी सहलीसाठी पुढाकार…

Read More

साईमत, यावल : प्रतिनिधी येथील नगरपरिषद संचलित येथील साने गुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात इयत्ता बारावी परीक्षा सुरू असल्याने यावल तहसीलदार मोहनमाला नाझीरकर, यावल पो.स्टे.चे एपीआय हरिष भोये यांनी व पोलीस पथकाने सोमवारी, २६ फेब्रुवारी २०२४ रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास अचानक भेट देऊन तपासणी केल. परीक्षार्थींना ब्लॉकमधील खिडकीतून कॉपी येते कशी आणि सुपरवायझर काय बघतात..? आणि काय करतात..? याबाबतची तपासणी करून महत्त्वाच्या सूचना दिल्या. यावेळी केंद्रप्रमुख एम.के.पाटील, सुपरवायझर संबंधित उपस्थित होते. यावल पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी धनके यांच्या दुर्लक्षपणामुळे आणि शाळांवर त्यांचे नियंत्रण नसल्याने परीक्षा केंद्राअंतर्गत गोपनीय हालचालींवर नियंत्रण नसल्याचे तसेच परीक्षा केंद्राबाहेर मात्र पोलीस बंदोबस्त कडक असल्याने केंद्राबाहेर…

Read More

साईमत, मुक्ताईनगर : प्रतिनिधी केंद्र सरकारने बाजार समितीच्या धोरणात बदल करून निवडणुका न घेता कायमस्वपरूपी प्रशासकाची नेमणूक करून कारभार चालविण्याचा निर्णय हा देशातील शेतकऱ्यांच्या अधिकारावर गदा आणणारा आहे. त्यामुळे केंद्र सरकारने तातडीने हा निर्णय मागे घ्यावा, अन्यथा सोमवारी, २६ फेब्रुवारी रोजी राज्यातील बाजार समित्या बंद ठेवून निर्णयास विरोध करण्याचे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केले होते. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये कडकडीत बंद पाळला असल्याची माहिती स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष डॉ. विवेक सोनवणे यांनी दिली. केंद्र सरकार कृषी धोरणाबाबत अनेक चुकीचे निर्णय घेत आहे. ज्यामुळे देशातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले आहे. सध्या केंद्र सरकारने देशातील बाजार समित्यांच्या निवडणुका…

Read More

साईमत, लोहारा, ता.पाचोरा : वार्ताहर येथील धी शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडद्वारा संचलित डॉ.जे.जी.पंडित माध्यमिक विद्यालयाला नाशिक विभागाचे शिक्षक आ.किशोर दराडे यांनी नुकतीच भेट दिली. सुरुवातीला त्यांच्या हस्ते आचार्य बापूसाहेब गजाननराव गरुड यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करुन पूजन करण्यात आले. त्यानंतर सहविचार सभा घेण्यात आली. अध्यक्षस्थानी संस्थेचे व्हा.चेअरमन भीमराव शेळके होते. यावेळी स्थानिक सल्लागार समितीचे अध्यक्ष कृषीभूषण विश्‍वासराव पाटील, उपाध्यक्ष ए.ए.पटेल, माध्यमिक पतपेढीचे माजी अध्यक्ष संभाजी पाटील, पत्रकार दिलीप चौधरी, दीपक पवार उपस्थित होते. यावेळी भीमराव शेळके, संभाजी पाटील, ए.ए.पटेल, मुख्याध्यापक एस.टी.चिंचोले यांनी मनोगत व्यक्त केले. विद्यालयाच्यावतीने आ.किशोर दराडे यांचा मुख्याध्यापकांनी शाल व पुष्पगुच्छ तसेच आचार्य बापूसाहेब गजाननराव गरुड यांची…

Read More

साईमत, भडगाव : प्रतिनिधी येथील सुतार समाज मंडळातर्फे प्रभू विश्‍वकर्मा यांच्या जयंतीनिमित्त प्रभू विश्‍वकर्माची पालखी मिरवणूक नुकतीच उत्साहात काढण्यात आली. यावेळी प्रभू विश्‍वकर्मा यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून पूजन करण्यात आले. यावेळी ग्रामउद्योग सहकारी संस्थेचे चेअरमन सुनील मिस्तरी यांना आरतीचा मान देण्यात आला. पालखी मिरवणुकीत समाजबांधवांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. पालखीच्या मिरवणुकीला भवानी बाग परिसरातून सुरुवात होऊन साई मंदिर, बाळद रोड भडगाव येथे सांगता झाली. पालखी मिरवणुकीत भडगाव-पाचोरा मतदारसंघाचे आ.किशोर पाटील, भाजपाचे पाचोरा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे, माजी आमदार दिलीप वाघ, निर्मल सीडसच्या संचालिका वैशाली सूर्यवंशी, भाजपाचे भडगाव तालुकाध्यक्ष सोमनाथ पाटील, स्व.बापूजी युवा फाउंडेशनचे संस्थापक लकीचंद पाटील, भाजपाचे शहराध्यक्ष नरेंद्र पाटील,…

Read More

साईमत, पाळधी, ता.धरणगाव : वार्ताहर येथील श्रीराम ज्येष्ठ नागरिक मंडळातर्फे दरमहा मोफत आरोग्य नेत्र शिबिर घेण्यात येते. नुकत्याच घेण्यात आलेल्या शिबिरात ३५ मोतीबिंदू रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यात १५ रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी जळगाव येथील कांताई रुग्णालय येथे रवाना करण्यात आले. शिबिरात चामुंडा माता होमिओपॅथिक महाविद्यालयाच्यावतीने आरोग्य तपासणी करण्यात येऊन एक महिन्यासाठी औषधांचे रुग्णांना मोफत वाटप करण्यात आले. यावेळी एरंडोल येथील प्रवीण महाजन यांनी ‘बाप नावाचा माणूस’ विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. यशस्वीतेसाठी मंडळाचे अध्यक्ष शरदचंद्र कासट यांच्यासह सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.

Read More

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी तालुक्यातील पातोंडा येथील शिवसेना महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष तथा ग्रामपंचायतीच्या सदस्य मनीषा महाजन यांच्या संकल्पनेतून पातोंडासह परिसरातील महिलांसाठी होम मिनिस्टर आणि हळदी कुकुंवाचा कार्यक्रम नुकताच उत्साहात पार पडला. यावेळी हजारोंच्या संख्येने महिलांची उपस्थिती होती. महिलांनी हा कार्यक्रम नव्हे तर उत्सव म्हणून साजरा केला. यानिमित्त विजेत्या महिलांसाठी आकर्षक भेटवस्तू, पैठणी असे वेगवेगळे बक्षीसही देण्यात आले. कार्यक्रमासाठी वैशाली गुंजाळ, अभिलाषा रोकडे, छाया पाटील, सुमित्रा महाजन, कविता महाजन, प्रणाली पवार, प्रतिभा पवार, अनिता शिंदे, कविता साळवे, शोभा परदेशी, अश्‍विनी चौधरी, सुवर्णा चव्हाण, वंदना पाटील, अनिता पाटील, सुवर्णा राजपूत, पल्लवी पाटील, सविता मोरे, संगीता भील, ज्योस्त्ना अहिरे, रत्ना पिलोरे, सीमा पवार,…

Read More

साईमत, अमळनेर : प्रतिनिधी कुठल्याही आजाराचे लवकर निदान झाल्यास तो पूर्णपणे बरा होऊ शकतो, ही सकारात्मक भावना डोळ्यासमोर ठेवून मंगळग्रह सेवा संस्था आणि नाशिक येथील एचसीजी मानवता कॅन्सर सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने श्री मंगळग्रह मंदिर परिसरात रविवारी, २५ फेबु्रवारी रोजी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले होते. शिबिराचा अमळनेर शहर, तालुक्यासह उत्तर महाराष्ट्रातील विविध ठिकाणच्या शेकडो रुग्णांनी लाभ घेतला. त्यात तज्ज्ञ डॉक्टरांकडून रुग्णांची तपासणीसह उपचार, निदान तसेच मार्गदर्शन करण्यात आले. सुरूवातीला श्री मंगळग्रह देवतेचे विधीवत पूूजन करुन शिबिराचा प्रारंभ करण्यात आला. मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले यांनी जनरल सर्जन डॉ. प्रशांत सूर्यवंशी आणि स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. प्रियंका सूर्यवंशी, उपाध्यक्ष…

Read More

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी संत निरंकारी मिशनच्यावतीने (रजि. दिल्ली) सद्गुरु माता सुदिक्षाजी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने सद्गुरु बाबा हरदेवसिंगजी महाराज यांच्या जन्मदिनानिमित्त गुरुपूजा दिवसाचे औचित्य साधून रविवारी, २५ फेब्रुवारी २०२४ रोजी ‘स्वच्छ जल, स्वच्छ मन’ या आदर्श घोषवाक्यातून प्रेरणा घेत चाळीसगाव शाखेच्यावतीने पाटणादेवी परिसरात स्वच्छता अभियानाचा उपक्रम राबविण्यात आला. अवघ्या भारतवर्षात अशी परियोजना जवळपास १ हजार ५०० पेक्षा अधिक ठिकाणी २७ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांतील ९०० शहरांमध्ये एकाचवेळी राबविण्यात आली. परियोजनेचा मुख्य उद्देश जलसाठ्यांचे संरक्षण, त्यांची स्वच्छता व जनसामान्यांमध्ये याविषयी जागरूकता अभियान राबवून त्यांना प्रोत्साहित करणे आहे. संत निरंकारी मिशन सामाजिक व कल्याणकारी उपक्रमांमध्ये निरंतर आपली सक्रिय भूमिका बजावत वृक्षारोपण, रक्तदान…

Read More

साईमत, चोपडा : प्रतिनिधी येथील भगिनी मंडळ संचालित ललित कला केंद्रातील प्रा. संजय मनोहर नेवे यांची केरळमधील एरनाड नॉलेज सिटी (मंजेरी) येथे होणाऱ्या ‘नासा इंडिया’ संस्थेच्या वार्षिक अधिवेशनासाठी निवड झाली आहे. त्यांनाही अधिवेशनासाठी निमंत्रित केले आहे. नासा (नॅशनल असोसिशन ऑफ स्टुडंट्स ऑफ आर्किटेक्चर) ही आर्किटेक्चर शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची जगातील सर्वात मोठी संघटना आहे. त्यात ७० हजारांपेक्षा अधिक विद्यार्थी सदस्य आहेत. ते जगभरातील ३२० महाविद्यालयातून शिक्षण घेत आहेत. संघटनेच्या २९ फेब्रुवारी ते ३ मार्च दरम्यान केरळमधील एरनाड नॉलेज सिटी येथे होणाऱ्या ६६ व्या वार्षिक अधिवेशनासाठी कला प्रकारातील मार्गदर्शक म्हणून प्रा. संजय नेवे यांची निवड करण्यात आली. अधिवेशनात दक्षिण आशियाई (सार्क) आठ देशांमधील…

Read More