पातोंडासह परिसरातील महिलांसाठी ‘होम मिनिस्टर’ कार्यक्रमाला प्रतिसाद

0
2

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी

तालुक्यातील पातोंडा येथील शिवसेना महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष तथा ग्रामपंचायतीच्या सदस्य मनीषा महाजन यांच्या संकल्पनेतून पातोंडासह परिसरातील महिलांसाठी होम मिनिस्टर आणि हळदी कुकुंवाचा कार्यक्रम नुकताच उत्साहात पार पडला. यावेळी हजारोंच्या संख्येने महिलांची उपस्थिती होती. महिलांनी हा कार्यक्रम नव्हे तर उत्सव म्हणून साजरा केला. यानिमित्त विजेत्या महिलांसाठी आकर्षक भेटवस्तू, पैठणी असे वेगवेगळे बक्षीसही देण्यात आले.

कार्यक्रमासाठी वैशाली गुंजाळ, अभिलाषा रोकडे, छाया पाटील, सुमित्रा महाजन, कविता महाजन, प्रणाली पवार, प्रतिभा पवार, अनिता शिंदे, कविता साळवे, शोभा परदेशी, अश्‍विनी चौधरी, सुवर्णा चव्हाण, वंदना पाटील, अनिता पाटील, सुवर्णा राजपूत, पल्लवी पाटील, सविता मोरे, संगीता भील, ज्योस्त्ना अहिरे, रत्ना पिलोरे, सीमा पवार, भावना पाटील, सुरेखा पाटील, कल्पना पाटील, सुवर्णा रोकडे, रत्ना पाटील यांच्यासह सर्व बचत गट, अंगणवाडी सेविका, आशासेविका तसेच महिला उपस्थित होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here