भडगावात प्रभू विश्‍वकर्मा जयंती उत्साहात साजरी

0
7

साईमत, भडगाव : प्रतिनिधी

येथील सुतार समाज मंडळातर्फे प्रभू विश्‍वकर्मा यांच्या जयंतीनिमित्त प्रभू विश्‍वकर्माची पालखी मिरवणूक नुकतीच उत्साहात काढण्यात आली. यावेळी प्रभू विश्‍वकर्मा यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून पूजन करण्यात आले. यावेळी ग्रामउद्योग सहकारी संस्थेचे चेअरमन सुनील मिस्तरी यांना आरतीचा मान देण्यात आला. पालखी मिरवणुकीत समाजबांधवांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. पालखीच्या मिरवणुकीला भवानी बाग परिसरातून सुरुवात होऊन साई मंदिर, बाळद रोड भडगाव येथे सांगता झाली.

पालखी मिरवणुकीत भडगाव-पाचोरा मतदारसंघाचे आ.किशोर पाटील, भाजपाचे पाचोरा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे, माजी आमदार दिलीप वाघ, निर्मल सीडसच्या संचालिका वैशाली सूर्यवंशी, भाजपाचे भडगाव तालुकाध्यक्ष सोमनाथ पाटील, स्व.बापूजी युवा फाउंडेशनचे संस्थापक लकीचंद पाटील, भाजपाचे शहराध्यक्ष नरेंद्र पाटील, भाजपा शहराध्यक्ष (पश्‍चिम) मुन्ना परदेशी, हर्षल पाटील, विशाल (पप्पू) पाटील, समाजाचे पदाधिकारी, सुतार व लोहार समाजाचे अध्यक्ष तसेच ग्रामउद्योग सहकारी संस्थेचे व्हा.चेअरमन सुधाकर जाधव, सुतार समाजाचे जळगाव जिल्हा उपाध्यक्ष विठोबा मिस्तरी, ज्येष्ठ सल्लागार शिवाजी वाडेकर, बालू वाडेकर, विजय मिस्तरी, बापूराव शार्दुल (पत्रकार), शरद हिरे, सुरेश बोरसे, शरद निकम, मधुकर वाडेकर (फौजी), शरद निकम, शिवाजी शार्दुल, उत्तम शार्दुल, किरण देवरे, नाना जाधव, युवा अध्यक्ष हेमंत वाडेकर, भाजपा कार्यकर्ता योगेश शेलार, एकनाथ लोहार, श्‍याम बागुल, यशवंत सुतार, महेंद्र देवरे, संजय खैरनार, रवींद्र वाडेकर, दत्तू वाडेकर, धर्मा वाडेकर यांच्यासह सर्व समाज बांधव, महिला उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here