साईमत, यावल : प्रतिनिधी
येथील नगरपरिषद संचलित येथील साने गुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात इयत्ता बारावी परीक्षा सुरू असल्याने यावल तहसीलदार मोहनमाला नाझीरकर, यावल पो.स्टे.चे एपीआय हरिष भोये यांनी व पोलीस पथकाने सोमवारी, २६ फेब्रुवारी २०२४ रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास अचानक भेट देऊन तपासणी केल. परीक्षार्थींना ब्लॉकमधील खिडकीतून कॉपी येते कशी आणि सुपरवायझर काय बघतात..? आणि काय करतात..? याबाबतची तपासणी करून महत्त्वाच्या सूचना दिल्या. यावेळी केंद्रप्रमुख एम.के.पाटील, सुपरवायझर संबंधित उपस्थित होते. यावल पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी धनके यांच्या दुर्लक्षपणामुळे आणि शाळांवर त्यांचे नियंत्रण नसल्याने परीक्षा केंद्राअंतर्गत गोपनीय हालचालींवर नियंत्रण नसल्याचे तसेच परीक्षा केंद्राबाहेर मात्र पोलीस बंदोबस्त कडक असल्याने केंद्राबाहेर परीक्षार्थींना कॉपी पुरविणाऱ्यांची कोणतीही गर्दी दिसून आली नाही. त्यामुळे यावलच्या तहसीलदार नाझिरकर यांना समाधान व्यक्त करून मात्र परीक्षा केंद्र संचालक यांना महत्त्वाच्या सूचना दिल्या.
इयत्ता बारावीचे विद्यार्थी पास व्हायलाच पाहिजे याबद्दल यावलकरांचे, समाजाचे दुमत नाही आणि राहणार नाही. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक संस्कारयुक्त भविष्याची चिंता आम्हाला पण आहे. परीक्षा केंद्रप्रमुख यांचे परीक्षा केंद्रावरील कामकाज कौतुकास्पद असेल तर त्यांना सर्व प्रसिद्धी माध्यमांना एकाच वेळेला माहिती द्यायला काय हरकत आणि अडचण होती? परीक्षा केंद्राच्या बाहेर प्रश्नपत्रिका येते कुठून? आणि झेरॉक्सच्या दुकानावर यात्रा भरते कशी? आणि परीक्षा केंद्र अंतर्गत काय हालचाली आहे हे पुन्हा सांगावे लागेल का? त्याचा विचार आंधळ्या परीक्षा वर्तुळाने केला नाही का? प्रसिद्धी माध्यम प्रतिनिधी हे परीक्षा केंद्रप्रमुख आणि शिक्षणाधिकारी धनके यांना विविध प्रश्न विचारतील म्हणून त्यांनी फक्त आपल्या खास विश्वासातील काही शिक्षकांचे नावे पुढे करून आंधळ्या प्रवृत्तीच्या माध्यमातून आपली चमकोगिरी करून घेतल्याने मात्र आता यावल शहरात सर्व स्तरात परीक्षा केंद्राबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहे. त्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे. याबाबत भारतीय जनसंसदचे जळगाव जिल्हाध्यक्ष यांच्यामार्फत आधारित चौकशी आणि कारवाई करण्यासंदर्भात लेखी स्वरुपात मागणी केली जाणार आहे.
याबाबत कोणाला काही शंका आणि पोपट पंछी समोरासमोर (पाठीमागे नव्हे) करायची असेल तर त्यांनी प्रत्यक्ष संपर्क साधून व्हिडिओ क्लिप, छायाचित्र बघितल्यास त्यांची आंधळी दृष्टी दूर होऊ शकते.