आरोग्य तपासणी शिबिराचा शेकडो रुग्णांनी घेतला लाभ

0
2

साईमत, अमळनेर : प्रतिनिधी

कुठल्याही आजाराचे लवकर निदान झाल्यास तो पूर्णपणे बरा होऊ शकतो, ही सकारात्मक भावना डोळ्यासमोर ठेवून मंगळग्रह सेवा संस्था आणि नाशिक येथील एचसीजी मानवता कॅन्सर सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने श्री मंगळग्रह मंदिर परिसरात रविवारी, २५ फेबु्रवारी रोजी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले होते. शिबिराचा अमळनेर शहर, तालुक्यासह उत्तर महाराष्ट्रातील विविध ठिकाणच्या शेकडो रुग्णांनी लाभ घेतला. त्यात तज्ज्ञ डॉक्टरांकडून रुग्णांची तपासणीसह उपचार, निदान तसेच मार्गदर्शन करण्यात आले.

सुरूवातीला श्री मंगळग्रह देवतेचे विधीवत पूूजन करुन शिबिराचा प्रारंभ करण्यात आला. मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले यांनी जनरल सर्जन डॉ. प्रशांत सूर्यवंशी आणि स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. प्रियंका सूर्यवंशी, उपाध्यक्ष एस. एन. पाटील यांनी विपणन व्यवस्थापक प्रवीण खरे, डॉ. एपीजे अब्दुल कलाम फाउंडेशनच्या मनीषा चौधरी तसेच परिचारिका यशोदा साबळे, मिरीयम राऊत, वॉर्ड मावशी सुहासिनी, चालक शिवराम देशमुख यांचा यथोचित सत्कार केला. यावेळी तपासणीसाठी आलेल्या रुग्णांसह मंगल सेवेकरी व्ही. व्ही. कुलकर्णी, विनोद कदम, पुषंद ढाके यांच्यासह मंदिराचे सेवेकरी उपस्थित होते.

शिबिरात सर्व रुग्णांची रक्तदाब, मधुमेह तपासणीनंतर महिलांमधील लघवी, शरीरातील विविध गाठी, गर्भाशयातील विविध विकार तसेच पुरुषांमधील विविध आजारांची लक्षणे लक्षात घेऊन त्यांच्यावर उपचार करण्यासह शस्त्रक्रियेसंदर्भात तज्ज्ञ डॉक्टरांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी डॉ. महाले यांनी शिबिर घेण्यामागचा उद्देश विशद केला. सूत्रसंचालन मंगळग्रह सेवा संस्थेचे सहसचिव दिलीप बहिरम यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here