शिक्षक आ.किशोर दराडे यांची लोहारा विद्यालयाला भेट

0
17

साईमत, लोहारा, ता.पाचोरा : वार्ताहर

येथील धी शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडद्वारा संचलित डॉ.जे.जी.पंडित माध्यमिक विद्यालयाला नाशिक विभागाचे शिक्षक आ.किशोर दराडे यांनी नुकतीच भेट दिली. सुरुवातीला त्यांच्या हस्ते आचार्य बापूसाहेब गजाननराव गरुड यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करुन पूजन करण्यात आले. त्यानंतर सहविचार सभा घेण्यात आली. अध्यक्षस्थानी संस्थेचे व्हा.चेअरमन भीमराव शेळके होते. यावेळी स्थानिक सल्लागार समितीचे अध्यक्ष कृषीभूषण विश्‍वासराव पाटील, उपाध्यक्ष ए.ए.पटेल, माध्यमिक पतपेढीचे माजी अध्यक्ष संभाजी पाटील, पत्रकार दिलीप चौधरी, दीपक पवार उपस्थित होते.

यावेळी भीमराव शेळके, संभाजी पाटील, ए.ए.पटेल, मुख्याध्यापक एस.टी.चिंचोले यांनी मनोगत व्यक्त केले. विद्यालयाच्यावतीने आ.किशोर दराडे यांचा मुख्याध्यापकांनी शाल व पुष्पगुच्छ तसेच आचार्य बापूसाहेब गजाननराव गरुड यांची प्रतिमा आणि त्यांच्या जीवनावर आधारित पुस्तक भेट देऊन सत्कार केला. विद्यालयाचे कलाशिक्षक पी.ए.सोनार यांनी आ.किशोर दराडे यांचे रंगीत खडूच्या साह्याने पोट्रेट (व्यक्तिचित्र) चित्र काढले. त्याबद्दल त्यांनी पी.ए.सोनार यांचा सत्कार केला.

यावेळी आ.किशोर दराडे यांनी शिक्षकांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी आश्‍वासन दिले. तसेच शिक्षकांना जुनी पेन्शन योजना मंजूर व्हावी, यासाठी राबविलेले कार्यक्रम याविषयी माहिती दिली. प्रत्येक शाळेसाठी वेगळ्या प्रकारे भेटवस्तू निधीतून उपलब्ध करून देणार असल्याचेही आश्‍वासन दिले. कार्यक्रमाला विद्यालयाच्या उपमुख्याध्यापिका यु.डी.शेळके, पर्यवेक्षक पी.एम.सुर्वे यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन तथा आभार बी.एन.पाटील यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here