साईमत, पाळधी, ता.धरणगाव : वार्ताहर
येथील श्रीराम ज्येष्ठ नागरिक मंडळातर्फे दरमहा मोफत आरोग्य नेत्र शिबिर घेण्यात येते. नुकत्याच घेण्यात आलेल्या शिबिरात ३५ मोतीबिंदू रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यात १५ रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी जळगाव येथील कांताई रुग्णालय येथे रवाना करण्यात आले.
शिबिरात चामुंडा माता होमिओपॅथिक महाविद्यालयाच्यावतीने आरोग्य तपासणी करण्यात येऊन एक महिन्यासाठी औषधांचे रुग्णांना मोफत वाटप करण्यात आले. यावेळी एरंडोल येथील प्रवीण महाजन यांनी ‘बाप नावाचा माणूस’ विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. यशस्वीतेसाठी मंडळाचे अध्यक्ष शरदचंद्र कासट यांच्यासह सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.