साईमत, जामनेर : प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त येत्या शुक्रवारी, १५ फेब्रुवारी ते ३० एप्रिलपर्यंत ना. गिरीष महाजन यांच्या प्रेरणेने कमल फाउंडेशनतर्फे आयोजित कमल हॉस्पिटल व मॅटर्निटी होम येथे भव्य रोगनिदान तथा शस्त्रक्रिया शिबिर द्वैमासिक सप्ताहाचे आयोजन केले आहे. शिबिरात संपूर्ण दोन महिने रुग्णांच्या विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया तसेच विविध आजारांवर मोफत तसेच अल्पदरात उपचार केले जातील. त्यात जे उपचार व शस्त्रक्रिया महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना तसेच प्रधानमंत्री जन आरोग्य योजना त्याचप्रमाणे महाराष्ट्र पोलीस कुटुंब कल्याण आरोग्य योजनेअंतर्गत येत असतील तर ते संपूर्णपणे मोफत केले जातील. तसेच ज्या रुग्णांकडे प्रायव्हेट विमा कंपन्यांचे कॅशलेस हेल्थ…
Author: Sharad Bhalerao
साईमत, अमळनेर : प्रतिनिधी येथील मंगळग्रह सेवा संस्था संचलित श्री मंगळग्रह मंदिर परिसरात १ ते ३ मार्च दरम्यान श्री कालभैरव, श्री भैरवीमाता, श्री दत्तगुरू व श्री अनघामाता या मूर्तींची विधिवत प्राणप्रतिष्ठा पार पडत आहे. विशेष म्हणजे विश्वात कोठेही नसतील अशा आकाराची मंदिरे मंगळग्रह मंदिर परिसरात उभारली आहेत. त्यामुळे अमळनेर शहराच्या सौंदर्यात आणखीनच भर पडली आहे. आजच्या पूजेसाठी अमळनेर उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील नंदवाळकर, जळगावच्या गोदावरी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, शिवसेनेचे धुळे जिल्हाप्रमुख (बाळासाहेब ठाकरे गट) सतीश महाले यांची विशेष उपस्थिती होती. शनिवारी, २ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ ते दुपारी १२ प्रथम सत्रात प्रात:पूजन, जलयात्रा, वास्तूशांती शांतीक पौष्टिक हवन…
साईमत, यावल : प्रतिनिधी येथील नगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात नगरपरिषद बांधकाम विभागामार्फत गटारीवरील बांधण्यात आलेले ढापे अत्यंत निकृष्ट दर्जाचे, मंजूर प्लॅन इस्टिमेटप्रमाणे बांधकाम होत नसल्याने ५ ते ६ महिन्यात गटारीवरील ढापे तुटत आहे. सिमेंट काँक्रीटचे काही रस्ते तसेच डांबरीकरणाच्या काही रस्त्यांवर सिल्कोट काम न केल्यामुळे कामे अपूर्ण आहेत. फैजपूर रस्त्यावर जलकुंभाची नवीन पाईपलाईन गेल्या महिन्यापासून लिक झाल्याने दररोज लाखो लिटर पिण्याचे पाणी वाया जात आहे. साफसफाई स्वच्छता विभाग, वाहन विभाग घनकचरा विभागात मोठा आर्थिक घोळ आहे. त्याकडे संबंधित शासकीय अधिकाऱ्यांसह आणि काही आजी-माजी लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत असल्याचे चर्चिले जात आहे. शहरातील न्यू व्यासमुनी नगरमध्ये नगरे सर यांच्या घरासमोर तसेच गादी भांडार शेजारी…
साईमत, मलकापूर : प्रतिनिधी नांदुरा तालुक्यातील वडनेर गावातील विद्यार्थी शिक्षणासाठी नांदुरा, मलकापूर याठिकाणी जातात. परंतु रा. प.महामंडळाच्या बसेस वडनेर याठिकाणी न थांबता उड्डाणपुलावरून निघुन जातात. परिणामी शिक्षणासाठी बाहेरगावी ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. असाच काही प्रकार वडनेर येथील विद्यार्थिनी यांच्यासोबत वारंवार घडत आहे. त्यामुळे अपूर्वा अढाव ह्या विद्यार्थिनीने शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे नेते वसंतराव भोजने यांना सांगितले. विद्यार्थिनींच्या समस्येच्या निराकरणासाठी भोजने यांनी मलकापूर शिवसेना महिला आघाडीच्या युवती सेना पदाधिकारी निकिता चांभारे, महिला आघाडीच्या मंदाकिनी पाटील, दीपक चांभारे पाटील, कृष्णा मेसरे यांना कळविले. यानंतर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मलकापूरचे आगार प्रमुख नावकर यांचे कार्यालय गाठले. वडनेर येथे बस थांबत…
साईमत, धानोरा ता. चोपडा : वार्ताहर गेल्या अनेक दिवसांपासून खान्देशात उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. कडक उन्हाचा तडाखा चांगलाच बसत आहे. अशातच उन्हाचा लाभ ग्रामीण भागातील महिला कुरडया, पापड, वड्या, शेवया तयार करण्यासाठी घेत आहेत. त्याची लगबग सर्वत्र जोरात सुरु झाली आहे. सध्या ग्रामीण भागात जिकडे/तिकडे घरगुती खाण्याचे कुरड्या, पापड करण्याचे काम प्रत्येक गावात सुरू आहे. प्रत्येक गावातील महिला आपल्या गल्लीतील महिला एकमेकांना सहकार्य करुन उडिदाच्या दाळीचे पापड, बिबड्या, चिकनीचे पापड, शेवया, गव्हाच्या शेवया, नागलीचे पापड, तांदुळ, गव्हाचे पापड आदी सामान करताना दिसत आहेत. हा सामान एक वर्षाचा असतो. ह्या वस्तु करतांना फार काळजी घ्यावी लागते. कुरड्या, पापड मार्केटलाही मिळतात.…
साईमत, अमळनेर : प्रतिनिधी शहरातील महाराणा प्रताप चौकात भारतीय जनता पार्टीतर्फे टीएमसी खासदार व संदेशखाली (पश्चिम बंगाल) हिंसेचा मुख्य आरोपी शाहजहा शेख याला ‘जोडे मारो’ आंदोलन करण्यात आले. यावेळी ममता बॅनर्जी यांच्या सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी अनेक घोषणा देत ममता बॅनर्जी सरकारवर हल्लाबोल करण्यात आला. यावेळी भाजपाचे शहराध्यक्ष विजय राजपूत, हरचंद लांडगे, शितल देशमुख, उमेश वाल्हे, भारती सोनवणे, महिला मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्ष संध्या शाह, ॲड. रमाकांत माळी, रितेश जैन, सरचिटणीस दिलीप ठाकूर, गोकुळ परदेशी, उपाध्यक्ष सुभाष पाटील, कैलास भावसार, दीपक भोई, चंद्रकांत कंखरे, कमल कोचर, समाधान पाटील, गोकुळ पाटील, गणेश बडगुजर, पंकज भोई, देवा लांडगे, सौरभ पाटील, कल्पेश…
साईमत, चोपडा : प्रतिनिधी येथील सकल सोनार समाज आणि संत नरहरी फाउंडेशन यांच्यावतीने श्री संत नरहरी महाराज पुण्यतिथी सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी नरहरी महाराजांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून पालखीचे पूजन करण्यात आले. यानिमित्त शहरातून निघालेल्या पालखी मिरवणुकीत समाजबांधवांनी उत्साहात सहभाग घेतला होता. याप्रसंगी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. त्यात आराध्या वानखेडे, अंकिता सोनार, मयुरी भामरे, हर्षल सोनार, यश वाखारकर, प्रसन्न जडे, साहिल सोनार, जान्हवी विसपुते, मनुश्री रनाळकर, निकिता सोनार यांचा समावेश होता. तसेच समाजातील यशवंत व किर्तीवंत व्यक्तींचाही सत्कार करण्यात आला. त्यात संदीप सोनार, प्रशांत सोनार, संजय बागुल, राकेश विसपुते, रत्नमाला दुसाने, कार सेवक अनिल वानखेडे यांचा समाजाच्यावतीने…
साईमत, जामनेर : प्रतिनिधी तालुक्यातील चिंचखेडा बु. येथील जि. प. शाळेस ‘पेहल दि इनिटिएटर’ सामाजिक संस्थेचे सचिव येथील रहिवाशी भूषण पाटील यांच्या माध्यमातून आपल्या गावातील विद्यार्थ्यांना इंटरनेटचा वापर करून जगाची माहिती व्हावी, त्यांना जिल्हा परिषद शाळेतच कॉम्प्युटरची ओळख व्हावी या उदात्त हेतूने व गावातील शाळेचे आणि समजाचे आपण काही देणे लागतो या भावनेतून त्यांनी शाळेस संगणकीय शिक्षणासाठी ४ लॅपटॉप भेट म्हणून दिले. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप खोडपे उपस्थित होते. विद्यार्थ्यांना प्राथमिक शाळेपासूनच कॉम्प्युटर हाताळून उत्तम शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली तर ते उत्तुंग भरारी घेतील, असे प्रतिपादन श्री. खोडपे यांनी केले. विद्यार्थ्यांना तंत्रशुद्ध शिक्षण मिळावे, म्हणून ‘पेहल दि…
साईमत, पहुर, ता.जामनेर : वार्ताहर जळगाव जैन स्पोर्ट्स अकॅडमी आणि जळगाव जिल्हा तायक्वांदो असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित प्रथमच जिल्हास्तरीय शालेय जैन चॅलेंज चषक जिंकून सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाने तायक्वांदो स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला आहे. द्वितीय क्रमांक ऐनपूरचे सरदार वल्लभभाई पटेल माध्यमिक विद्यालय तर तृतीय क्रमांक जळगावचे अनुभूती इंटरनॅशनल निवासी स्कुलने पटकाविला आहे. जळगाव येथील अनुभूती इंटरनॅशनल निवासी स्कुल येथे झालेल्या जैन चॅलेंज चषक स्पर्धेचे उद्घाटन अनुभूती इंटरनॅशनल निवासी स्कुलचे प्राचार्य देबासीस दास यांनी केले. यावेळी संचालिका निशा जैन, स्पोर्ट्स अकॅडमीचे सचिव रवि धर्माधिकारी, जिल्हा तायक्वांदेो असोसिएशनचे सचिव अजित घारगे यांच्या हस्ते जैन चॅलेंज चषक ट्रॉफी देऊन शाळांना सन्मानित करण्यात…
साईमत, पाळधी, ता.धरणगाव : वार्ताहर आपल्या परिसरातील गरजू रुग्णांसाठी मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया अभियान हा पाळधी पँटर्न राज्यभरात आदर्श ठरेल, असा विश्वास धरणगाव पंचायत समितीचे माजी सभापती मुकूंदराव नन्नवरे यांनी व्यक्त केला. शिवसेना (शिंदे गट) मागासवर्गीय सेनेचे जिल्हाप्रमुख मुकुंदराव नन्नवरे, जीपीएस परिवार, गुलाबराव पाटील फाउंडेशन, मुक्ती फाउंडेशनचे अध्यक्ष मुकुंद गोसावी यांच्या माध्यमातून धरणगाव तालुक्यातील पाळधी येथे भव्य नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराचे विशेष आयोजन केले होते. त्यानंतर जळगाव येथे पात्र रुग्णांच्या मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आल्या. त्याप्रसंगी ते बोलत होते. मागील आठवड्यात पाळधी येथे झालेल्या भव्य मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरातील पहिल्या टप्प्यात आज अर्धशतक मोतीबिंदू नेत्र शस्त्रक्रिया झालेल्या…