चोपड्यात संत नरहरी महाराज पुण्यतिथी सोहळा साजरा

0
1

साईमत, चोपडा : प्रतिनिधी

येथील सकल सोनार समाज आणि संत नरहरी फाउंडेशन यांच्यावतीने श्री संत नरहरी महाराज पुण्यतिथी सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी नरहरी महाराजांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून पालखीचे पूजन करण्यात आले. यानिमित्त शहरातून निघालेल्या पालखी मिरवणुकीत समाजबांधवांनी उत्साहात सहभाग घेतला होता.

याप्रसंगी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. त्यात आराध्या वानखेडे, अंकिता सोनार, मयुरी भामरे, हर्षल सोनार, यश वाखारकर, प्रसन्न जडे, साहिल सोनार, जान्हवी विसपुते, मनुश्री रनाळकर, निकिता सोनार यांचा समावेश होता. तसेच समाजातील यशवंत व किर्तीवंत व्यक्तींचाही सत्कार करण्यात आला. त्यात संदीप सोनार, प्रशांत सोनार, संजय बागुल, राकेश विसपुते, रत्नमाला दुसाने, कार सेवक अनिल वानखेडे यांचा समाजाच्यावतीने सत्कार करण्यात आला.

यावेळी ‘नक्षत्र ज्वेलर्सचे’ संचालक नितीन अहिरराव यांच्यावतीने कै. आबासाहेब पंढरीनाथ कृष्णा अहिरराव यांच्या स्मरणार्थ समाजरत्न व समाजभूषण पुरस्कार वितरित करण्यात आले. त्यात सुशिला सोनार, प्रभाकर सोनार आणि मुकुंदा दुसाने यांचा ‘समाज रत्न’ पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. तसेच मानाचा ‘समाजभूषण’ पुरस्कार ज्येष्ठ विधीतज्ज्ञ ॲड. अशोक जाधव यांना देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी सोनार समाज बांधव उपस्थित होते. तसेच प्रा. आशा पोतदार यांच्यावतीने महाप्रसादाचे आयोजन केले होते.

यशस्वीतेसाठी संस्थेचे अध्यक्ष विलास सोनार, उपाध्यक्ष नितीन अहिरराव, सचिव डॉ. विजय जाधव, खजिनदार रवींद्र वानखेडे, रवींद्र विसपुते, भटू विसपुते, मुकुंदा दुसाने, अनिल वानखेडे, श्‍याम सोनार, श्रीराम सोनार, भूषण बागुल, राकेश विसपुते, रोहित सोनार आदींनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन तथा आभार डॉ. विजय जाधव यांनी मानले.

 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here