ग्रामीण भागात कुरडया, पापड तयार करण्यासाठी महिलांची लगबग

0
2

साईमत, धानोरा ता. चोपडा : वार्ताहर

गेल्या अनेक दिवसांपासून खान्देशात उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. कडक उन्हाचा तडाखा चांगलाच बसत आहे. अशातच उन्हाचा लाभ ग्रामीण भागातील महिला कुरडया, पापड, वड्या, शेवया तयार करण्यासाठी घेत आहेत. त्याची लगबग सर्वत्र जोरात सुरु झाली आहे.

सध्या ग्रामीण भागात जिकडे/तिकडे घरगुती खाण्याचे कुरड्या, पापड करण्याचे काम प्रत्येक गावात सुरू आहे. प्रत्येक गावातील महिला आपल्या गल्लीतील महिला एकमेकांना सहकार्य करुन उडिदाच्या दाळीचे पापड, बिबड्या, चिकनीचे पापड, शेवया, गव्हाच्या शेवया, नागलीचे पापड, तांदुळ, गव्हाचे पापड आदी सामान करताना दिसत आहेत. हा सामान एक वर्षाचा असतो. ह्या वस्तु करतांना फार काळजी घ्यावी लागते. कुरड्या, पापड मार्केटलाही मिळतात. मात्र, त्याची पाहिजे तसा स्वाद लागत नाही. त्यामुळे आजही ग्रामीण भागातील ह्या सामानाची चवही एक वेगळ्या प्रकारची स्वाद पूर्ण असते. आपल्या ग्रामीण भागातल्या विविध प्रकारचे पापड, शेवया यांना शहरात मोठी मागणी कायम आहे.

महिला बचत गट घरच्या घरी ह्या सर्व वस्तुंमध्ये सर्वसामान माफशीर टाकून स्वादिष्ट बनवून शहरात विक्रीसाठी पाठवितात. त्यात त्यांना चांगले पैसे राहतात. प्रत्येक सणाला गोडधोड करुन खाण्याची आपली पध्दत असल्याने वर्षभर पुरेल इतका सामान महिला मंडळ या दिवसामध्ये एकमेकांच्या सहकार्याने बनवित असतात. ही कामे करीत असतांना वृध्द महिलांचा सल्ला घेतात. तसेच विविध अहिराणी गाणे म्हणतात. हाच सामान लग्नात नवरदेवाला पारावर देण्यातही वापरतात. बाहेरगावी पुणे, मंबुई, सुरत याठिकाणी आपल्या नातेवाईकांकडे पाठवित असतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here