चिंचखेडा बु.जि.प.शाळेस सामाजिक संस्थेतर्फे ४ लॅपटॉप भेट

0
2

साईमत, जामनेर : प्रतिनिधी

तालुक्यातील चिंचखेडा बु. येथील जि. प. शाळेस ‘पेहल दि इनिटिएटर’ सामाजिक संस्थेचे सचिव येथील रहिवाशी भूषण पाटील यांच्या माध्यमातून आपल्या गावातील विद्यार्थ्यांना इंटरनेटचा वापर करून जगाची माहिती व्हावी, त्यांना जिल्हा परिषद शाळेतच कॉम्प्युटरची ओळख व्हावी या उदात्त हेतूने व गावातील शाळेचे आणि समजाचे आपण काही देणे लागतो या भावनेतून त्यांनी शाळेस संगणकीय शिक्षणासाठी ४ लॅपटॉप भेट म्हणून दिले. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप खोडपे उपस्थित होते. विद्यार्थ्यांना प्राथमिक शाळेपासूनच कॉम्प्युटर हाताळून उत्तम शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली तर ते उत्तुंग भरारी घेतील, असे प्रतिपादन श्री. खोडपे यांनी केले. विद्यार्थ्यांना तंत्रशुद्ध शिक्षण मिळावे, म्हणून ‘पेहल दि इनिटिएटर’ सामाजिक संस्थेच्या उपक्रमाचे कौतुक करत त्यांनी आभार व्यक्त केले.

चिंचखेडे बु.येथील रहिवाशी आणि ‘पेहल दि इनिटिएटर’ संस्थेचे सचिव भूषण पाटील आणि माजी सरपंच युवराज पाटील यांच्या सहकार्याने जि.प.प्राथमिक शाळा चिंचखेडे बु. येथे विद्यार्थ्यांना संगणकीय शिक्षणासाठी चार लॅपटॉप आणि एक टॅब देणगी रुपाने मिळाला. शाळेतील गरजुंच्या मुलांसाठी ‘पेहल दि इनिटिएटर’ संस्थेमार्फत मिळालेले साहित्य विद्यार्थ्यांना अध्यापनात फार उपयोगी होणार आहे. ही शाळा आपले सदैव ऋणात राहील, असे प्रतिपादन मुख्याध्यापक नथू माळी यांनी केले. यावेळी चिंचखेडा बु.चे ग्रामस्थ उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here