वडनेरला बसेस थांबत नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान

0
2

साईमत, मलकापूर : प्रतिनिधी

नांदुरा तालुक्यातील वडनेर गावातील विद्यार्थी शिक्षणासाठी नांदुरा, मलकापूर याठिकाणी जातात. परंतु रा. प.महामंडळाच्या बसेस वडनेर याठिकाणी न थांबता उड्डाणपुलावरून निघुन जातात. परिणामी शिक्षणासाठी बाहेरगावी ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. असाच काही प्रकार वडनेर येथील विद्यार्थिनी यांच्यासोबत वारंवार घडत आहे. त्यामुळे अपूर्वा अढाव ह्या विद्यार्थिनीने शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे नेते वसंतराव भोजने यांना सांगितले. विद्यार्थिनींच्या समस्येच्या निराकरणासाठी भोजने यांनी मलकापूर शिवसेना महिला आघाडीच्या युवती सेना पदाधिकारी निकिता चांभारे, महिला आघाडीच्या मंदाकिनी पाटील, दीपक चांभारे पाटील, कृष्णा मेसरे यांना कळविले.

यानंतर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मलकापूरचे आगार प्रमुख नावकर यांचे कार्यालय गाठले. वडनेर येथे बस थांबत नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. याबाबत निदर्शनात आणुन देत न थांबणाऱ्या बसेसच्या चालक व वाहक यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करत ही समस्स्या निकाली काढण्याबाबत चर्चा करण्यात आली. आगार प्रमुख नावकर यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली जाईल, असे आश्‍वासन दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here