जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत शौर्य स्पोर्ट्स अकॅडमीच्या खेळाडूंचे यश

0
2

साईमत, पहुर, ता.जामनेर : वार्ताहर

जळगाव जैन स्पोर्ट्स अकॅडमी आणि जळगाव जिल्हा तायक्वांदो असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित प्रथमच जिल्हास्तरीय शालेय जैन चॅलेंज चषक जिंकून सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाने तायक्वांदो स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला आहे. द्वितीय क्रमांक ऐनपूरचे सरदार वल्लभभाई पटेल माध्यमिक विद्यालय तर तृतीय क्रमांक जळगावचे अनुभूती इंटरनॅशनल निवासी स्कुलने पटकाविला आहे.

जळगाव येथील अनुभूती इंटरनॅशनल निवासी स्कुल येथे झालेल्या जैन चॅलेंज चषक स्पर्धेचे उद्घाटन अनुभूती इंटरनॅशनल निवासी स्कुलचे प्राचार्य देबासीस दास यांनी केले. यावेळी संचालिका निशा जैन, स्पोर्ट्स अकॅडमीचे सचिव रवि धर्माधिकारी, जिल्हा तायक्वांदेो असोसिएशनचे सचिव अजित घारगे यांच्या हस्ते जैन चॅलेंज चषक ट्रॉफी देऊन शाळांना सन्मानित करण्यात आले.

स्पर्धेतील यशस्वी पदक विजेत्यांमध्ये पहूर कसबे सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयातील सुवर्ण पदकाचे मानकरी मोहिनी राऊत, जागृती चौधरी, सतिष क्षीरसागर, भावेश निकम, रौप्य पदकाचे मानकरी स्नेहल सपकाळ, प्रांजली धनगर, जयश्री घोंगडे, श्रावणी लोहार, वेदांत क्षीरसागर, कार्तिक सोनवणे, निलेश मालकर, आयान पिंजारी, ईशांत चौधरी, कांस्य पदकाचे मानकरी हर्षदा उबाळे, माहेश्‍वरी धनगर, हर्षदा सोनवणे, यश राऊत, ऋषभ चौधरी, जिज्ञेस सोनवणे तर अभिमन्यू घोंगडे, रुद्र उबाळे, भावेश महाजन यांचा उत्कृष्ट सहभाग राहिला. पहूर कसबेच्या डॉ.हेडगेवार प्राथमिक विद्यालयातील परी गायकवाड सिल्व्हर मेडल, पल्लवी गायकवाड ब्रान्झ मेडल, प्रेम साखरे ब्रान्झ मेडल, पहुरच्या महावीर पब्लिक स्कुलमधील दिशा धनसिंग गोल्ड मेडल, आरुषी कुमावत ब्रान्झ मेडल, शेंदुर्णीतील आ.ग.र.ग.गरुड महाविद्यालयातील स्वाती चौधरी गोल्ड मेडल, बेस्ट फायटर अवार्ड, प्रणव बनकर ब्रान्झ मेडल, शेंदुणीतील सरस्वती प्राथमिक विद्यामंदिरातील अंकिता उबाळे सिल्वर मेडल, दुर्गेश साखरे ब्रान्झ मेडल, पहुरच्या आर.टी.लेले हायस्कुलमधील तेजस्विनी दातार ब्रान्झ मेडल, कुंदन कुमावत, प्रकाश कुमावत सहभाग, जामनेरातील लॉर्ड गणेशा इंग्लिश स्कुलच्या स्वरा पाटील ब्रान्झ मेडल, दिव्या वानखेडे सहभाग यांचा समावेश आहे.

सर्व यशस्वी खेळाडूंना सावित्रीबाई फुले विद्यालयाचे क्रीडा शिक्षक हरीभाऊ राऊत, सिनिअर कोच ईश्‍वर क्षीरसागर, भूषण मगरे यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल यशस्वी खेळाडुंचे शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, पालक, विद्यार्थ्यांनी कौतुक केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here