अमळनेरला भाजपातर्फे टीएमसी खासदाराला ‘जोडे मारो’ आंदोलन

0
2

साईमत, अमळनेर : प्रतिनिधी

शहरातील महाराणा प्रताप चौकात भारतीय जनता पार्टीतर्फे टीएमसी खासदार व संदेशखाली (पश्‍चिम बंगाल) हिंसेचा मुख्य आरोपी शाहजहा शेख याला ‘जोडे मारो’ आंदोलन करण्यात आले. यावेळी ममता बॅनर्जी यांच्या सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
यावेळी अनेक घोषणा देत ममता बॅनर्जी सरकारवर हल्लाबोल करण्यात आला.

यावेळी भाजपाचे शहराध्यक्ष विजय राजपूत, हरचंद लांडगे, शितल देशमुख, उमेश वाल्हे, भारती सोनवणे, महिला मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्ष संध्या शाह, ॲड. रमाकांत माळी, रितेश जैन, सरचिटणीस दिलीप ठाकूर, गोकुळ परदेशी, उपाध्यक्ष सुभाष पाटील, कैलास भावसार, दीपक भोई, चंद्रकांत कंखरे, कमल कोचर, समाधान पाटील, गोकुळ पाटील, गणेश बडगुजर, पंकज भोई, देवा लांडगे, सौरभ पाटील, कल्पेश पाटील, रितेश सोनवणे, राजेश खरारे यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here