मंगळग्रह मंदिरात नूतन मूर्तींच्या प्राणप्रतिष्ठा महासोहळ्यांतर्गत जलयात्रा, धान्याधिवास पूजन

0
14

साईमत, अमळनेर : प्रतिनिधी

येथील मंगळग्रह सेवा संस्था संचलित श्री मंगळग्रह मंदिर परिसरात १ ते ३ मार्च दरम्यान श्री कालभैरव, श्री भैरवीमाता, श्री दत्तगुरू व श्री अनघामाता या मूर्तींची विधिवत प्राणप्रतिष्ठा पार पडत आहे. विशेष म्हणजे विश्‍वात कोठेही नसतील अशा आकाराची मंदिरे मंगळग्रह मंदिर परिसरात उभारली आहेत. त्यामुळे अमळनेर शहराच्या सौंदर्यात आणखीनच भर पडली आहे. आजच्या पूजेसाठी अमळनेर उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील नंदवाळकर, जळगावच्या गोदावरी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, शिवसेनेचे धुळे जिल्हाप्रमुख (बाळासाहेब ठाकरे गट) सतीश महाले यांची विशेष उपस्थिती होती.

शनिवारी, २ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ ते दुपारी १२ प्रथम सत्रात प्रात:पूजन, जलयात्रा, वास्तूशांती शांतीक पौष्टिक हवन भक्तिमय वातावरणात पार पडले. पूजेसाठी उपविभागीय पोलीस अधीक्षक सुनील नंदवाळकर, संजय पुनाजी पाटील, आशिष चौधरी, महेंद्र माळी, रोहित सिंघवी, विनोद थोरात, मनोज बारी, राहुल शांताराम सोनवणे, शालीक पंडीत बहिरम, दिलीप आत्माराम बहिरम आणि निलेश भांडारकर आदी तर दुपारी २ ते सायंकाळी ६ द्वितीय सत्रात मुख्य देवता हवन, मंदिर व मूर्ती स्थापन, तत्वन्यास, धान्यादीवास, शय्याधीवास, सायंपूजा होऊन आरती झाली. पूजेसाठी गोदावरी फाउंडेशन जळगावचे संस्थापक अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, रवींद्र बोरसे, पंकज पाटील, संजय प्रल्हाद बाविस्कर, शिवसेनेचे (बाळासाहेब ठाकरे गट) धुळे जिल्हाप्रमुख सतीश महाले, डॉ. प्रशांत शिंदे, अरुण भावसार, नितीन कोल्हे, मधुकर सोनार, मनोहर पाटील आणि खा. शि. मंडळाचे अध्यक्ष जितेंद्र झाबक हे सपत्नीक पूजेचे मानकरी होते.

पूजेसाठी वेदमूर्ती केशव पुराणिक शास्त्री, सागर कुलकर्णी शास्त्री, प्रतीक मुळे शास्त्री, प्रसाद साठे शास्त्री, वैभव जोशी शास्त्री, प्रसाद भंडारी शास्त्री, तुषार दीक्षित शास्त्री, जयेंद्र वैद्य शास्त्री, गणेश जोशी शास्त्री, अक्षय जोशी शास्त्री, मंदार कुलकर्णी शास्त्री, चंद्रकांत जोशी शास्त्री, विनोद पाठक शास्त्री, हेमंत गोसावी शास्त्री, नरेंद्र उपासनी शास्त्री, सारंग पाठक शास्त्री, सुनील मांडे शास्त्री, व्यंकटेश कळवे शास्त्री आदी पुरोहितांनी पौरोहित्य केले.

महासोहळ्याच्या पार्श्‍वभूमीवर संपूर्ण मंदिर परिसर केळीचे खांब, आंब्यांच्या पानांची तोरणे, भगवे ध्वज, पताका, विविध फुले व माळा आदींनी आकर्षकरित्या सजला असल्याने ते दर्शन व पूजा-अभिषेकासाठी आलेल्या भाविकांचे आकर्षण ठरले. पूजा-विधीवेळी अधूनमधून गायिली जाणारी देवादिकांची स्तवन गीते व भक्तिगीते यामुळे उपस्थित मंत्रमुग्ध झाले. याप्रसंगी वेंकिज इंडिया प्रा. लि. लिमिटेड कंपनीतर्फे शुद्ध गावरान तुपातील मोतीचूर लाडू प्रसाद म्हणून भाविकांना दिवसभर वाटप करण्यात आले.

यशस्वीतेसाठी मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले, उपाध्यक्ष एन. एन. पाटील, सचिव एस. बी. बाविस्कर, सहसचिव दिलीप बहिरम, खजिनदार गिरीश कुलकर्णी, विश्‍वस्त अनिल अहिरराव, जयश्री साबे, मंगल सेवेकरी विनोद कदम, व्ही. व्ही. कुलकर्णी, प्रकाश मेखा, आशा महाले, आनंद महाले, स्वाती महाले, डी. ए. सोनवणे, पुषंद ढाके, उज्ज्वला शहा आदींसह मंदिरातील सेवेकऱ्यांचे सहकार्य लाभले.

महासोहळ्याची रविवारी होणार पूर्णाहुती

रविवारी, ३ मार्च रोजी सकाळी ८ ते दुपारी १२ दरम्यान प्रात: पूजन, देव प्रबोधन, प्रासाद प्रवेश, उत्तरांगहवन, बलिदान, प्राणप्रतिष्ठा, महापूजा, पूर्णाहुती व महाआरती होणार आहे.

खा.रक्षा खडसे यांची विशेष भेट

श्री मंगळग्रह मंदिर परिसरात आयोजित नूतन मूर्तींच्या प्राणप्रतिष्ठा महासोहळा दरम्यान रावेरच्या विद्यमान खा.रक्षा खडसे यांनी विशेष भेट दिली. रक्षा खडसे यांनी मंदिर परिसरात उभारण्यात आलेल्या विश्‍वात कुठेही नसलेल्या अशा आकाराच्या मंदिरांची पाहणी करत मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे केलेल्या नियोजनाचे कौतुक केले. तत्पूर्वी रक्षा खडसे यांनी मंदिरात जाऊन मंगळग्रह देवतांचे दर्शन घेतले. त्यानंतर मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले व विश्‍वस्त मंडळाने त्यांचा शाल, श्रीफळ व मंगल प्रसाद देऊन यथोचित सन्मान केला. यावेळी भाजपाच्या प्रदेश उपाध्यक्षा स्मिता वाघ, भाजपाचे शहराध्यक्ष विजय राजपूत आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here