साईमत, वरणगाव : प्रतिनिधी शासनाच्या माध्यमातून दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांना विविध योजनांचा लाभ दिला जातो. मात्र, यासाठी लाभार्थ्यांना विविध कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामध्ये दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिक लाभार्थ्यांना सर्वाधिक त्रास वरणगावातील जेडीसीसी बँकेतील व्यवस्थापकांच्या ताठर भूमिकेमुळे सहन करावा लागत आहे. त्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे. वरणगाव शहरातील बाजार गल्लीत जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची शाखा सुरू आहे. या शाखेत वरणगाव व परिसरातील श्रावण बाळ, संजय गांधी निराधार योजना, दिव्यांग बांधव, विद्यार्थी, शेतकरी असे किमान दीड हजार खातेदार आहेत. अशा सर्व खातेदारांच्या खात्यावर शासनाच्या माध्यमातून विविध योजनेतंर्गत निधी वर्ग केला जातो. त्यामुळे हा निधी प्राप्त…
Author: Sharad Bhalerao
साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी राज्य सरकारने जाहीर केलेले एसइबीसीचे आरक्षण लागू होण्यासाठी प्रशासन स्तरावर येणाऱ्या अडचणी दूर करून २०२४ ला मराठा समाजाला दिलेल्या एसइबीसी आरक्षणाची अंमलबजावणी करण्यासाठी तात्काळ प्रशासनाला निर्देश देण्यात यावेत. मराठा समाजाच्या नवतरूणांना मराठा जातीचे दाखले तीन दिवसात वितरित करून आगामी होणारी पोलीस भरतीची तारीख एक महिना पुढे करावी, असे न झाल्यास चाळीसगाव सकल मराठा समाजाच्यावतीने शासन, प्रशासनाच्या विरोधात चाळीसगाव तहसील कार्यालयासमोर उग्र स्वरूपाचे आंदोलनाचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे. अशा आशयाचे निवेदन चाळीसगाव प्रांताधिकारी, तहसीलदार यांच्याद्वारे चाळीसगाव सकल मराठा समाजाच्यावतीने शुक्रवारी, २२ रोजी मुख्यमंत्र्यांना दिले आहे. यावेळी जळगाव जिल्हा दूध संघाचे संचालक प्रमोद पाटील, शिवसेनेचे तालुकाप्रमुख रमेश चव्हाण…
साईमत, जळगाव : प्रतिनिधी पाचोरा तालुक्यातील लोहारा येथील मेहुण्याच्या खुनप्रकरणी शालकासह दोघा आरोपींची जळगाव येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. फिर्याद दाखल झाल्यानंतर दोन्ही आरोपींविरुद्ध पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनला भादंवि कलम ३०२, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल होऊन दोन्ही आरोपींना अटक झाली होती. खटल्याच्या सुनावणीचे काम जळगाव येथील जिल्हा व सत्र न्यायालयात चालले. खटल्याकामी १४ साक्षीदार तपासण्यात आले. साक्षीदारांच्या पुराव्यातील तफावती, अविश्वासार्हता, तपासकामातील त्रुटी आदींचा विचार होऊन न्यायालयाने दोन्ही आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. पाचोरा तालुक्यातील लोहारा येथील श्रीमती सुशिला बालचंद्र चौधरी यांनी पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात ९ जानेवारी २०२० रोजी फिर्याद दिली होती. त्यात म्हटले होते की,…
साईमत, पाचोरा : प्रतिनिधी तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयातर्फे ‘आशा डे’ नुकताच उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पाचोरा उपविभागीय अधिकारी डॉ.भूषण अहिरे, श्रीमती डॉ. स्नेहल शेलार (प्रशिक्षणार्थी गटविकास अधिकारी), मंगेश देवरे (मुख्याधिकारी न.पा.पाचोरा), श्री. कुंभार (नायब तहसीलदार), सिद्धीविनायक हॉस्पिटलचे संचालक डॉ. स्वप्निल पाटील, डॉ. ग्रिष्मा पाटील, जीजा राठोड (प्रभारी एकात्मिक बालविकास अधिकारी), समाधान पाटील (गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती, पाचोरा) उपस्थित होते. सुरुवातीला धन्वंतरी पूजनानंतर मंगला पाटील आणि वंदना बडगुजर यांनी स्वागतगीत सादर केले. यावेळी उपस्थित सर्व प्रमुख पाहुण्यांनी आशा स्वयंसेविका यांच्या कार्याचा गौरव केला. प्रास्ताविकात पाचोरा तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.डी.के.लांडे यांनी आशा स्वयंसेविका यांच्यामुळेच राज्यातील माता मृत्यू, अर्भक मृत्यूत…
साईमत, धरणगाव : प्रतिनिधी गेल्या अनेक दिवसांपासून शहरात पिसाळलेल्या कुत्र्यांचा सुळसुळाट वाढला आहे. त्यामुळे शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे. नगर पालिकेने पिसाळलेल्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात यावा, अशा मागणीचे निवेदन पालिका प्रशासनाचे कार्यालयीन अधीक्षक भिकन पारधी यांना नुकतेच देण्यात आले. यावेळी आपल्या गंभीर मागणीचा नक्कीच विचार करण्यात येईल. ही मागणी वरिष्ठापर्यंत पोहचविण्याची हमी पारधी यांनी दिली. गेल्या महिन्याभरात शहरात पिसाळलेल्या कुत्र्यांनी अनेकांना चावा घेतला आहे. अशातच लहान माळी वाडा शेजारील नवेगावात आनंद पाटील यांचा पाच वर्षीय मुलगा घरच्या ओट्यावर खेळत असताना पिसाळलेल्या कुत्र्यांनी हाताला चावा घेऊन गंभीर दुखापत केली. घडलेला प्रकार पाहून परिसरातील असंख्य नागरिक भयभीत झाले. वारंवार होत असलेल्या अशा…
साईमत, मलकापूर : प्रतिनिधी नोकरी मिळत नसल्याने हताश झालेल्या नांदुरा तालुक्यातील शिरसोडीतील शेतकऱ्याच्या मुलाने शेतात एक एकर चंदनाचे झाडे लावून ‘लक्षाधीश’ बनला आहे. शिरसोडी या छोट्याशा गावातून आलेल्या जितेंद्र वानखेडे याचे याबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. चंदनाच्या झाडांच्या लागवडीसाठी अहोरात्र मेहनत घेऊन यशस्वी होण्याचे ज्वलंत उदाहरण सर्वांसमोर ठेवले आहे. त्यामुळे जितेंद्र वानखेडे (रा.शिरसोडी, ता.नांदुरा, जि.बुलढाणा) ह्याची महाराष्ट्रासह कर्नाटक, गुजरात, झारखंड तसेच भारताच्या कानाकोपऱ्यातून शेतातील चंदनाच्या झाडांसाठी यशस्वी उत्तम मार्गदर्शक म्हणून निवड करण्यात आली. तसेच केंद्र शासनाच्या होणाऱ्या चंदन शिबिरासाठी महाराष्ट्रातून जितेंद्र वानखेडे यांची कर्नाटक येथे मार्गदर्शन म्हणून निवड केली आहे. जितेंद्र वानखेडे यांना छत्रपती शिवाजी महाराज प्रेरणा पुरस्कार, उत्तम चंदन…
साईमत, यावल : प्रतिनिधी तालुक्यातील सावखेडासिम ग्रामपंचायतीचे सदस्य लक्ष्मण गणा बडगुजर यांनी ग्रामपंचायतीच्या क्षेत्रात अतिक्रमण केल्याचा निष्कर्ष व विवेचन चौकशीअंती दिसून आले आहेे. त्यामुळे अतिक्रमण करणे भोवल्याने श्री.बडगुजर यांना अपात्र घोषित केल्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी १५ मार्च २०१४ रोजी दिला आहे. ग्रामपंचायत विवाद अर्ज क्र.१७७/२०२३ प्रत्यक्ष बघितला असता ताहेर लतीफ तडवी यांनी दिलेल्या तक्रार अर्जानुसार जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात सुनावणी व चौकशी झाली होती. त्यातील निष्कर्ष व विवेचन यात आढळून आले आहे की, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडील अहवालाचे अवलोकन केल्यावर सावखेडा ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण गणा बडगुजर यांनी सार्वजनिक जागेवर जास्तीचे अतिक्रमण केल्याचे सिध्द होत आहे. याबाबत २२ डिसेंबर २००६ पासून सुधारणा…
साईमत, मुक्ताईनगर : प्रतिनिधी गेल्या आठ महिन्यापासून रिक्त असलेल्या मुक्ताईनगरला अखेर तहसीलदार म्हणून गिरीश वखारे यांची नियुक्ती राज्य शासनाच्या महसूल विभागाने १५ फेब्रुवारी रोजी अध्यादेश काढून केलेली आहे. आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने तहसीलदार संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्या राज्य शासनाच्या महसूल विभागाने केलेल्या आहे. त्यामध्ये श्री.वखारे यांचाही समावेश आहे. गिरीश वखारे हे तळोदा तहसील कार्यालय जिल्हा नंदुरबार येथे कार्यरत होते. गेल्या आठ महिन्यातील नियुक्त झालेले चवथे मुक्ताईनगर तहसीलदार श्री.वखारे यांनी १९ मार्च रोजी पदभार स्वीकारला आहे. श्री.वखारे यांनी २०१० मध्ये मुक्ताईनगर तहसीलमध्ये प्रशिक्षणार्थी तहसीलदार म्हणून काम केलेले आहे. मुक्ताईनगरच्या तत्कालीन तहसीलदार श्वेता संचेती यांची १२ जून २०२३ रोजी त्र्यंबकेश्वर, जि.नाशिक येथे…
साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी येथील नानासाहेब यशवंतराव नारायणराव चव्हाण कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात गणित विभाग, विज्ञान मंडळ आणि आयक्यूएसी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘पाय डे’ निमित्त विज्ञान प्रदर्शन आणि व्याख्यान आयोजित केले होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.आर.जाधव होते. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळ लिमिटेड संस्थेचे सचिव विश्वासराव चव्हाण, उपप्राचार्या डॉ.उज्ज्वल मगर, गणित विभाग प्रमुख प्रा.एस.जी.सोनोने, आय.क्यु.ए.सी.विभाग प्रमुख डॉ. जी.डी.देशमुख, प्रा.के.सी. देशमुख, प्रा.एस.ई.पाटे, विज्ञान मंडळ समितीचे प्रमुख डॉ. करूणा गायकवाड, डॉ.वाय.एम.भोसले, प्रा.संदीप पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमास ३८ भित्तीपत्रके आणि पाच विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे मॉडेल विद्यार्थ्यांनी तयार केले होते. चंद्रयान २, ए आय, इंटेलिजंट आय, सायबर…
साईमत, अमळनेर : प्रतिनिधी अमळनेरला भडगाव आरटीओ ऑफिसला न जोडता पूर्ववत जळगावला जोडावे, अशी मागणी रा.काँ.चे तालुकाध्यक्ष सचिन पाटील, उबाठाचे शहर प्रमुख आनंद निकम यांनी निवेदनाद्वारे केली आहे. अन्यथा, नाईलाजास्तव तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही अमळनेरचे उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारेे दिला आहे. यावेळी कुणाल सूर्यवंशी, दुर्वेश पवार, सचिन वाघ, महेश ठाकरे, किशोर पाटील, नाना पाटील, नारायण पाटील, नरेंद्र पाटील, शकील मुजावर, कैलास पाटील, शालिक साळुंखे, सुशील सोनार यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. अमळनेर तालुका हा पूर्वीपासूनच जळगाव जिल्हा असल्याने आर.टी.ओ.साठी सुरु होते. पण शासनाने जिल्ह्यात भडगाव येथे नवीन विभागीय आरटीओ ऑफिस निर्माण केल्याने अमळनेर हे भडगाव तालुक्यातील आर.टी.ओ. ऑफीसला जोडण्यात आलेले आहे.…