अतिक्रमण करणे भोवले, सावखेडासिमचे ग्रा.पं.सदस्य अपात्र

0
3

साईमत, यावल : प्रतिनिधी

तालुक्यातील सावखेडासिम ग्रामपंचायतीचे सदस्य लक्ष्मण गणा बडगुजर यांनी ग्रामपंचायतीच्या क्षेत्रात अतिक्रमण केल्याचा निष्कर्ष व विवेचन चौकशीअंती दिसून आले आहेे. त्यामुळे अतिक्रमण करणे भोवल्याने श्री.बडगुजर यांना अपात्र घोषित केल्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी १५ मार्च २०१४ रोजी दिला आहे.

ग्रामपंचायत विवाद अर्ज क्र.१७७/२०२३ प्रत्यक्ष बघितला असता ताहेर लतीफ तडवी यांनी दिलेल्या तक्रार अर्जानुसार जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात सुनावणी व चौकशी झाली होती. त्यातील निष्कर्ष व विवेचन यात आढळून आले आहे की, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडील अहवालाचे अवलोकन केल्यावर सावखेडा ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण गणा बडगुजर यांनी सार्वजनिक जागेवर जास्तीचे अतिक्रमण केल्याचे सिध्द होत आहे. याबाबत २२ डिसेंबर २००६ पासून सुधारणा अंमलात आली आहे. ही सुधारणा अंमलात येण्यापूर्वी म्हणजे २१ डिसेंबर २००६ पूर्वी ज्यांनी शासकीय जमिनीवर अतिक्रमण केले होते. ते अतिक्रमण नियमित केले होते. ते अपात्र ठरणार नाहीत. तसेच अर्जदार यांनी ३० जानेवारी २०२४ रोजी प्रतिपत्राद्वारे सामनेवाला यांच्याविरुध्द तक्रार नसल्याबाबत प्रतिज्ञापत्र सुनावणी दरम्यान सादर केलेले आहे. याप्रकरणी त्रयस्त पक्ष यांनी त्यांचे लेखी म्हणणे मांडले आहे. वरील विवेचन पाहता अर्जदार उस्मान रमजान तडवी यांनी तक्रार मागे घेतली असली तरी मुख्य कार्यकारी अधिकारी आणि गटविकास अधिकारी यांच्या अहवालानुसार सामनेवाले यांनी अतिक्रमण केल्याचे सिध्द होते. याप्रकरणी त्रयस्त पक्षकार यांचे म्हणणे मान्य करता येत नाही.

त्यामुळे महाराष्ट्र ग्रामंपचायत अधिनियम १९५९ चे कलम १४-ज-३ नुसार अतिक्रमण धारक सामनेवाला हे ग्रा.पं. सदस्य म्हणून अपात्र ठरत असल्याच्या निष्कर्षात आले असल्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी नमूद करून आदेशाच्या दिनांकपासून महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ चे कलम १४-ज-३ नुसार लक्ष्मण गणा बडगुजर हे ग्रामपंचायत सदस्य म्हणून राहण्यात अपात्र घोषित करण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी १५ मार्च २०२४ रोजी दिल्याने सावखेडासिम ग्रामस्थांमध्ये तसेच तालुक्यातील ग्रामीण भागात खळबळ उडाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here