अमळनेरला भडगाव आरटीओ ऑफिसला न जोडता पूर्ववत जळगावला जोडावे

0
1

साईमत, अमळनेर : प्रतिनिधी

अमळनेरला भडगाव आरटीओ ऑफिसला न जोडता पूर्ववत जळगावला जोडावे, अशी मागणी रा.काँ.चे तालुकाध्यक्ष सचिन पाटील, उबाठाचे शहर प्रमुख आनंद निकम यांनी निवेदनाद्वारे केली आहे. अन्यथा, नाईलाजास्तव तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही अमळनेरचे उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारेे दिला आहे. यावेळी कुणाल सूर्यवंशी, दुर्वेश पवार, सचिन वाघ, महेश ठाकरे, किशोर पाटील, नाना पाटील, नारायण पाटील, नरेंद्र पाटील, शकील मुजावर, कैलास पाटील, शालिक साळुंखे, सुशील सोनार यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

अमळनेर तालुका हा पूर्वीपासूनच जळगाव जिल्हा असल्याने आर.टी.ओ.साठी सुरु होते. पण शासनाने जिल्ह्यात भडगाव येथे नवीन विभागीय आरटीओ ऑफिस निर्माण केल्याने अमळनेर हे भडगाव तालुक्यातील आर.टी.ओ. ऑफीसला जोडण्यात आलेले आहे. त्यामुळे अमळनेर तालुक्यातील नागरिकांची गैरसोय होणार आहे. कारण भडगाव येथे जाण्या-येण्यासाठी पाहिजे तशी सुविधा नाही. तसेच जळगाव हे जिल्ह्याचे ठिकाण असून सर्वसामान्य लोकांचे इतर कामे जसे की, कलेक्टर, पोलीस अधीक्षक व इतर महत्त्वाचे ऑफिसचे कामे एकाच दिवशी एकाच ठिकाणी करु शकतात. तसेच ये-जा करण्यासाठी रेल्वे, बस व इतर सुविधा मुबलक असल्याने जळगाव हे गैरसोईचे होत नाही.

आता हे असे झाले की, नवीन वाहन जळगाव येथील शोरूममध्ये घ्यावे लागेल. त्याला पासिंगसाठी भडगाव येथे घेवून जावे-यावे लागेल. त्यानंतर नागरिकांना अमळनेरला यावे लागेल. त्यामुळे नागरिकांचे आर्थिक तसेच वेळेचे, मानसिक शारिरीक त्रासाला सामोरे जावे लागेल. म्हणून यासाठी अमळनेर तालुका हा पूर्ववत जळगाव आर. टी. ओ.ला जोडण्यात यावे, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here