चाळीसगावला वाय.एन.चव्हाण महाविद्यालयात विज्ञान प्रदर्शनासह व्याख्यान

0
2

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी

येथील नानासाहेब यशवंतराव नारायणराव चव्हाण कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात गणित विभाग, विज्ञान मंडळ आणि आयक्यूएसी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘पाय डे’ निमित्त विज्ञान प्रदर्शन आणि व्याख्यान आयोजित केले होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.आर.जाधव होते. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळ लिमिटेड संस्थेचे सचिव विश्‍वासराव चव्हाण, उपप्राचार्या डॉ.उज्ज्वल मगर, गणित विभाग प्रमुख प्रा.एस.जी.सोनोने, आय.क्यु.ए.सी.विभाग प्रमुख डॉ. जी.डी.देशमुख, प्रा.के.सी. देशमुख, प्रा.एस.ई.पाटे, विज्ञान मंडळ समितीचे प्रमुख डॉ. करूणा गायकवाड, डॉ.वाय.एम.भोसले, प्रा.संदीप पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमास ३८ भित्तीपत्रके आणि पाच विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे मॉडेल विद्यार्थ्यांनी तयार केले होते. चंद्रयान २, ए आय, इंटेलिजंट आय, सायबर सेक्युरिटी, फार्म सेक्युरिटी, रामानुजन पॅराडॉक्स, टेक्नो भारत आदी विषयांवर विद्यार्थ्यांनी विज्ञान प्रदर्शनात प्रकाश टाकला.तसेच एस.वाय.बी.एससीची अर्चना देवरे आणि एस.वाय.बीएससीची भाग्यश्री देसले ह्या विद्यार्थिनींनी ‘पाय डे’ याविषयी अभ्यासपूर्ण माहिती दिली.

कार्यक्रमास राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळ, लिमिटेड संस्थेचे सचिव तथा माजी प्राचार्य विश्‍वासराव चव्हाण म्हणाले की, आजचे युग हे विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे युग आहे. विद्यार्थ्यांनी विज्ञानाने निर्माण केलेल्या उपकरणांसोबत आपल्या विचारांनाही व आचारांनाही विज्ञानाची जोड द्यावी, असा विद्यार्थ्यांना संदेश दिला.

अध्यक्षीय मनोगतात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.आर.जाधव म्हणाले की, विज्ञान आणि तंत्रज्ञान मानवाच्या विकासासाठी आणि देशाच्या प्रगतीसाठी खूपच महत्त्वाचे आहे. विद्यार्थ्यांनी नेहमीच नवनवीन प्रयोग करीत राहिले पाहिजे. त्यासाठी आपल्या अंगी कल्पकता असावी. त्याला ज्ञान-विज्ञानाची जोड द्यावी. आपल्या प्रयत्नाने काहीतरी नवीन निर्माण होईल, असा आशावाद व्यक्त करून विज्ञान मंडळाने केलेल्या कार्याचा आढावा घेतला. परीक्षक म्हणून गणित विभाग प्रमुख प्रा.एस.जी. सोनोने आणि उपप्राचार्या डॉ.उज्ज्वल मगर यांनी काम पाहिले.

कार्यक्रमासाठी प्राचार्य डॉ.एस.आर. जाधव यांनी मार्गदर्शन केले. तसेच उपप्राचार्या डॉ.उज्ज्वल मगर, उपप्राचार्य डॉ.जी.डी.देशमुख यांनी सहकार्य केले. यशस्वीतेसाठी विज्ञान मंडळ प्रमुख डॉ.करुणा गायकवाड, डॉ .के.सी.देशमुख, प्रा.एस.ई.पाटे, डॉ.वाय.एम.भोसले, प्रा.संदीप पाटील, प्रा.के.पी. रामेश्‍वरकर, डॉ. उज्ज्वला नन्नवरे, प्रा. सुवर्णा मोरे, कार्यालयीन अधीक्षक संदीप पवार, प्रकाश बाविस्कर, राजू गायकवाड, कैलास चौधरी, अर्जुन केंदळे, किसन रणदिवे, राजू करंकाळ, आनंद पाटील, विजय वानखेडे यांनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक तथा सूत्रसंचालन प्रतीक्षा अहिरे हिने तर आभार ज्ञानेश्‍वरी देशमुख हिने मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here