पोलीस भरतीला एक महिन्याची मुदतवाढ द्यावी

0
2

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी

राज्य सरकारने जाहीर केलेले एसइबीसीचे आरक्षण लागू होण्यासाठी प्रशासन स्तरावर येणाऱ्या अडचणी दूर करून २०२४ ला मराठा समाजाला दिलेल्या एसइबीसी आरक्षणाची अंमलबजावणी करण्यासाठी तात्काळ प्रशासनाला निर्देश देण्यात यावेत. मराठा समाजाच्या नवतरूणांना मराठा जातीचे दाखले तीन दिवसात वितरित करून आगामी होणारी पोलीस भरतीची तारीख एक महिना पुढे करावी, असे न झाल्यास चाळीसगाव सकल मराठा समाजाच्यावतीने शासन, प्रशासनाच्या विरोधात चाळीसगाव तहसील कार्यालयासमोर उग्र स्वरूपाचे आंदोलनाचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे. अशा आशयाचे निवेदन चाळीसगाव प्रांताधिकारी, तहसीलदार यांच्याद्वारे चाळीसगाव सकल मराठा समाजाच्यावतीने शुक्रवारी, २२ रोजी मुख्यमंत्र्यांना दिले आहे. यावेळी जळगाव जिल्हा दूध संघाचे संचालक प्रमोद पाटील, शिवसेनेचे तालुकाप्रमुख रमेश चव्हाण उपस्थित होते.

याप्रसंगी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण झाल्यास त्यास शासन, प्रशासन जबाबदार राहणार असल्याचा इशाराही निवेदनाद्वारे दिला आहे. निवेदनावर दिलीप पाटील, प्रा.चंद्रकांत ठाकरे, खुशाल पाटील, खुशाल बिडे, प्रशांत गायकवाड, भाऊसाहेब सोमवंशी, राजेंद्र पाटील, स्वप्निल गायकवाड, मुकुंद पवार, भरत नवले, दीपक देशमुख, प्रदीप मराठे, नंदकिशोर पाटील, छोटू अहिरे, मयूर भागवत, शिवाजी गवळी, नितेश पाटील, संदीप पाटील, जालिंदर पठाडे, शरद कुंभार, कैलास देशमुख, प्रकाश गवळी, शुभम अहिरे, सतीश पवार यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here