Author: Saimat

साईमत : जळगाव : प्रतिनिधी क्रीडा व युवक सेवा संचलनालय,महाराष्ट्र राज्य,पुणे,जिल्हा क्रीडा अधिकारी,कार्यालय,जिल्हा क्रीडा परिषद,जळगाव व जळगाव शहर महानगरपालिका,जळगाव द्वारा आयोजित,जळगाव जिल्हा खो-खो असोसिएशनच्या सहकार्याने,जळगाव जिल्हा क्रीडा संघ,येथे पार पडत असलेल्या जिल्हास्तर शालेय खो-खो स्पर्धेत मुलांमध्ये सिध्दीविनायक कनिष्ठ महाविद्यालय तर मुलींमध्ये स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाच्या संघाने विजेतेपद प्राप्त केले. मुलांच्या चुरशीच्या झालेल्या अंतिम सामन्यात सिध्दीविनायक कनिष्ठ महाविद्यालयाने आर.आर.कनिष्ठ महाविद्यालयाचा पराभव करत विजेतेपद प्राप्त केले,आर.आर.कनिष्ठ महाविद्यालयास उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले,तृतीयस्थानी स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाच्या संघाने यश प्राप्त केले,तर मुलींमध्ये स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाने जी.डी.बेंडाळे कनिष्ठ महाविद्यालयाच्या संघास पराभूत करीत विजेतेपद प्राप्त केले तर जी.डी.बेंडाळे कनिष्ठ महाविद्यालयास उपविजेतेपद प्राप्त केले. स्पर्धेचे उद्घाटन…

Read More

साईमत : जळगाव : प्रतिनिधी जिथे फक्त प्रेम आणि प्रेम आहे तो म्हणजे स्वर्ग, आणि मनोबल म्हणजे धरती वरचा स्वर्गच आहे, जिथे समाजातील शेवटच्या घटकाचा विचार हि सर्वात पहिले केला गेला आहे. तुमच्यातील मनोबल बघून आज आमच्या सर्वांचे मनोबल वाढले आहे. भारतातील दिव्यांग, अनाथ आणि वंचित विदयार्थ्यांसाठीच्या या विशेष प्रकल्पात येणाऱ्या काळात आमिर खान यांना तुमच्या सर्वांच्या भेटीसाठी मी नक्की घेऊन येणार अश्या भावना सत्यजीत भटकळ यांनी व्यक्त केल्या. दीपस्तंभ मनोबल प्रकल्पास पाणी फाऊंडेशनच्या टीमने भेट दिली त्या वेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधतांना ते बोलत होते. या प्रसंगी डॉ.अविनाश पोळ, रिना दत्ता, नॅन्सी फर्नांडिस, नन्नवरे सर, डि.एल.मोहिते, ख्रिस्तोपर रेगो, साहिल भट्टड,…

Read More

साईमत : जळगाव : प्रतिनिधी सावखेडा येथील जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूल येथे “इन्वेस्टेचर सेरेमनी” हा शालेय स्तरावरील समारंभ आयोजित करण्यात आला होता. विद्यार्थी दशेतच आगामी नेतृत्व, ठराविक भूमिका व जबाबदाऱ्या सोपवून नेतृत्व गुणांच्या विकासासाठी प्रत्यक्ष अध्ययनाचा विद्यार्थ्यांना अनुभव देण्यासाठी इन्वेस्टीचर सेरीमनी नितांत गरजेची असते. शालेय जीवनात मिळालेल्या या संस्कारांमुळे विद्यार्थ्यांना नेतृत्व प्रबलता येते व आगामी जीवनात संघ व्यवस्थापन कौशल्य व स्वयंशिस्त यांसारख्या जबाबदाऱ्या ते सक्षमपणे पार पाडू शकतील या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाचे मिलिंद थोरात, कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून रायसोनी इस्टीट्युटचे संचालक प्रितम रायसोनी, अॅकेडमिक डीन प्रा. डॉ. संजय…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी मतदार याद्या पडताळणीबरोबरच आता मतदान केद्रांचे सुसूत्रीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शहरी भागात आता एका मतदान केंद्रात पंधराशे मतदार असणार आहेत.राज्यात सध्या मतदार पडताळणीची मोहीम सुरू आहे. ही मोहीम १५ सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार असून, १७ ऑक्टोबर रोजी मतदार यादीचा प्रारूप आराखडा प्रसिद्ध केला जाणार आहे. मतदार पडताळणीच्या या मोहिमेसोबतच मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण करण्याचे निर्देश राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. मतदार केंद्र सुसूत्रीकरण करून प्रत्येक केंद्रावर फक्त १५०० मतदार मतदान करतील अशी रचना करण्याचे सूचीत केले आहे. मोहीमेत १७ ऑक्टोबर रोजी मतदार यादीचा प्रारूप आराखडा प्रसिद्ध केला जाणार आहे.१७ ऑक्टोबर ते…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी आपणासी जे ठावे| ते इतरांस इतरांशी शिकवावे| शहाणे करुनी सोडवे| सगळंजन||1|| यानुसार समाजामध्ये आपल्या ज्ञानाने समाज प्रबोधनाचा वसा घेऊन वारकरी संप्रदायाची पताका ही उंचावर नेण्याचे काम संत मंडळींनी केले आहे.यात संत ज्ञानेश्वर ,संत नामदेव समकालीन संत म्हणून ज्यांचा उल्लेख केला जातो, असे श्री संत शिरोमणी संतसेना महाराज म्हणजेच, संत सेना न्हावी. देविदास पंत यांचे कुटुंबीय हे मध्य प्रदेशातील बांधवगड मधील राजाला आपली सेवा देत असत आणि याच कुटुंबामध्ये देविदास पंत व प्रेमकुवरबाई यांच्या पोटी पुत्ररत्न प्राप्त झाले. तो दिवस होता,वैशाख वद्य द्वादशी विक्रम संवत १३५७. देविदास पंत हे न्हाव्याचा व्यवसाय करायचे. परंतु त्यांना ईश्वर भक्तीची ओढ होती…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी नाशिक येथील पब्लिक स्कूल मध्ये शिक्षण घेतलेले गोदावरी फाऊंडेशन चे अध्यक्ष डॉ उल्हास पाटील यांचे वर्गमित्र तब्बल ४८ वर्षांनंतर एकत्र आले. त्या प्रसंगी सर्वांच्या चेहर्‍यावर कमालीचा आनंद होता. कोल्हापूर येथे ३ ते ५ नोव्हेंबर २०२३ दरम्यान माजी विद्यार्थ्यांचा महामेळावा आयोजित करण्यात आला आहे. यात महाराष्ट्रातील शासकीय पाच विद्या निकेतन मध्ये शिकलेल्या माजी विद्यार्थी सहभागी असणार आहे. या सोहळ्याचे आमंत्रण देण्यासाठी नाशिक सह कोल्हापूर येथील मित्र परिवार उपस्थित होता. या सोहळ्यासाठी जळगाव तर्फे संपूर्ण सहकार्य करू असे आश्वासन डॉ उल्हास पाटील यांनी दिले. यावेळी शामराव वामनराव घोरपडे (पुसेगांव), राजेंद्र नायकू माळी (मुंबई), अतुल शांतीनाथ मंडपे (कोल्हपूर), निळकंठ रामदास…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई यांचे आदेशाप्रमाणे जिल्हा व सत्र न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. त्यात ६३७७ प्रकरणे निकाली काढण्यात आली. लोक अदालतीत ५०९२ दाखलपूर्व व न्यायालयातील प्रलंबीत १२८५ प्रकरणे निकाली काढण्यात आली व त्यामाध्यमातुन एकुण रक्कम रुपये २८,८४,३९,६०२.०२/- वसुल करण्यात आले. दिनांक ०४ ते दि. ०८ सप्टेंबर २०२३ पर्यत राबविण्यात आलेल्या स्पेशल ड्राईव्ह मध्ये एकुण ७७० प्रकरण निकाली काढण्यात आले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एम.क्यु.एस.एम. शेख यांचे विषेश मार्गदर्शन लाभले. उदघाटन प्रसंगी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, अतिरीक्त जिल्हाधिकारी प्रविण…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी भारतातातील नामांकित मॅरेथॉनपैकी एक अशी ओळख असलेल्या ब्रह्मगिरी नाशिक मॅरेथॉन स्पर्धेत जळगाव रनर्स ग्रुपच्या २५ सदस्यांनी सहभाग नोंदविला. मॅरेथॉनमध्ये यावर्षी दोन हजार स्पर्धक सहभागी झाले होते. त्यात जळगाव रनर्स ग्रुपचे ५ पुरुष व 20 महिलांनी आपला सहभाग नोंदविला. ब्रह्मगिरी नाशिक मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी किमान ३ ते ४ महिन्यापूर्वी नोंदणी आवश्यक असते त्यासाठी जळगाव रनर्स ग्रुपच्या सदस्यांनी जळगाव शहर, बहिणाबाई विद्यापीठ, मेहरूण तलाव ट्रॅक याठिकाणी दररोज रनिंगचा सराव केला. डॉ.सीमा पाटील, डॉ.जयश्री राणे, डॉ.सोनाली जैन, प्रणिता चोरडिया, वैशाली बडगुजर, जयश्री पाटील, दीपमाळा काळे, पिंटू काळे, रसिका भोळे, सुचिता हाडा, अतुलसींग हाडा, गजानन सपकाळ आदींनी २२ किलोमीटर वेळेच्या आत…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात पोटदुखीचा त्रास घेऊन आलेल्या रुग्णाच्या पोटातून चार किलोचा गोळा काढून त्याला जीवदान देण्यात वैद्यकीय पथकाला यश आले. आहे. याबद्दल अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकुर यांनी पथकाचे कौतुक केले आहे. जळगाव तालुक्यातील शिरसोली येथील रहिवासी ६० वर्षीय भास्कर बारी यांना गेल्या वीस वर्षांपासून पोटदुखीचा प्रचंड त्रास होत होता. त्यांना हर्निया असल्याबाबत संशय होता. म्हणून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव या ठिकाणी उपचारासाठी ते दाखल झाले. त्या ठिकाणी शल्याचिकित्सा विभागाने निदान केल्यानंतर त्यांच्या पोटात गोळा असल्याचे समजले. त्यामुळे रुग्णाच्या जीवाला धोका होता. गोळा काढणे गरजेचे होते. त्यामुळे वैद्यकीय पथकाने रुग्णावर शस्त्रक्रिया करून त्याच्या…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी जळगाव जिल्हा क्रीडा संघटना महासंघाची सभा महासंघाचे अध्यक्ष माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांचे अध्यक्षतेखाली शामभाऊ कोगटा यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांच्या निवासस्थानी उत्साहात पार पडली. यावेळी जिल्ह्यातील क्रीडाक्षेत्रातील विविध समस्या व त्यावर करावयाच्या उपाययोजना यावर चर्चा होऊन निर्णय घेण्यात आले. सभेस जिल्ह्यातील एकविध जिल्हा क्रीडा असोसिएशनचे सचिव शिवछत्रपती पुरस्कार्थी डॉ प्रदिप तळवलकर, हाजी फारूख शेख, नगरसेवक नितीन बरडे, राजेश जाधव, दिलीप गवळी, जयांशु पोळ, डॉ रणजित पाटील, रविंद्र धर्माधिकारी, प्रशांत कोल्हे, डॉ अनिता पाटील, निलेश बाविस्कर, योगेश सोनवणे, नरेंद्र भोई, अजित घारगे, अनिल माकडे व पाटील पहेलवान यांची उपस्थिती होती.

Read More