जळगाव जिल्हा क्रीडा संघटना महासंघाची सभा उत्साहात

0
19

साईमत जळगाव प्रतिनिधी

जळगाव जिल्हा क्रीडा संघटना महासंघाची सभा महासंघाचे अध्यक्ष माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांचे अध्यक्षतेखाली शामभाऊ कोगटा यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांच्या निवासस्थानी उत्साहात पार पडली.

यावेळी जिल्ह्यातील क्रीडाक्षेत्रातील विविध समस्या व त्यावर करावयाच्या उपाययोजना यावर चर्चा होऊन निर्णय घेण्यात आले. सभेस जिल्ह्यातील एकविध जिल्हा क्रीडा असोसिएशनचे सचिव शिवछत्रपती पुरस्कार्थी डॉ प्रदिप तळवलकर, हाजी फारूख शेख, नगरसेवक नितीन बरडे, राजेश जाधव, दिलीप गवळी, जयांशु पोळ, डॉ रणजित पाटील, रविंद्र धर्माधिकारी, प्रशांत कोल्हे, डॉ अनिता पाटील, निलेश बाविस्कर, योगेश सोनवणे, नरेंद्र भोई, अजित घारगे, अनिल माकडे व पाटील पहेलवान यांची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here