Author: Saimat

साईमत जळगाव प्रतिनिधी जिल्हा व सत्र न्यायालय येथे दि ९ सप्टेंबर रोजी जळगाव जिल्हा विधी सेवा प्रधिकरण तर्फे राष्ट्रीय लोक अदालत पार पडली. याप्रसंगी एका मोटर अपघात नुकसान भरपाई प्रकरणांमध्ये तळजोडी साठी लोक अदालत चे नेमलेले पॅनल कोर्ट हॉल मधून थेट न्यायालयातील वाहनतळात आले होते. सदर प्रकरणांमध्ये चर्चेअंती इन्शुरन्स कंपनीने अर्जदार सोपान बहडू रोटे यांना तीन लाख पंधरा हजार रुपयांचे नुकसान भरपाईदेण्याचे कबूल केले. त्यानुसार सदरचे प्रकरण हे लोक न्यायालयाच्या माध्यमातून निकाली काढण्यात आले. जळगाव येथील मोटर अपघात दावा प्रदीकरणाकडे सोपान भादू रोटे यांनी त्यांचा दिनांक १४/०६/२०२२ रोजी जळगाव तालुका पोलीस स्टेशन हद्दीत रस्ता अपघातात झालेल्या गंभीर दुखापती साठी व…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी येथील खुबचंद सागरमल विद्यालयाचे क्रीडा शिक्षक प्रविण पाटील यांना शैक्षणिक क्रीडा व पर्यावरण क्षेत्रातील कार्याबद्ल त्यांना रोटरी क्लब ऑफ जळगांव तर्फे मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. प्रविण पाटील यांनी मागील १० वर्षात 354 शाळाबाह्य विदयार्थांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले असुन गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले बेटी बचाव बेटी पठाव या उपक्रमात हि सहभागी होऊन अनेक उपक्रम यशस्वी केले आहेत. बालगुन्हेगार तयार होऊ नये म्हणुन ते अनेक ठिकाणी जाऊन मुलांना प्रबोधन करतात पर्यावरण क्षेत्रात त्यांनी उत्कृष्ट काम केले आहे. क्रीडा क्षेत्रात हि अनेक राज्य राष्ट्रीय खेळाडु त्यांनी घडविले आहे व अनेक क्रीडा स्पर्धाचे आयोजन हि त्यांनी यशस्वीरित्या केले आहे. त्यांच्या या…

Read More

साईमत मुंबई प्रतिनिधी महाराष्ट्रात जेव्हा जेव्हा मी वेगवेगळ्या भागात गाडीने फिरत असतो आणि आजूबाजूची बहरलेली शेती बघतो तेव्हा मला त्या हिरव्यागार बहरलेल्या शेताकडे बघताना भवरलाल जैन व ना. धों. महानोर या माझ्या दोन मित्रांची आठवण येते असे वक्तव्य महानोर यांच्या श्रद्धांजलीपर आयोजित कार्यक्रमात निवेदक शंभू पाटील यांनी विचारलेल्या, तुमचे प्रिय मित्र भवरलाल जैन व ना. धों. महानोर नसताना आपण याकडे कसे पाहतात, प्रश्नावर बोलताना शरद पवार यांनी सांगीतले. यशवंतराव चव्हाण सेंटर , भवरलाल अँड कांताबाई जैन फाउंडेशन आणि परिवर्तन जळगाव यांच्या संयुक्त विद्यमान मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये महानोर यांना गीते आणि कवितांतून श्रद्धांजली अर्पण करणाऱ्या “हा कंठ दाटूनी आला” या…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी तालुक्यातील वावडदा येथील एल. एच. पाटील इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये “आजी आजोबा दिवस” मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे अध्यक्ष एल. एच. पाटील, जितेंद्र पाटील, उपाध्यक्ष वीरेंद्र पाटील, संचालिका वैशाली पाटील, दगडूसिंग परदेशी, शाळेच्या मुख्याध्यापिका जयश्री पाटील, पूर्व प्राथमिक विभाग प्रमुख सुजिता साळुंखे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने करण्यात आली. प्रसंगी स्वर्गीय विजयाताई लालसिंग पाटील यांच्या तृतीय पुण्यस्मरणास स्मरण करीत त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर शाळेच्या शिक्षिका समूहाने “आई” ला संबोधून एक गीत सादर केले तसेच शाळेचे कलाशिक्षक कुशराजे पवार यांच्या समूहाने स्वागत गीत सादर केले. आजी…

Read More

साईमत, जालना: प्रतिनिधी मराठवाड्यातील मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे, अशी आमची मागणी होती. आम्ही राज्य सरकारने ७ सप्टेंबरला काढलेल्या अधिसूचनेत (जीआर) बदल सुचवला होता. ‘वंशावळीत कुणबी नोंद असलेल्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळेल’ याऐवजी ‘सरसकट सर्व मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात येईल’, असा बदल आम्ही सुचवला होता. मात्र, राज्य सरकारने त्यासंदर्भात कोणताही निर्णय घेतलेला नाही. संबंधित जीआरमध्ये कोणतीही दुरुस्ती केली नाही. त्यामुळे आम्ही आमचा पुढील निर्णय मराठा बांधवांशी चर्चा करुन घेऊ. तोपर्यंत आमरण उपोषण सुरुच राहील, असा मनोदय मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केला. ते शनिवारी जालन्यातील अंतरवाली सराटी येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.राज्य सरकार आणि मनोज जरांगे पाटील यांनी…

Read More

साईमत, नवी दिल्ली : वृत्तसंस्था जी २० शिखर परिषदेला शनिवारी (९ सप्टेंबर) देशाच्या राजधानीत सुरुवात झाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या दोन दिवसीय परिषदेसाठी जोरदार तयारी करण्यात येत होती. जगभरातील अनेक नेते, या परिषदेसाठी भारतात आल्याने त्यांच्या योग्य पाहुणचारासाठी भारताने खबरदारी घेतली आहे. दरम्यान, शिखर परिषदेला सुरुवात होताच पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एक फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. कारण, या फोटोत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोरील नामफलकावर भारत असा उल्लेख आहे. गेल्या काही दिवसांपासून सरकारच्या अनेक दस्ताऐवजातून इंडिया नाव वगळून त्यात भारत असे नाव जाणीवपूर्वक लिहिले जात आहे. जी २० परिषदेच्या निमंत्रण पत्रिकेत ‌‘प्रेसिडेंट ऑफ भारत‌’ असा उल्लेख झाल्यानंतर हे प्रकरण…

Read More

साईमत, जळगाव : प्रतिनिधी फैजपुर येथील लोकसेवक मधुकरराव चौधरी औषध निर्माण शास्त्र महाविद्यालयातील २६ विद्यार्थी कॉपी केस मध्ये पकडले गेले . या घटनेला बारा दिवस उलटले तरी विद्यापीठाने संबंधितांवर कारवाई केली नाही. विद्यापीठाच्या एका परीक्षा केंद्रावर जिल्ह्यात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात कॉपी केस घडल्याचे प्रकरण समोर आले आहे. संबंधित महाविद्यालय व विद्यापीठ प्रशासन हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसत आहे. फैजपूर येथील तापी परिसर संचलित मधुकरराव चौधरी औषध निर्माणशास्त्र महाविद्यालयातील परीक्षा केंद्रात २८ ऑगस्ट रोजी एफ वाय बी फॉर्म तसेच एफ वाय एम फॉर्म या वर्गाच्या प्रथम सेमिस्टर परीक्षेत विदयापीठाने नेमलेल्या भरारी पथकाने एफ वाय बी फार्मचे २६ विद्यार्थ्यांपैकी…

Read More

साईमत, पुणे : प्रतिनिधी राज्यात दडी मारलेला पाऊस पुन्हा सक्रिय झाला आहे. राज्यातल्या बहुतांश भागांत महिन्याभरात पाऊस असेल अशी शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्याने दिलेल्या ताज्या माहितीनुसार, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगावसह २९ जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे तर रत्नागिरीत मात्र पावसाचा ऑरेंज असणार आहे. यामुळे नागरिकांनी हवामानाचा अंदाज घेत बाहेर पडावं तर शेतकऱ्यांनीही पावसाचा अंदाज घेत शेतीच्या कामांना सुरुवात करावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. भारतीय हवामान विभागाने गुरुवारी नोंदवलेल्या अंदाजानुसार, पुढील ४ आठवड्यांच्या अंदाजानुसार, ८ ते १४ सप्टेंबर या कालावधीत कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याचा काही भाग आणि विदर्भाच्या काही भागात पावसाची शक्यता आहे.…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी खान्देशचा नावलौकिक वाढविणाऱ्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या आसोदा या गावी त्यांचे स्मारक करण्याचे ठरविले गेले. मात्र अजूनही ते काम अपूर्णावस्थेत आहे. आमदार रोहित पवार यांनी मंगळवारी आसोदा येथे बहिणाबाई स्मारकाला भेट दिली. याप्रसंगी त्यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना स्मारकाचे काम पूर्ण होण्याची मागणी करणारे निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे की, कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या स्मारकासाठी ग्रामस्थांच्या सातत्याच्या मागणीनंतर दीर्घकाळाने शासनाने निधी जाहीर केला आहे. मात्र हा निधी आगामी निवडणूका डोळ्यासमोर ठेवून नसावा, जाहीर केलेला निधी जर आला नाही, तर काम पुढे होणार नाही. यामुळे निधीचा विनियोग होवून काम पूर्णत्वाकडे कसे जाईल याकडे निधी जाहीर करणाऱ्यांनी लक्ष देणे…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी येथील आयएमए व डिस्ट्रिक्ट वुमन्स डॉक्टर विंग्स तर्फे आयएमए हॉल येथे “रिलेशनशिप ऑनलाइन टू ऑफलाइन” या विषयावर एक दिवसीय सीएमईचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी आयएमएचे महाराष्ट्र राज्याचे हॉस्पिटल बोर्ड ऑफ इंडिया चे अध्यक्ष डॉ. अनिल पाटील, कोषागार डॉ. स्नेहल फेगडे, अध्यक्ष डॉ. सुनील नाहाटा, मानद सचिव डॉ. तुषार बेंडाळे, (ऑर्गनायझिंग चेअरमन) कार्याध्यक्ष डॉ.अनिता भोळे, कार्यसचिव डॉ.सारिका पाटील, वूमन डॉक्टरविंगच्या महाराष्ट्रराज्य अध्यक्ष डॉ. केतकी पाटील यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. महिला डॉक्टर सक्षमीकरणा निमित्त आयोजित या कार्यक्रमात डॉ.अनिता भोळे यांनी इंडियन मेडिकल असोसिएशन आणि वूमन डॉक्टर विंग याविषयी माहिती दिली. ‘निसर्गाकडे चला’ या विषयावर डॉ.रंजना बोरसे…

Read More