राज्यात मतदार केंद्राचे होणार सुसूत्रीकरण

0
3

साईमत जळगाव प्रतिनिधी

मतदार याद्या पडताळणीबरोबरच आता मतदान केद्रांचे सुसूत्रीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शहरी भागात आता एका मतदान केंद्रात पंधराशे मतदार असणार आहेत.राज्यात सध्या मतदार पडताळणीची मोहीम सुरू आहे. ही मोहीम १५ सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार असून, १७ ऑक्टोबर रोजी मतदार यादीचा प्रारूप आराखडा प्रसिद्ध केला जाणार आहे. मतदार पडताळणीच्या या मोहिमेसोबतच मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण करण्याचे निर्देश राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. मतदार केंद्र सुसूत्रीकरण करून प्रत्येक केंद्रावर फक्त १५०० मतदार मतदान करतील अशी रचना करण्याचे सूचीत केले आहे.

मोहीमेत १७ ऑक्टोबर रोजी मतदार यादीचा प्रारूप आराखडा प्रसिद्ध केला जाणार आहे.१७ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर या काळामध्ये पुन्हा नवीन अर्ज स्वीकारले जातील. यासाठी विशेष ग्रामसभा, शिबिरे, महाविद्यालयांमध्ये नोंदणी मोहीम अशा स्वरूपाच्या उपक्रमांतून नवमतदार जोडले जाणार आहेत.या सर्व नवीन अर्जाची नोंदणी १७ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध झालेल्या प्रारूप आराखड्यात केली जाणार आहे. ५ जानेवारी २०२४ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल.
हे मतदान केंद्र देताना त्या मतदान केंद्रातील एक विशिष्ट भाग दुसऱ्या मतदान केंद्रात हलविला जाईल, हे मतदार हलविताना एखाद्या सोसायटीचा शेवटचा मतदार आकडा १५०० होत असेल तर उर्वरित सोसायटीधारकांना त्याच मतदार केंद्रावर मतदानांची संधी मिळणार आहे‌. एका सोसायट्यांमधील मतदार एकाच मतदान केंद्रात असतील, याची काळजी घेतली जाणार आहे. जुन्या मतदान केंद्रात सुविधा अपूर्ण असल्यास व नवीन ठिकाणी त्या सुविधा मिळत असल्यास अशा मतदान केंद्रांना नवीन जागेत हलविण्यात येणार आहे. ही प्रक्रिया १५ ते ३० सप्टेंबरपर्यंत सबंध राज्यात राबविण्यात येणार आहे. मतदार पडताळणीची मोहीम १५ सप्टेंबरला संपल्यानंतर १६ सप्टेंबर ते १६ ऑक्टोबर या काळामध्ये मतदार याद्यांची दुरुस्ती, नवमतदार नोंदणी, नावे वगळणे पत्त्यात दुरुस्ती, फोटो बदलणे अशा स्वरूपाची कामे केली जाणार आहेत. अशी माहिती उप जिल्हा निवडणूक अधिकारी श्रीकुमार चिंचकर यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here