साईमत जळगाव प्रतिनिधी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या सामाजिकशास्त्र प्रशाळेच्या डॉ. आंबेडकर विचारधारा विभागाची विद्यार्थिनी गायत्री ठाकूर हिची थायलंड येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय हेरिटेज सौंदर्यवती स्पर्धेसाठी निवड झाली आहे. गायत्री ठाकूर हिने गतवर्षी “मिस हेरिटेज ऑफ इंडिया” हा राष्ट्रीय किताब पटकावला होता. आपला अभ्यासक्रम पुर्ण करतांना भारतातील वारस स्थळे, शिल्पकला, जगप्रसिध्द अंजिठा बुध्द लेण्यातील चित्रकला या अनुषंगाने देशभर ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून जागृतीचे कार्य केले. यावर्षी थायलँड येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय हेरिटेज सौंदर्यवती स्पर्धेसाठी गायत्री ही भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. तिच्या या यशाबद्दल प्रशाळेचे प्रभारी संचालक प्रा. अजय पाटील, विभागप्रमुख प्रा. राकेश रामटेके, डॉ. विजय घोरपडे, डॉ. समाधान बनसोडे आदीनी अभिनंदन केले.
Author: Saimat
साईमत जळगाव प्रतिनिधी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार व राज्यशासनाच्या निर्देशानुसार शहरातील वायु प्रदूषणात वाढ होऊ नये यासाठी दक्षता घेण्याच्या सूचना करण्यात आल्या असून दिवाळीच्या पार्श्वभूमिवर शहरात १२५ डेसीबलच्यावर आवाज असलेल्या फटाक्यांना बंदी घालण्यात आली आहे. जर कोणी १२५ डेसीबल पेक्षा जास्त आवाजाचे फटाके विक्री करतांना किंवा फोडतांना आढळून आले तर, त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती मनपाच्या सहाय्यक आयुक्त अश्विनी भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिली. महापालिकेत आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. पुढे बोलतांना त्या म्हणाल्या की, शहरात रात्री ७ ते १० वाजेपर्यंत कमी आवाजातील फटाके येतील परंतु मोठ्या आवाजाचे फटाके फोडतांना आढळून आल्यास त्यांच्यावर पोलीस, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व…
साईमत मुंबई प्रतिनिधी महाराष्ट्र आणि मॉरिशसमध्ये पर्यटनवाढीला चालना देण्यासाठी आज केलेला सामजंस्य करार महत्वपूर्ण भूमिका निभावेल, असे पर्यटनमंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी सांगितले. सह्याद्री अतिथीगृह येथे पर्यटन वाढीसाठी मॉरिशस प्रजासत्ताकचे पर्यटन मंत्रालय आणि पर्यटन संचालनालय, महाराष्ट्र शासन यांच्यामध्ये सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आल्या. यावेळी मॉरिशसच्या पर्यटन मंत्रालयचे दुष्यंतकुमार बकोटवार, पर्यटन विभागाच्या सचिव जयश्री भोज,पर्यटन संचालक डॉ.बी.एन.पाटील उपस्थित होते. यावेळी मंत्री श्री.महाजन म्हणाले, महाराष्ट्र आणि मॉरिशसमध्ये झालेला सामंजस्य करार हा पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी महत्वपूर्ण ठरेल.दोन्ही प्रदेशातील पर्यटन-संबंधित उद्योग वाढवण्याच्या उद्देशाने पर्यटन क्षेत्रातील क्षमता वाढविणे,परस्पर भेटी, बैठका आणि सुसंवाद दृढ करणे,आपल्या क्षेत्रातील अनुभव, कौशल्य आणि सर्वोत्तम यशोगाथांची माहिती देणे यावर…
साईमत जळगाव प्रतिनिधी रमाई घरकुल आवास योजना ही एक अत्यंत महत्त्वाची आणि महत्त्वाकांक्षी राज्य पुरस्कृत योजना असून ज्यांना निवासाची व्यवस्था नाही अशा सर्व आर्थिक दुर्बल असणाऱ्या व सर्वसामान्यांना नागरिकांना स्वतःच्या जागेवरती राज्य सरकार पक्क्या स्वरूपाची घरबांधणीची व्यवस्था करून देत असल्याने ही योजना वरदान ठरत असल्याचे माहिती पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली. सामाजिक न्याय विभागाच्या वतीने अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वतःच्या हक्काचे घर उभारणीच्या स्वप्नाला पूरक असलेल्या रमाई आवास घरकुल या अत्यंत महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत जिल्ह्यात २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी १८४५ घरकुलांना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रशासकीय मंजुरी दिली आहे. तालुका निहाय मंजूर घरकुले जळगाव…
साईमत जळगाव प्रतिनिधी जळगाव जिल्हा कारागृहातील कैद्याला भेटू देण्यासाठी जेलच्या सुभेदारासह अन्य दोन महिला कर्मचार्यांनी दोन हजारांची लाच मागून ती प्रत्यक्ष स्वीकारल्याने त्यांना धुळे एसीबीच्या पथकाने रंगेहाथ अटक केल्याने लाचखोरांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे. हा सापळा बुधवार, 8 नोव्हेंबर रोजी दुपारी दिड वाजता यशस्वी करण्यात आला. याबाबत मिळालेली माहिती अशी की, पहूरच्या अंगणवाडीत शिक्षिका असलेल्या तक्रारदार यांचा मुलगा ३०७ च्या गुन्ह्यात संशयित आरोपी असून त्याची जळगाव जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली. मुलाला भेटण्यासाठी तक्रारदार आईकडे लाचखोर ड्युटीवरील कर्मचारी दरवेळी दोन हजारांची लाच मागत होते. तक्रारदाराची लाच द्यावयाची परीस्थिती नसल्याने त्यांनी मंगळवार, ७ रोजी धुळे एसीबीकडे तक्रार नोंदवल्यानंतर बुधवारी सापळा…
साईमत चाळीसगाव प्रतिनिधी मुंबई येथे सह्याद्री अतिथीगृहात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांच्या उपस्थितीत जलसंपदा विभागाची बैठक बुधवारी, 8 नोव्हेंबर रोजी पार पडली. बैठकीत गिरणा मन्याड नदीजोड प्रकल्प व गिरणा डावा कालवा, मन्याड उजवा कालवा काँक्रीटीकरण प्रस्ताव विषयांच्या अनुषंगाने आ.मंगेश चव्हाण यांनी मंत्र्यांचे लक्ष वेधले. अवर्षणप्रवण क्षेत्रात येणाऱ्या चाळीसगाव तालुक्यातील मन्याड प्रकल्पात यावर्षी 0 टक्के जलसाठा आहे. मन्याड प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रातील नांदगाव जिल्ह्यात माणिकपुंज प्रकल्प झाल्याने अपवाद वगळता मन्याड धरण कोरडेच राहिले आहे. त्यामुळे प्रकल्पावर विसंबून असणाऱ्या 22 हुन अधिक गावातील शेतीसिंचन व पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. यावर पर्याय म्हणून मन्याड प्रकल्पाच्या बाजूलाच असणाऱ्या…
साईमत जळगाव प्रतिनिधी राज्य उत्पादन शुल्क व पोलीस विभागाने जिल्ह्यात संयुक्तपणे हातभट्टी दारू निर्मूलन मोहीम राबविण्यास सुरुवात केली आहे. मोहिमेत मंगळवारी, 7 नोव्हेंबर रोजी एकाच दिवसात 106 गुन्हे दाखल केले आहेत. त्यात 100 आरोपींना अटक केली आहे. त्यातून 27 लाख 55 हजार 555 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलीस अधीक्षक एम.राजकुमार, विभागीय उपायुक्त बी.एच.तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात हातभट्टी निर्मिती व वाहतूक करणाऱ्या विरोधात धडक मोहीम राबविण्यात येत आहे. मोहिमेत राज्य उत्पादन शुल्क विभागाचे जिल्हा अधीक्षक व्ही.टी.भुकन यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील सर्व पथके, नाशिक विभागीय भरारी पथक (कळवण) तसेच जळगाव पोलीस विभागांच्या पथकाने संयुक्तरित्या कारवाई केली. हातभट्टी निर्मूलन मोहिमेत राज्य…
साईमत जळगाव प्रतिनिधी दीपस्तंभ मनोबल प्रकल्पातील दिव्यांग, अनाथ, वंचित घटकांतील विदयार्थ्यांसोबत दरवर्षी मनोबल येथे दिवाळी साजरी करण्यात येते.जे डोळ्याने प्रकाश बघू शकत नाही अश्या अंध विद्यार्थ्यांमधील ज्ञानरूपी प्रकाशाचे पूजन करण्यासाठी ‘प्रकाशपुजन’ या कार्यक्रमाचे आयोजन दरवर्षी करण्यात येते. या वर्षीही ‘प्रकाशपुजन’ कार्यक्रम मान्यवरांच्या उपस्थितीत मनोबल प्रकल्पात झाला. कार्यक्रमात दीपस्तंभ जळगाव व पुणे येथील दिव्यतेज टीम ने गायन व वादन सादरीकरण करीत सुरेल मैफल सजवली.मनोबलचे श्याम मिश्रा, आशा वरांगडे, दिव्यता अधिकारी, शेख नाझनीन, धनश्री वाघ यांनी विविध गाण्याचे सादरीकरण केले तर मानसी पाटील, ईशान नाईक, ममता नाकतोडे, उत्कर्षा गाडे यांनी नृत्य सादर केले. चैतन्य पानवलकर याने बासरी वादन तर फैयाज अत्तार याने…
साईमत जळगाव प्रतिनिधी येथील रोटरी क्लब ऑफ जळगाव गोल्डसिटी तर्फे जामनेर तालुक्यातील हिंगणे बुद्रुक येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी इंडियन रेडक्रॉस सोसायटी जळगावचे सहकार्य लाभले. या शिबिरात 64 रक्त पिशव्या संकलित करण्यात आल्या. शिबिरास अध्यक्ष प्रकाश पटेल, मानद सचिव मनीष पाटील, सुनील अडवाणी, सुमित छाजेर, प्रखर मेहता जितू रावलानी, राहुल कोठारी, वेदांत मोहता यांची प्रमुख उपस्थिती होती. यशस्वीतेसाठी रोटरी गोल्डसिटीच्या सर्व सदस्यांसह ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.
साईमत जळगाव प्रतिनिधी धुळे जिल्ह्यातील साखरी पिंपळनेर येथे मुलांच्या विभागीय शासकीय आंतरशालेय सिकाई मार्शल आर्ट स्पर्धा झाल्या. त्यात मुलांच्या १७ वर्षांतील वेदांत हिवराळे व १९ वर्षातील गटात प्रथमेश वाघ यांनी सहभाग घेतला होता.त्यात प्रथेमश ने सुवर्णपदक प्राप्त करून त्याची निवड पुढे राज्यस्तरीय स्पर्धे साठी झाली आहे.तर वेदांत हिवराळे ने कांस्यपदक मिळविले. सर्व विजयी स्पर्धकांना पोलीस अधीक्षक एम. राज. कुमार, अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, सहायक पोलिस अधीक्षक संदीप गावित , पोलीस उपअधीक्षक गृह रामकृष्ण कुंभार, राखीव पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे ,वेल्फेअर पी.एस.आय. रेश्मा अवतारे ,रावसाहेब गायकवाड यांनी शुभेच्छा दिल्या. खेळाडूना कराटे प्रशिक्षक अश्विनी निकम-जंजाळे, जागृती काळे, राजेंद्र जंजाळे यांचे…