रोटरी जळगाव गोल्डसिटीतर्फे ६४ रक्त पिशव्या संकलित

0
14

साईमत जळगाव प्रतिनिधी

येथील रोटरी क्लब ऑफ जळगाव गोल्डसिटी तर्फे जामनेर तालुक्यातील हिंगणे बुद्रुक येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी इंडियन रेडक्रॉस सोसायटी जळगावचे सहकार्य लाभले. या शिबिरात 64 रक्त पिशव्या संकलित करण्यात आल्या.

 

शिबिरास अध्यक्ष प्रकाश पटेल, मानद सचिव मनीष पाटील, सुनील अडवाणी, सुमित छाजेर, प्रखर मेहता जितू रावलानी, राहुल कोठारी, वेदांत मोहता यांची प्रमुख उपस्थिती होती. यशस्वीतेसाठी रोटरी गोल्डसिटीच्या सर्व सदस्यांसह ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here