Author: Saimat

साईमत जळगाव प्रतिनिधी एस. एस. मणियार विधी महाविद्यालयात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ विद्यार्थी विकास विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतर महाविद्यालयीन अभिरुप न्यायालय स्पर्धेचे पारितोषिक वितरण केसीई सोसायटीचे सचिव ॲड. प्रमोद पाटील, प्रमुख पाहुणे डॉ. नितीन धांडे, प्राचार्य डॉ. बी. युवाकुमार रेड्डी यांच्या हस्ते करण्यात आले. स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचे फिरते चषक धुळे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती विधी महाविद्यालयाच्या संघाने पटकावले. तर धुळे येथील एस. एम. बियाणी विधी महाविद्यालयाच्या संघास उपविजेते चषक बहाल करण्यात आले. उत्कृष्ट मेमोरियल चे पारितोषिक एस. एम. बीयाणी विधी महाविद्यालयाच्या संघास मिळाले. उत्कृष्ट विद्यार्थी अधिवक्ता पारितोषिक बियाणी विधी महाविद्यालयाच्या आनंद चव्हाण यास मिळाले तर उत्कृष्ट…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी जळगाव शहरातील महापालिकेच्या गाळे धारकांना भाडे पट्टा नूतनीकरण नवीन दराची अंमलबजावणी सन २०१९ पासून करणार असल्याचा निर्णय शासनाने घेतला होता. परंतु आमदार राजुमामा भोळे यांनी भाडेपट्टा वसुली सुधारित दर हा भाडेपट्टा करारनामा संपल्याच्या कालावधी पासून म्हणजेच सन २०१२ पासून लागू करणेसाठी मागणी केली होती. त्यास अखेर मंगळवार दि. ७ रोजी मान्यता मिळाली आहे. यामुळे गाळेधारकांना दिलासा मिळाला असून आमदार राजुमामा भोळे यांचे कडून गाळेधारकांना दिवाळीची भेट मिळाली आहे. जळगाव शहरातील महापालिकेच्या व्यापारी संकुलातील २३६८ गाळेधारकांचा भाडेपट्टा नूतनीकरणाचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. दरम्यान आमदार सुरेश भोळे यांनी शासनाकडे सततच्या पाठपुराव्या मुळे दि.१० ऑक्टोबर, २०२३ रोजी झालेल्या मंत्रीमंडळ…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी जळगावच्या विकासाकरिता सकारात्मक भूमिका महत्त्वाची असून त्यातून जिल्ह्याच्या नावलौकिकात भर पडेल जेणे करून त्याचा फायदा जिल्ह्याच्या विकासाकरिता करता येईल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले. ते रोटरी मिन्स बिझिनेस, लघु उद्योग बँक व महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री यांच्या सैयुक्त विद्यमाने आयजित उत्तर महाराष्ट्रातील पहिल्या व हॉटेल प्रेसिडेंट येथे आयोजित आर. एम. बी. बिझिनेस समिट प्रसंगी विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद पुढे म्हणाले की, सरकारचे व्यवसाय स्थापनेबाबत सर्व कागद पत्र आज ऑनलाईन उपलब्ध आहे. त्याचा उपयोग करून नव युवकांनी उद्योग क्षेत्रात यावे. जेणे करून जळगावच्या नावलौकिकात भर पडेल. शासन तुम्हाला सर्व सुविधा…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी तरूणांनी आपल्यातील क्षमता ओळखुन व्यवसाय करण्यासाठी पावले टाकावीत. मात्र व्यवसायात होणारे बदल स्वीकारून मेहनत आणि कष्ट करण्याची जोड दिली तर व्यवसाय-उद्योगात निश्चित यश प्राप्त होईल असे मत कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सचे (CAIT) अध्यक्ष व उद्योजक नितीन बंग यांनी व्यक्त केले. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात केंद्रीय प्रशिक्षण व नियुक्ती कक्षाच्यावतीने मंगळवार दि. ७ नोव्हेंबर रोजी विद्यापीठ – उद्योग संवाद शिखर परिषदेचे उद्घाटन प्रसंगी श्री. बंग बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उद्योजक तथा विन्ले पॉलीमर्सचे मुख्य कार्यकारी प्रमोद संचेती, सोयो सिस्टीमचे मुख्य कार्यकारी किशोर ढाके उपस्थित होते तर…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी कै. सूनीताताई जगन्नाथ वाणी भगीरथ इंग्लिश स्कूल मध्ये राष्ट्रीय हरित सेनेमार्फत शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षकांनी “फटाके मुक्त, प्रदूषण मुक्त दिवाळी साजरी करण्याची शपथ घेतली. यावेळी राष्ट्रीय हरित सेनाप्रमुख संजय बाविस्कर यांनी फटाक्यांमुळे अनेक अपघात होतात, तसेच हवेचे प्रदूषण, ध्वनीचे प्रदूषण होते, यामुळे हवेत कार्बन डाय-ऑक्साइड, नायट्रस ऑक्साईड, सल्फर डाय ऑक्साईड या वायूंचा समावेश मोठ्या प्रमाणात होतो. यामुळे श्वासोश्वास घ्यायला त्रास होतो, तसेच डोळ्यांची जळजळ आणि आग होते, वयोवृद्ध लोकांना आवाजामुळे त्रास होतो, यासाठी आपण सर्वांनी प्रदूषण मुक्त दिवाळी साजरी करावी असे मार्गदर्शन केले . कार्यक्रमासाठी शाळेच्या उपमुख्याध्यापिका प्रिया सफळे, पर्यवेक्षक श्री निकम सर सर्व शिक्षक बंधू भगिनी…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी जिल्हा वार्षिक योजना (अनुसूचित जाती उपयोजना) अंतर्गत सन २०२३-२४ करिता अर्थसंकल्पीय निधी ९२ कोटी रूपये निधीमधून ४६०१.०१ कोटी रूपये निधी बीडीएसवर शासनाकडुन उपलब्ध करून देण्यात आला आहे. यापैकी दि. ६ नोव्हेंबर पर्यंत ३५ कोटी ९६ लाख ८६ हजार निधी बीडीएसवर खर्च झाला आहे. उपलब्ध निधीशी खर्च झालेल्या निधीची टक्केवारी ७८.१८ टक्के तसेच अर्थसंकल्पीत निधीशी खर्चाची टक्केवारी ३९.१० टक्के असून निधी खर्चामध्ये जळगाव जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर आहे. यासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे मार्गदर्शन, ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन व मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्या सूचना, लोकप्रतिनिधींचे सहकार्य, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा, जिल्हा नियोजन समिती…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी रब्बीचा हंगाम सुरु असल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात कृषीपंप वापरण्यात येत आहेत. कृषीपंपाना सुरळीत आणि अखंडित वीज पुरवठा सुरु आहे. त्यासाठी महावितरणकडून सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. सोबतच शेतकरी बांधवांनीही अधिकृतपणे वीज पुरवठा घ्यावा. कृषीपंपाला ॲटोस्विच न वापरता कॅपॅसिटरचा प्राधान्याने वापर करावा. असे आवाहन जळगांव परिमंडलाचे मुख्य अभियंता कैलास हुमणे यांनी केले आहे. बऱ्याच ठिकाणी कृषीपंपांना ॲटोस्विच लावल्याचे निदर्शनास आलेले आहे. ॲटोस्विचमुळे विद्युत पुरवठा सुर झाल्यानंतर एकाच वेळी परिसरातील सर्वच्या सर्व विद्युत मोटारी सुरु होतात. परिणामी एकाचवेळी अचानकपणे त्याचा भार सर्व मोटारींसह रोहित्रावर येतो आणि ते नादुरुस्त होतात. त्यामुळे सुरळीत विद्युत पुरवठ्यासाठी ॲटोस्विचचा वापर टाळणे आवश्यक आहे. शिवाय,…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी जिल्हा महिला व बाल विकास विभाग, यूनिसेफ, एस.बी.सी.-३ यांच्या संयुक्त विद्यमाने जळगाव जिल्ह्यात बालविवाह निर्मूलन कार्यक्रम मागील दोन वर्षापासुन राबविले जात आहे. याचाच एक भाग म्हणून बालविवाह निर्मूलन चॅम्पियन्स यांचे एकदिवशीय प्रशिक्षण छत्रपती शाहू महाराज सभागृह जिल्हा परिषद जळगाव येथे मा. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.अंकित यांच्या अध्यक्षतेखाली तसेच जिल्हा महिला व बालविकास अधिकारी डॉ.वनिता सोनगत यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आले. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण ५ नुसार जळगाव जिल्ह्यात २८% बालविवाह होतात. तर महाराष्ट्राच्या तुलनेत जळगाव जिल्हा अकराव्या क्रमांकावर आहे. शिक्षण विभाग, आरोग्य विभाग, आय. सी. डी. एस., पंचायत विभाग, जिल्हा महिला व बाल विकास विभाग या सर्व…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी आज केमिकल शेती मुळे मानवाला विषाक्त भोजन खायला मिळत आहे. मोबाइला टॉवरमुळे शहरात पक्षी दिसेनासे झालेले आहे, पक्षांमध्ये सर्वात अधिक फटका बसला तो कावळ्यांना, म्हणून आज कावळे दिसेनासे झालेले आहे, त्यामुळे पितृ पक्षात कावळ्याला भोजन दिल्याशिवाय लोकांना भोजन ग्रहण करावे लागत असल्याचे प्रतिपादन कृषी विभागाच्या आत्माचे रिटायर्ड डेप्युटी डायरेक्टर अनिल भोकरे यांनी केले. केसीई सोसायटीचे कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अँड मॅनेजमेंट मध्ये डिपार्टमेंट ऑफ मॅनेजमेंट विभागातील – ॲग्री बिझनेस मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजीत “कृषी पर्यावरण आणि शासन धोरण” या विषयावरील सेमिनार प्रसंगी ते बोलत होते. या सेमिनार मध्ये अनिल भोकरे यांनी पर्यावरणातील बदलामुळे शेतीवर, मानवावर आणि प्राण्यांवर होणारे भयानक…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी प्रत्येक क्षेत्रात वाढत असलेली स्पर्धा, वाढता दबाव, कुटुंबात परस्पर संवादाचा असलेला अभाव, व्यायामाकडे असलेले दुर्लक्ष आणि फास्ट फुडच्या आहारी जाण्याची वाढती संख्या यामुळे तरूण पिढीचे मानसिक आरोग्य ढासळत असून यातून बाहेर पडण्यासाठी स्वत: मधील क्ष्मता ओळखा, इतरांसोबत स्वत:ची तुलाना करू नका. आणि कोणत्याही दबावाखाली काम करू नका. असे प्रतिपादन कुलगुरू प्रा.व्ही.एल. माहेश्वरी यांनी केले. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आणि महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास अकादमी पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठात युवा मानसरंग क्लबची स्थापना करण्यात आली असून या क्लबच्या कक्षाचे उद्घाटन करतांना प्रा. माहेश्वरी बोलत होते. परिवर्तन संस्था, सातारा यांच्या सहकार्याने हा कक्ष कार्यान्वित झाला. या…

Read More