साईमत जळगाव प्रतिनिधी
धुळे जिल्ह्यातील साखरी पिंपळनेर येथे मुलांच्या विभागीय शासकीय आंतरशालेय सिकाई मार्शल आर्ट स्पर्धा झाल्या. त्यात मुलांच्या १७ वर्षांतील वेदांत हिवराळे व १९ वर्षातील गटात प्रथमेश वाघ यांनी सहभाग घेतला होता.त्यात प्रथेमश ने सुवर्णपदक प्राप्त करून त्याची निवड पुढे राज्यस्तरीय स्पर्धे साठी झाली आहे.तर वेदांत हिवराळे ने कांस्यपदक मिळविले.
सर्व विजयी स्पर्धकांना पोलीस अधीक्षक एम. राज. कुमार, अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, सहायक पोलिस अधीक्षक संदीप गावित , पोलीस उपअधीक्षक गृह रामकृष्ण कुंभार, राखीव पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे ,वेल्फेअर पी.एस.आय. रेश्मा अवतारे ,रावसाहेब गायकवाड यांनी शुभेच्छा दिल्या. खेळाडूना कराटे प्रशिक्षक अश्विनी निकम-जंजाळे, जागृती काळे, राजेंद्र जंजाळे यांचे मार्गदर्शन लाभले.