थायलंड येथील सौंदर्यवती स्पर्धेसाठी गायत्री ठाकूरची निवड

0
12

साईमत जळगाव प्रतिनिधी

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या सामाजिकशास्त्र प्रशाळेच्या डॉ. आंबेडकर विचारधारा विभागाची विद्यार्थिनी गायत्री ठाकूर हिची थायलंड येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय हेरिटेज सौंदर्यवती स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

गायत्री ठाकूर हिने गतवर्षी “मिस हेरिटेज ऑफ इंडिया” हा राष्ट्रीय किताब पटकावला होता. आपला अभ्यासक्रम पुर्ण करतांना भारतातील वारस स्थळे, शिल्पकला, जगप्रसिध्द अंजिठा बुध्द लेण्यातील चित्रकला या अनुषंगाने देशभर ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून जागृतीचे कार्य केले. यावर्षी थायलँड येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय हेरिटेज सौंदर्यवती स्पर्धेसाठी गायत्री ही भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. तिच्या या यशाबद्दल प्रशाळेचे प्रभारी संचालक प्रा. अजय पाटील, विभागप्रमुख प्रा. राकेश रामटेके, डॉ. विजय घोरपडे, डॉ. समाधान बनसोडे आदीनी अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here