Author: Saimat

साईमत जळगाव प्रतिनिधी जळगाव जिल्हा कारागृहातील कैद्याला भेटू देण्यासाठी जेलच्या सुभेदारासह अन्य दोन महिला कर्मचार्‍यांनी दोन हजारांची लाच मागून ती प्रत्यक्ष स्वीकारल्याने त्यांना धुळे एसीबीच्या पथकाने रंगेहाथ अटक केल्याने लाचखोरांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे. हा सापळा बुधवार, 8 नोव्हेंबर रोजी दुपारी दिड वाजता यशस्वी करण्यात आला. याबाबत मिळालेली माहिती अशी की, पहूरच्या अंगणवाडीत शिक्षिका असलेल्या तक्रारदार यांचा मुलगा ३०७ च्या गुन्ह्यात संशयित आरोपी असून त्याची जळगाव जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली. मुलाला भेटण्यासाठी तक्रारदार आईकडे लाचखोर ड्युटीवरील कर्मचारी दरवेळी दोन हजारांची लाच मागत होते. तक्रारदाराची लाच द्यावयाची परीस्थिती नसल्याने त्यांनी मंगळवार, ७ रोजी धुळे एसीबीकडे तक्रार नोंदवल्यानंतर बुधवारी सापळा…

Read More

साईमत चाळीसगाव प्रतिनिधी मुंबई येथे सह्याद्री अतिथीगृहात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांच्या उपस्थितीत जलसंपदा विभागाची बैठक बुधवारी, 8 नोव्हेंबर रोजी पार पडली. बैठकीत गिरणा मन्याड नदीजोड प्रकल्प व गिरणा डावा कालवा, मन्याड उजवा कालवा काँक्रीटीकरण प्रस्ताव विषयांच्या अनुषंगाने आ.मंगेश चव्हाण यांनी मंत्र्यांचे लक्ष वेधले. अवर्षणप्रवण क्षेत्रात येणाऱ्या चाळीसगाव तालुक्यातील मन्याड प्रकल्पात यावर्षी 0 टक्के जलसाठा आहे. मन्याड प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रातील नांदगाव जिल्ह्यात माणिकपुंज प्रकल्प झाल्याने अपवाद वगळता मन्याड धरण कोरडेच राहिले आहे. त्यामुळे प्रकल्पावर विसंबून असणाऱ्या 22 हुन अधिक गावातील शेतीसिंचन व पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. यावर पर्याय म्हणून मन्याड प्रकल्पाच्या बाजूलाच असणाऱ्या…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी राज्य उत्पादन शुल्क व पोलीस विभागाने जिल्ह्यात संयुक्तपणे हातभट्टी दारू निर्मूलन मोहीम राबविण्यास सुरुवात केली आहे. मोहिमेत मंगळवारी, 7 नोव्हेंबर रोजी एकाच दिवसात 106 गुन्हे दाखल केले आहेत. त्यात 100 आरोपींना अटक केली आहे. त्यातून 27 लाख 55 हजार 555 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलीस अधीक्षक एम.राजकुमार, विभागीय उपायुक्त बी.एच.तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात हातभट्टी निर्मिती व वाहतूक करणाऱ्या विरोधात धडक मोहीम राबविण्यात येत आहे. मोहिमेत राज्य उत्पादन शुल्क विभागाचे जिल्हा अधीक्षक व्ही.टी.भुकन यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील सर्व पथके, नाशिक विभागीय भरारी पथक (कळवण) तसेच जळगाव पोलीस विभागांच्या पथकाने संयुक्तरित्या कारवाई केली. हातभट्टी निर्मूलन मोहिमेत राज्य…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी दीपस्तंभ मनोबल प्रकल्पातील दिव्यांग, अनाथ, वंचित घटकांतील विदयार्थ्यांसोबत दरवर्षी मनोबल येथे दिवाळी साजरी करण्यात येते.जे डोळ्याने प्रकाश बघू शकत नाही अश्या अंध विद्यार्थ्यांमधील ज्ञानरूपी प्रकाशाचे पूजन करण्यासाठी ‘प्रकाशपुजन’ या कार्यक्रमाचे आयोजन दरवर्षी करण्यात येते. या वर्षीही ‘प्रकाशपुजन’ कार्यक्रम मान्यवरांच्या उपस्थितीत मनोबल प्रकल्पात झाला. कार्यक्रमात दीपस्तंभ जळगाव व पुणे येथील दिव्यतेज टीम ने गायन व वादन सादरीकरण करीत सुरेल मैफल सजवली.मनोबलचे श्याम मिश्रा, आशा वरांगडे, दिव्यता अधिकारी, शेख नाझनीन, धनश्री वाघ यांनी विविध गाण्याचे सादरीकरण केले तर मानसी पाटील, ईशान नाईक, ममता नाकतोडे, उत्कर्षा गाडे यांनी नृत्य सादर केले. चैतन्य पानवलकर याने बासरी वादन तर फैयाज अत्तार याने…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी येथील रोटरी क्लब ऑफ जळगाव गोल्डसिटी तर्फे जामनेर तालुक्यातील हिंगणे बुद्रुक येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी इंडियन रेडक्रॉस सोसायटी जळगावचे सहकार्य लाभले. या शिबिरात 64 रक्त पिशव्या संकलित करण्यात आल्या. शिबिरास अध्यक्ष प्रकाश पटेल, मानद सचिव मनीष पाटील, सुनील अडवाणी, सुमित छाजेर, प्रखर मेहता जितू रावलानी, राहुल कोठारी, वेदांत मोहता यांची प्रमुख उपस्थिती होती. यशस्वीतेसाठी रोटरी गोल्डसिटीच्या सर्व सदस्यांसह ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी धुळे जिल्ह्यातील साखरी पिंपळनेर येथे मुलांच्या विभागीय शासकीय आंतरशालेय सिकाई मार्शल आर्ट स्पर्धा झाल्या. त्यात मुलांच्या १७ वर्षांतील वेदांत हिवराळे व १९ वर्षातील गटात प्रथमेश वाघ यांनी सहभाग घेतला होता.त्यात प्रथेमश ने सुवर्णपदक प्राप्त करून त्याची निवड पुढे राज्यस्तरीय स्पर्धे साठी झाली आहे.तर वेदांत हिवराळे ने कांस्यपदक मिळविले. सर्व   विजयी स्पर्धकांना पोलीस अधीक्षक एम. राज. कुमार, अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, सहायक पोलिस अधीक्षक संदीप गावित , पोलीस उपअधीक्षक गृह रामकृष्ण कुंभार, राखीव पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे ,वेल्फेअर पी.एस.आय. रेश्मा अवतारे ,रावसाहेब गायकवाड यांनी शुभेच्छा दिल्या. खेळाडूना कराटे प्रशिक्षक अश्विनी निकम-जंजाळे, जागृती काळे, राजेंद्र जंजाळे यांचे…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी क्रीडा व युवा सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा परिषद जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जळगाव जिल्हा डॉजबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने जामनेर येथे झालेल्या शालेय विभागीय डॉजबॉल स्पर्धेत स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाचा मुलींचा संघ विजयी झाला, असून सदरचा संघ राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र झाला आहे. अंतिम सामन्यांमध्ये नंदुरबार विभागाचा पराभव करून स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाचा मुलींचा संघ विजयी झाला. विजयी खेळाडूंना क्रीडा शिक्षक, प्रा.डॉ. रणजीत पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल विजयी खेळाडूंचे के.सी.ई. चे अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे, प्रशासकीय अधिकारी शशिकांत वडोदकर, कोषाध्यक्ष डी. टी. पाटील, स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. स .ना .भारंबे, उपप्राचार्य…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी के.सी.ई सोसायटीच्या कान्ह ललित कला केंद्र जळगाव आणि ओजस्विनी कला महाविद्यालय जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शालेय विद्यार्थ्यांसाठी चला किल्ला बनवूया” या एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन ए.टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात करण्यात आले होते. शालेय विद्यार्थ्यांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांच्या स्थापत्य कलेच्या रचनांबाबत महत्वपूर्ण माहिती देण्यात आली. ओजस्विनी कला महाविद्यालयातील शिल्पकार देवा सपकाळे यांनी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष मातीचा किल्ला बनवण्याचे प्रात्यक्षिक दिले. किल्ला बनवत असताना मातीचा प्रकार, बुरुज, तटबंदी, किल्ल्याचा मुख्य दरवाजा कमान यांची प्रात्यक्षिकातून माहिती दिली. शालेय विद्यार्थ्यांकडून कार्यशाळेत तोफ -रणगाडे, मावळे इ.ची प्रत्यक्ष सुबक निर्मिती करून घेण्यात आली. दिवाळीच्या सुट्टीत सहभागी विद्यार्थ्यांनी घरी किल्ला बनवण्याचे आश्वासन…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी शहरातील दिव्यांग साधना संघातील दिव्यांग बंधू – भगिनी सोबत इतर २५ दिव्यांग बांधवांना जळगाव जिल्हा मुस्लिम मनीयार बिरादरी तर्फे दिवाळीचा शिधा वाटप करण्यात आला. दिवाळी सर्व दूर आनंदाने साजरी होत असताना मुस्लिम मनीयार बीरादरिने दरवर्षीप्रमाणे यंदाही जळगाव शहरातील दिव्यांग बांधवांना दिवाळीचा शिधा वाटप केला. या प्रत्येक किट मध्ये एक किलो साखर, एक किलो रवा, दोन किलो तेल, अर्धा किलो बेसन पीठ, एक किलो गूळ, एक किलो मुगाची डाळ, एक किलो उडदाची डाळ, एक किलो तूरडाळ, खोबरेल तेलाची एक बाटली या वस्तूंचा समावेश आहे. दीव्यांग बांधवांना रथ चौक येथील मन्यार बिरादरीच्या कार्यालयात सन्मानाने दिवाळीचा शिधा वाटप करण्यात आला.…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी येथील रोटरी क्लब ऑफ जळगाव वेस्टतर्फे आयोजित राष्ट्रीय कर्करोग जनजागृती दिनानिमित्त गांधी उद्यान आणि भाऊंचे उद्यान येथे कॅन्सर तज्ञ डॉ.निलेश चांडक यांनी कर्करोगाविषयी माहिती दिली. कर्करोगासाठी घ्यावयाची काळजी, आहार , व्यायाम, पाळावयाचे पथ्य याविषयी माहिती दिली. तसेच काही कर्करोगाची प्राथमिक लक्षणं दिसत असल्यास वेळीच तपासणी करावी, जेवणात भाकरी, बाजरी , तृण धान्याचा वापर वाढवावा, असेही डॉ. चांडक यांनी सांगितले. उपस्थितांनी विचारलेल्या शंकांचे निरसन ही त्यांनी केले. यावेळी रोटरी क्लब ऑफ जळगाव वेस्टच्या अध्यक्ष सरिता खाचणे यांनी प्रास्ताविक केले. मेडिकल कमिटी चेअरमन डॉ. आनंद दशपुत्रे यांनी डॉ चांडक यांचा परिचय करून दिला तर डिस्ट्रिक्ट कॅन्सर अवेअरनेस कमिटी समन्वयक…

Read More