साईमत जळगाव प्रतिनिधी
के. सी. ई. अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन महाविद्यालयाच्या व्यवस्थापन विभागातील ४० विद्यार्थ्यांनी दिवाळी सणाच्या निमित्ताने सावखेडा, जळगाव येथील मातोश्री आनंदाश्रमाला भेट दिली.
विद्यार्थ्यांनी वर्गणी गोळा करून आनंदाश्रमात राहणाऱ्या आजी-आजोबांसाठी किराणा, लाडू, फळे भेट म्हणून दिले. विद्यार्थ्यांनी तेथील आजीआजोबांसोबत काही क्षण घालवले आणि त्यांच्याशी मनाचा संवाद साधला. त्यांचेसोबत विविध खेळ खेळलेत. तेथील आजी-आजोबांनी मनाला रंजीवणारे भजन सादर केलेत. त्यावेळी आजी आजोबांच्या चेहऱ्यावर अनमोल आनंद होता. विद्यार्थ्यांनी आपल्या या कृतीतून समाजापुढे उल्लेखनीय उदाहरण प्रस्थापित केले.