साईमत जळगाव प्रतिनिधी
जळगावच्या ग्रामदेवतेचा पारंपारिक रथोत्सव सुरू असून रथापूर्वी निघणाऱ्या वहनाला पुजण्यासाठी भाविकांमध्ये अपूर्व उत्साह दिसून येत आहे. वहनाच्या पानसुपाऱ्याची संख्या देखील वाढत आहे. ह. भ. प. मंगेश महाराज उपस्थित भक्तांना प्रसाद आशीर्वाद देत आहेत. श्री सूर्यनारायण वहनाची पानसुपारीचा कार्यक्रम बुनकर वाड्यातील जगन्नाथ सरोदे यांच्या कडे झाला.
आरोग्य व तेजाचे प्रतिक ज्याच्या रथास एकही चक्र नाही नसे आधार भूमी काही असे म्हणून ज्याची प्रार्थना केली जाते तो सूर्यनारायण, आरोग्याची देवता. श्री सूर्य नमस्कार हा शाश्वत व्यायामाचा प्रकार , सूर्य हा बुद्धीचा कारक प्रेरक होय. नित्य सूर्य स्तोत्र म्हणून ते पाणी प्राशन केल्यास नेत्र विकार दूर होतात.
प्रभू श्रीरामचंद्र ज्या वंशात अवतरले त्या वंशाचे नाव सूर्यवंश असे आहे. सात घोडे व एक चाक असणाऱ्या रथातून अरुण नावाचा सार्थ्यासह दररोज आकाशात भ्रमण करणारे सूर्यनारायण सूर्याची उपयुक्तता महत्त्व वेगळं काय सांगावं. सूर्य म्हणजे जीवन. दररोज अविरत भ्रमण करणारा लोकांवर उपकार करणारा सूर्य सर्वांना संदेश देतोय अखंड अविरत आपले कार्य कर्तव्य करा अज्ञानाचा अंधार दूर करून ज्ञानाचा प्रकाश स्वीकार करा. परंतु लक्षात ठेवा उगवत्या सूर्याला तर सारेच नमस्कार करतात परंतु मावळत्या दिनकराचे ही स्मरण ठेवावे सूर्य नारायणा सोबत श्री प्रभू रामचंद्रांचे आले आहे चला तर मग करूया स्वागत सूर्यनारायण व रामचंद्र यांचे.