साईमत जळगाव प्रतिनिधी
सहकार पणन व वस्त्र उद्योग मंत्रालयाचे प्रचार प्रसिद्धी योजनेअंतर्गत शहरात सुरू असलेल्या स्पेशल हॅन्डलूम एक्सपो 2023 चा समारोप रविवार दिनांक १९ रोजी आमदार राजूमामा भोळे यांचे हस्ते करण्यात आला.
याप्रसंगी आमदार राजूमामा भोळे यांनी शुभेच्छा व्यक्त करून शासनाने उपलब्ध करून दिलेल्या या संधीचा जळगावकरांनी फायदा घेतल्यामुळे रोजगार उपलब्ध झाला, त्याबद्दल त्यांनी प्रदर्शनाला भेट दिली व पुढील वर्षी अशा प्रकारचे प्रदर्शन जळगाव शहरात जनतेच्या सेवेसाठी आयोजन करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. याप्रसंगी भाजप प्रसिद्धी माध्यम प्रमुख मनोज भांडारकर , प्रदर्शन प्रमुख ज्ञानदेव बाभुळकर व सहभागी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.