“तो” बंधारा रद्द करण्याचा निर्णय संशयास्पद – कृती समिती

0
6

साईमत जळगाव प्रतिनिधी

गिरणा नदीवर बांभोरी गावानजीक समांतर पूल बाधातांना पुल कम बंधारा अशी कामाची मंजुरी मिळाली होती मात्र कार्यकारी अभियंता संकल्प चित्र विभाग नाशिक यांच्या पत्रावरून “तो” बंधारा शक्य नसल्याचे नमूद करत “तो” बंधारा रद्द करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे, सदरचा निर्णय संशयास्पद असल्याचा आरोप बांभोरी पुल कम बंधारा कृती समितीने केला असून बंधाऱ्यासाठी समिती पाठपुरावा करणार आहे, तर वेळ प्रसंगी आंदोलनाच्या माध्यमातून जनतेची मागणी शासनाकडे करणार असल्याची भूमिका कृती समितीने घेतली आहे.

बांभोरी पुल कम बंधारा कृती समितीने अधीक्षक अभियंता यांचे प्रतिनिधी उप अभियंता गिरीश सूर्यवंशी व जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची भेट घेऊन बांभोरी तालुका एरंडोल राष्ट्रीय महामार्ग वर गिरणा नदीच्या ठिकाणी पूल काम बंधाराचे बांधकाम होण्यासाठी प्रशासकीय मंजुरी शासन निर्णय अनुसार मिळाली होती व त्यात स्पष्टपणे पूल कम बंधारा बांधण्यासाठी मंजुरी असताना सुद्धा चारच दिवसांमध्ये कार्यकारी अभियंता संकल्पचित्र विभाग कुल यांनी त्यांच्या पत्रानुसार क्युरी काढून त्यात गिरणा नदीचा सध्याचा वेग जास्त आहे त्यामुळे या ठिकाणी पूल कम बंधारा असणे योग्य नाही असा अभिप्राय दिलेला होता व कार्यकारी अभियंता जळगाव यांना सदरबाबत पूर्तता करण्याचे आदेश दिले होते.
सदर प्रकरणी कोणत्याही प्रकारची पूर्तता न होता, तो प्रशासकीय शासन निर्णयातून बंधाऱ्याला वगळण्यात आले व पुला च्या कामाला ४० कोटीची मान्यता देऊन वर्क ऑर्डर सुद्धा देण्यात आली.

सदर बंधाऱ्या मूळे सात किलोमीटर परिसरातील शेतजमीन ओलितास येईल जमिनीत पाण्याचा जलस्तर वाढेल पर्यावरणाची हानी होणार नाही भविष्यात नदी काठावर असलेल्या सर्व गावांना पाणीपुरवठ्याची योजना अतिउत्तम प्रकारे राबवता येईल शेतकरी सुजलाम सुफलाम होती वन्य प्राण्यांचा सहवास वाढेल पशुधनाची चाऱ्याची व्यवस्था होईल तसेच बांभोरी, पाळधी, रिंगणगाव, खेडी कडोली, टाकरखेडा व विद्यापीठ, कॉलेज परिसरातील कॉलेज महाविद्यालय उद्योजक यांना मुबलक पाणी उपलब्ध होईल.

बंधारा रद्द केला म्हणून त्याचा पुन्हा समावेश करण्यात यावा व जळगाव शहर व ग्रामीण विभागाची पाण्याची टंचाई दूर करावी या मागणीसाठी निवेदन देण्यात आले.
यावेळी सरिता माळी – कोल्हे, शिवसेना जिल्हा प्रमुख तथा माजी महापौर विष्णू भंगाळे, मनसे जिल्हा प्रमुख अॅड. जमील देशपांडे, माजी नगरसेवक अनंत जोशी, फारूक शेख, आशुतोष पाटील व ललित शर्मा आदींनी अधिकाऱ्यांची भेट घेऊन चर्चा केली.
कृती समिती जळगाव जिल्ह्यातील तिन्ही मंत्र्यांसोबत बैठक घेऊन यावर पुढील रणनीती ठरवेल असे पत्र कृती समिती तर्फे फारूक शेख यांनी प्रसिद्धीला दिलेले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here