Author: Saimat

साईमत लाईव्ह यावल : तालुका प्रतिनिधी   भारतीय स्टेट बँक,आयडीबीआय बँक,पोस्टऑफिस इत्यादी सह इतर काही बँकांमध्ये बँकिंग वेळेत नेटवर्क अभावी किंवा ऑनलाईन सेवेत वरिष्ठ स्तरावरून अनेक वेळा व्यत्यय,अडचणी येत असल्याने बँकेच्या किंवा पोस्टाच्या खातेदारांना पैसे काढणे आणि भरणे या प्रक्रियेत मोठे अडथळे येत आहेत त्यामुळे बँक आणि पोस्ट खातेदारांमध्ये मोठा संताप व्यक्त करण्यात येतो. आज सकाळी तालुक्यातील साकळी गावात आयडीबीआय बँक शाखेत ऑनलाइन सेवेत काही तरी व्यत्यय आल्यामुळे बँक खातेदारांना पैसे काढणे आणि पैसे भरणा करणे साठी बँकेच्या बाहेर ताटकळत उभे राहावे लागले यामुळे साकळी गावात बँक ग्राहकांमध्ये मोठी तीव्र नाराज आहे आणि संताप व्यक्त करण्यात येत आहे.याचप्रमाणे यावल शहरात स्टेट…

Read More

मुंबई : एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत हातमिळवणी करत राज्यात सरकार स्थापन केले. उद्धव ठाकरे यांनी आम्ही लढून शिवसेना पुन्हा उभी करु, असा निर्धार व्यक्त केला असला तरी प्रत्यक्षात हे त्यांच्यासाठी मोठी कसोटीच ठरणार आहे. आगामी महानगर पालिका निवडणुकीच्या तोंडावर आता शिवसेनेला आपली ताकद वाढवण्यासाठी मोठे प्रयत्न करावे लागणार आहे. ही निवडणूक उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखालील शिवसेनेला नवसंजीवनी देईल किंवा या निवडणुकीत पराभव झाल्यास उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाची वाटचाल ऱ्हासाच्या दिशेने सुरु होईल, असे मत राजकीय स्तरावर व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंना ताकदीने मैदानात उतरावे लागणार आहे. महानगर पालिकेच्या निवडणुका सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यात होऊ शकतात. त्यामुळे या निवडणूक…

Read More

यावल : तालुका प्रतिनिधी  संपूर्ण नाशिक विभागातील जिल्ह्यांमध्ये ठिकठिकाणच्या कार्यालयातील अनेक जिल्हास्तरीय तालुकास्तरीय प्रमुख अधिकारी, कर्मचारी आपल्या मुख्यालयाच्या ठिकाणी रहात नसून अनेक अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी मुख्यालयाच्या ठिकाणी नाममात्र निवासस्थाने घर भाड्याने घेतले असले तरी प्रत्यक्ष राहण्याचे ठिकाण त्यांचे लांब अंतरावर दुसऱ्या ठिकाणी आहे म्हणजे मुख्यालया ठिकाणी न राहता शासनाकडून दरमहा घरभाडे भत्ते हडप केले जात आहे काहीनीं तर घरभाडे करार/दाखले बोगस बनावट दस्तऐवज दाखल केलेले आहेत.तरी विविध खात्याचे विभागीय आयुक्त आणि आदिवासी विभागाचे अपर आयुक्त,संबंधित जिल्हाधिकारी यांनी चौकशी समित्या नेमून मुख्यालयी राहत नसलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी संपूर्ण नाशिक विभागातून होत आहे. नाशिक विभागात प्रत्येक जिल्ह्यात एकात्मिक आदिवासी विकास…

Read More

जळगाव : प्रतिनिधी महानगरपालिका हद्दीतील पिंप्राळा शिवारातील  सावखेडा रोड जवळील सोनी नगरात अनेकांनी 9 मीटरच्या रस्त्यावर अनधिकृत सिमेंटचे ओटे बांधण्यात आली होती. याबाबत परिसरातील महिला उपमहापौर कुलभूषण पाटील यांची भेट घेऊन आपबीती सांगितले असता  उपमहापौर पाटील यांनी तात्काळ  दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना करताच त्वरित दि.30 रोजी गुरुवारी सकाळी 10 वाजता जेसिबीच्या साहाय्याने काढण्यात आले. सविस्तर वृत्त असे की, सोनी नगरात अनेकांनी 9 मीटरच्या रस्त्यावर अनधिकृत सिमेंटचे ओटे बांधण्यात आले होते त्यामुळे रस्त्यावर वाहनांची वर्दळ असल्याने वाहन चालकांना वाहन चलवितांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. तसेच येण्या-जाण्यासाठी पण जागा शिल्लक नसल्याने अनेकांना याचा त्रास होत होता.त्यामुळे  याबाबत परिसरातील महिलांनी…

Read More

मेष राशी: लोकांच्या चांगल्या कामाचा दुसर्या लोकांवर प्रभाव पडेल. तुम्ही तुमच्या नियमित कामाच्या व्यतिरिक्त काही करण्याचा प्रयत्न केलात तर तुम्हाला यश मिळेल. व्यावसायिकांसाठी दिवस निराशाजनक असू शकतो. नोकरदार लोकांसाठी आजचा दिवस सुखकर राहील. आर्थिक स्थिती चांगली राहील. आज तुम्हाला कार्यक्षेत्रात स्वतःहून लाभ मिळेल. आज ९५% नशिबाची साथ आहे. पांढर्‍या वस्तू दान करा. ​वृषभ राशी: लोकांच्या कौटुंबिक जीवनात अस्थिरता येऊ शकते. तुमचे तुमच्या पालकांशी वैचारिक मतभेद असू शकतात. प्रेमसंबंधांसाठी काळ शुभ आहे. पगारदार लोक त्यांच्या वरिष्ठांना कठोर परिश्रमाने संतुष्ट करू शकतात. नोकरी असो किंवा व्यवसाय, आज तुम्हाला चांगले यश मिळेल. कौटुंबिक सुख चांगले राहील. आज ७२% नशिबाची साथ आहे. शिवलिंगावर दूध…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री होणार, अशी घोषणा भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. आज संध्याकाळी सात वाजता एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील, अशी माहिती फडणवीसांनी दिली. देवेंद्र फडणवीस यांच्या या घोषणेने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. देवेंद्र फडणवीस स्वत: मंत्रिमंडळात सहभागी होणार नाहीत. भाजप एकनाथ शिंदे यांच्या गटाला पाठिंबा देणार आहे.

Read More

 जळगाव ः प्रतिनिधी येथील समाजसेविका व नारीशक्ती बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा मनिषा पाटील यांनी आपल्या नातीचा वाढदिवस वेगळ्या पद्धतीने साजरा करुन समाजासमोर आदर्श निर्माण केला. त्यांनी जामनेर तालुक्यातील टाकळी खुर्द येथील अंगणवाडीतील  30 जुन रोजी सहपरिवार आणि आपल्या नातीच्या हस्ते विद्यार्थी व विद्यार्थींनींना  दप्तरे वाटप केली. प्रारंभी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. बऱ्याचदा आपण असे वाढदिवस खुप मोठ्या पद्धतीने व खर्चिक पद्धतीने साजरा करतो परंतु मनिषा पाटील यांनी या लहान बालकांची गरज ओळखून मुलांना अभ्यासाची गोडी निर्माण व्हावी म्हणून त्यांना दप्तर वाटप करण्याचे ठरविले आणि समाजासमोर एक आदर्श निर्माण करून त्यांनी अशा पद्धतीने वाढदिवस साजरा करण्याबद्दल संदेशही दिला. यासाठी…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्याचे राजकारण आता वेगळ्या टप्प्यावर येऊन ठेपले आहे. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर केवळ भाजप गोटातच हालचाली वाढल्या असे नाही तर गेल्या १० दिवसांपासून राज्याबाहेर असलेले एकनाथ शिंदे हे देखील झेड सुरक्षा कवचामध्ये मुंबईत पोहचले. मात्र, ते केवळ विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि राज्यपालाची भेटच घेणार असे नाही तर देवेंद्र फडणवीस आणि शिंदे हे शपथविधी देखील उरकून घेतील अशी स्थिती आहे. आज सायंकाळी ७ वाजता शपथविधी होण्याची शक्यता आहे. त्यासाठी प्रशासनाकडून राजभवनावर जय्यत तयारी सुरू झाल्याची माहिती पुढे आली आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री तर एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. मागील १० दिवसांपासून…

Read More

पुणे : वृत्तसंस्था शिवसेनेचे प्रवक्ते व खासदार संजय राऊत मराठा समाजाविरोधात अभद्र शब्द वापरत आहेत. त्यांनी स्वत:ला आवरावे अन्यथा छावा संघटनेचे छावे त्यांना ठोकून काढतील, असा इशारा छावा संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष नानासाहेब जावळे-पाटील यांनी पुण्यात बोलताना दिला. छत्रपती संभाजीराजांना खासदारकीपासून रोखण्याचे काम शिवसेना आणि संजय राऊतांनी केले. राज्यात शेतकरी मरत आहेत आणि राऊत राजकीय पोळी भाजत आहेत.मराठा समाजाविषयी अभद्र शब्द वापरत आहेत. त्यांनी स्वत:ला आवारावे, अन्यथा संघटनेचे छावे त्यांना ठोकून काढल्याशिवाय राहणार नाहीत, असे ते म्हणालेत. राज्यातील मराठा समाजाने आपल्या न्याय्य मागण्यांसाठी लाखोच्या संख्येने मूक मोर्चा काढला. कुठेही तणाव निर्माण होऊ दिला नाही. मात्र, या मोर्चाला मुका म्हणून खासदार…

Read More

पुणे : वृत्तसंस्था सध्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे. त्यांच्यासोबत शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह पक्षाचे काही प्रमुख नेते मंत्रीपदाची शपथ घेणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. चंद्रकांत पाटील मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याने पुण्याचे पालकमंत्रीपददेखील त्यांच्याकडेच जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. फडणीस सरकारच्या आधीच्या पाच वर्षाच्या काळातील सुमारे चार वर्षे पुण्याचे विद्यमान खासदार गिरीश बापट यांच्याकडे पुण्याचे पालकमंत्रिपद होते. मात्र बापट खासदार झाल्यानंतर ही जबाबदारी चंद्रकांत पाटील यांच्याकडे सोपवण्यात आली होती. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत प्रदेशाध्यक्ष पाटील पुण्यातून कोथरूड विधानसभा मतदारसंघातून आमदार झाले. प्रदेशाध्यक्ष असले तरी आमदार या…

Read More