साईमत लाईव्ह
यावल : तालुका प्रतिनिधी
भारतीय स्टेट बँक,आयडीबीआय बँक,पोस्टऑफिस इत्यादी सह इतर काही बँकांमध्ये बँकिंग वेळेत नेटवर्क अभावी किंवा ऑनलाईन सेवेत वरिष्ठ स्तरावरून अनेक वेळा व्यत्यय,अडचणी येत असल्याने बँकेच्या किंवा पोस्टाच्या खातेदारांना पैसे काढणे आणि भरणे या प्रक्रियेत मोठे अडथळे येत आहेत त्यामुळे बँक आणि पोस्ट खातेदारांमध्ये मोठा संताप व्यक्त करण्यात येतो.
आज सकाळी तालुक्यातील साकळी गावात आयडीबीआय बँक शाखेत ऑनलाइन सेवेत काही तरी व्यत्यय आल्यामुळे बँक खातेदारांना पैसे काढणे आणि पैसे भरणा करणे साठी बँकेच्या बाहेर ताटकळत उभे राहावे लागले यामुळे साकळी गावात बँक ग्राहकांमध्ये मोठी तीव्र नाराज आहे आणि संताप व्यक्त करण्यात येत आहे.याचप्रमाणे यावल शहरात स्टेट बँकेत,यावल पोस्टात बऱ्याच वेळा ऑनलाइन सेवा बंद असते.स्टेट बँकेचे एटीएम बऱ्याच वेळेला नादुरुस्त किंवा बंद असते.स्टेट बँक यावल शाखेत ठराविक नेहमीच्या खातेदारांना व्हीआयपी वागणूक तर किरकोळ अशा खातेदारांना अपमानास्पद वागणूक दिल्याच्या अनेक तक्रारी आहेत.एटीएम मशीनवर रक्कम भरण्याची सुविधा अनेक दिवसापासून बंद आहे.स्टेट बँक शाखेत फाटलेल्या आणि खराब झालेल्या नोटा ठराविक मोठ्या उलाढाल करणाऱ्या ग्राहकांना बदलून मिळतात इतर ग्राहकांना आणि यावल पोस्ट ऑफिस मधील संबंधित कर्मचारी शासकीय भरणा करण्यास गेला असता त्यांना जुन्या फाटलेल्या नोटा बदलून मिळत नाहीत त्यामुळे यावल पोस्टात पोस्ट कर्मचारी पोस्टातील खातेदारांकडून खराब झालेल्या फाटक्या नोटा घेण्यास नकार देतात यामुळे आणि स्टेट बँकेच्या मनमानी कारभारामुळे पोस्ट खातेदारांमध्ये मोठा तीव्र संताप व्यक्त करण्यात येतो तरी याकडे भुसावळ विभाग पोस्ट ऑफिस अधिकारी वर्गाने तसेच स्टेट बँक,आयडीबीआय बँक शाखा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष केंद्रित करून आपल्या बँक खातेदारांच्या सुख सुविधांकडे तातडीने लक्ष केंद्रित करावे अन्यथा बँकेकडून आपल्या ग्राहकांना सेवा देताना कश्या आणि कोणत्या प्रकारे अडचणी येत आहेत याबाबत भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यास (आदरणीय अण्णा हजारे कृत) जळगाव जिल्हाध्यक्ष सुरेश जगन्नाथ पाटील हे आरबीआय बँक व संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे रीतसर लेखी तक्रार करणार आहेत तरी जिल्हास्तरीय बँक अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष केंद्रित करून ग्राहकांना वेळेवर सुविधा कशा मिळतील याबाबत तात्काळ कार्यवाही करावी अशी मागणी संपूर्ण यावल तालुक्यातून होत आहे.