मुंबई : वृत्तसंस्था एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री होणार, अशी घोषणा भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. आज संध्याकाळी सात वाजता एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील, अशी माहिती फडणवीसांनी दिली. देवेंद्र फडणवीस यांच्या या घोषणेने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. देवेंद्र फडणवीस स्वत: मंत्रिमंडळात सहभागी होणार नाहीत. भाजप एकनाथ शिंदे यांच्या गटाला पाठिंबा देणार आहे.
Author: Saimat
जळगाव ः प्रतिनिधी येथील समाजसेविका व नारीशक्ती बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा मनिषा पाटील यांनी आपल्या नातीचा वाढदिवस वेगळ्या पद्धतीने साजरा करुन समाजासमोर आदर्श निर्माण केला. त्यांनी जामनेर तालुक्यातील टाकळी खुर्द येथील अंगणवाडीतील 30 जुन रोजी सहपरिवार आणि आपल्या नातीच्या हस्ते विद्यार्थी व विद्यार्थींनींना दप्तरे वाटप केली. प्रारंभी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. बऱ्याचदा आपण असे वाढदिवस खुप मोठ्या पद्धतीने व खर्चिक पद्धतीने साजरा करतो परंतु मनिषा पाटील यांनी या लहान बालकांची गरज ओळखून मुलांना अभ्यासाची गोडी निर्माण व्हावी म्हणून त्यांना दप्तर वाटप करण्याचे ठरविले आणि समाजासमोर एक आदर्श निर्माण करून त्यांनी अशा पद्धतीने वाढदिवस साजरा करण्याबद्दल संदेशही दिला. यासाठी…
मुंबई : वृत्तसंस्था राज्याचे राजकारण आता वेगळ्या टप्प्यावर येऊन ठेपले आहे. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर केवळ भाजप गोटातच हालचाली वाढल्या असे नाही तर गेल्या १० दिवसांपासून राज्याबाहेर असलेले एकनाथ शिंदे हे देखील झेड सुरक्षा कवचामध्ये मुंबईत पोहचले. मात्र, ते केवळ विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि राज्यपालाची भेटच घेणार असे नाही तर देवेंद्र फडणवीस आणि शिंदे हे शपथविधी देखील उरकून घेतील अशी स्थिती आहे. आज सायंकाळी ७ वाजता शपथविधी होण्याची शक्यता आहे. त्यासाठी प्रशासनाकडून राजभवनावर जय्यत तयारी सुरू झाल्याची माहिती पुढे आली आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री तर एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. मागील १० दिवसांपासून…
पुणे : वृत्तसंस्था शिवसेनेचे प्रवक्ते व खासदार संजय राऊत मराठा समाजाविरोधात अभद्र शब्द वापरत आहेत. त्यांनी स्वत:ला आवरावे अन्यथा छावा संघटनेचे छावे त्यांना ठोकून काढतील, असा इशारा छावा संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष नानासाहेब जावळे-पाटील यांनी पुण्यात बोलताना दिला. छत्रपती संभाजीराजांना खासदारकीपासून रोखण्याचे काम शिवसेना आणि संजय राऊतांनी केले. राज्यात शेतकरी मरत आहेत आणि राऊत राजकीय पोळी भाजत आहेत.मराठा समाजाविषयी अभद्र शब्द वापरत आहेत. त्यांनी स्वत:ला आवारावे, अन्यथा संघटनेचे छावे त्यांना ठोकून काढल्याशिवाय राहणार नाहीत, असे ते म्हणालेत. राज्यातील मराठा समाजाने आपल्या न्याय्य मागण्यांसाठी लाखोच्या संख्येने मूक मोर्चा काढला. कुठेही तणाव निर्माण होऊ दिला नाही. मात्र, या मोर्चाला मुका म्हणून खासदार…
पुणे : वृत्तसंस्था सध्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे. त्यांच्यासोबत शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह पक्षाचे काही प्रमुख नेते मंत्रीपदाची शपथ घेणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. चंद्रकांत पाटील मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याने पुण्याचे पालकमंत्रीपददेखील त्यांच्याकडेच जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. फडणीस सरकारच्या आधीच्या पाच वर्षाच्या काळातील सुमारे चार वर्षे पुण्याचे विद्यमान खासदार गिरीश बापट यांच्याकडे पुण्याचे पालकमंत्रिपद होते. मात्र बापट खासदार झाल्यानंतर ही जबाबदारी चंद्रकांत पाटील यांच्याकडे सोपवण्यात आली होती. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत प्रदेशाध्यक्ष पाटील पुण्यातून कोथरूड विधानसभा मतदारसंघातून आमदार झाले. प्रदेशाध्यक्ष असले तरी आमदार या…
साईमत लाईव्ह सोयगाव तालुका प्रतिनिधी हकेला साथ आणि गरजू रुग्णांना रक्तदानासाठी हात.. टायगर ग्रुप पाचोरा तालुका अध्यक्ष पै.दिपक सिरसाठ यांचे व सदस्यांचे उल्लेखनीय कार्य पाचोरा तालुक्यात सुरू आहे. टायगर ग्रुप संस्थापक अध्यक्ष, मा.पै.जालींदर भाऊ जाधव, टायगर ग्रुप राष्ट्रीय अध्यक्ष मा.डॉ.पै.तानाजी भाऊ जाधव, खान्देश विभाग अध्यक्ष ,पै.ऋषिकेश बाबा भंडारकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच टायगर ग्रुप पाचोरा तालुका अध्यक्ष पै.दिपक भाऊ सिरसाठ यांचे व सदस्यांचे उल्लेखनीय कार्य सुरू असून संपूर्ण महाराष्ट्रभर या कार्याचे कौतुक होत असून या टायगर ग्रुपच्या प्रेरणादायी सकल्पनेचा सर्वाना आदर्श घेण्यासारखा आहे. महाराष्ट्र राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यात, तालुक्यात गावात टायगर ग्रुप नावलौकिक असून या टायगर ग्रुपकडे महाराष्ट्रातील राज्याबाहेरील युवकांना याची आवड…
मुंबई : शिवसेनेत(Shivsena) झालेल्या भूकंपानंतर मागील ८-१० दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय नाट्यावर पडदा पडला. काल अखेर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्याबरोबरच अडीच वर्षांपासून सत्तेवर असलेले महाविकास आघाडी सरकार कोसळले. ठाकरे सरकार पडल्यानंतर आता भाजपाने सरकार स्थापनेसाठी वेगवान हालचाली सुरू केल्या आहेत. या घडामोडींदरम्यान, देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. उतायचे नाही, मातायचे नाही, जनतेची काम करायचे. अडीच वर्षांनंतर स्थापन होणारे सरकार २५ वर्षे टिकेल. एक स्थिर सरकार महाराष्ट्राला देऊ, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला. काल दिवसभरात घडलेल्या अनेक घडामोडी आणि कोर्टात झालेल्या सुनावणीनंतर रात्री सुप्रीम कोर्टाने बहुमत चाचणी ठरलेल्या दिवशीच घेण्याचे आदेश दिले. त्यानंतर राज्यातील…
साईमत लाईव्ह मुंबई प्रतिनिधी : अडीच वर्षांपूर्वी राज्यात मविआचे सरकार (Mahavikas Aghadi) स्थापन झाल्यापासून, हे सरकार लवकरच पडणार असे दवे भाजपाकडून (BJP) करण्यात येत होते. पण, ते खरे ठरले नाहीत. मात्र याबाबतची केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांची भविष्यवाणी खरी ठरली. काल (29 जून) रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांनी राजीनामा दिल्याने सरकार पडले. नारायण राणे यांनी १९ एप्रिल रोजी मविआ सरकार पडण्याची डेडलाईनची सांगितली होती. “आमच्याकडे कोकणात मे अखेरीस आणि जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अनेक वादळे येतात. या वादळांत डुलणारी झाडे फांद्यांसकट मोडून पडतात. राज्यातही तीन पक्षांचे एक झाड आहे, त्याच्या फांदीवर मुख्यमंत्री बसले आहेत. ते खोडावर बसले…
साईमत लाईव्ह जळगाव प्रतिनिधी शिवसेनेतील बंडखोरीमुळे बहुमत गमावल्याने उद्धव ठाकरे यांनी काल रात्री मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. आपल्याच पक्षाचा मुख्यमंत्री असतानाही शिवसेना आमदारांनी केलेल्या बंडखोरीची राज्याच्या राजकारणाच चांगलीच चर्चा होत आहे. या बंडखोरीबाबत आता राष्ट्रवादीचे नेते आणि विधानपरिषद आमदार एकनाथ खडसे यांनी भाष्य केलं असून मोठा गौप्यस्फोटही केला आहे. भाजप आणि शिंदे गट यांची आज नव्हे तर आधीपासूनच अलिखित छुपी युती होती, असा आरोप खडसे (Eknath Khadse) यांनी केला आहे. ‘आजपर्यंतचा इतिहास आहे की एकनाथ शिंदे यांनी भाजपवर कधीही टीका केली. सरकारमध्ये असताना भाजपच्या आमदारांची कामे त्यांनी मंजूर केली. त्यामुळे त्यांचा निर्णय पूर्वीपासून भाजप सोबत जाण्याचा होता. त्याचप्रमाणे भाजपचे नेते गिरीश…