Author: Saimat

साईमत लाईव्ह मुंबई : प्रतिनिधी ठाकरे सरकाराच्या विरोधात बंडखोरी करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या गोटातील अनेक आमदार फोडत भाजपसोबत युती करत नवीन सरकार स्थापन केले. मात्र शिंदे यांना शिवसेनेविरोधातील बंडखोरी भोवली असून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यावर मोठी कारवाई केली आहे. शिंदे यांची शिवसेना नेतेपदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. उद्धव ठाकरे शिंदेंवर कारवाईसंदर्भातील पत्रकात म्हणाले की, तुम्ही पक्षविरोधी कारवाया करत आहात आणि स्वेच्छेने शिवसेनेचे सदस्यत्वही सोडले आहे. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख म्हणून माझ्याकडे असलेल्या अधिकारांचा वापर करून मी तुम्हाला पक्ष संघटनेतील ‘शिवसेना नेते’पदावरून दूर करत आहे, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी शिंदेविरोधात तोफ डागली. दरम्यान दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी…

Read More

साईमत लाईव्ह पाचोरा : प्रतिनिधी नुकतेच दिनांक २९ जून रोजी एकलव्य संघटना शाखा उद्घाटन सोहळा पाचोरा तालुक्यातील बिल्दी, सजगांव, नाईक नगर, कुऱ्हाड कुंभारखांड, कासमपूरा लोहारा ह्या गावामध्ये आज एकलव्य संघटना संस्थापक अध्यक्ष तथा प्रदेशाध्यक्ष पवनराजे सोनवणे व प्रदेश कार्याध्यक्ष सुधाकरराव वाघ यांच्या प्रमुख उपस्थिती मोठ्या उत्साहात संपन्न झाली. तसेच उपस्थित मान्यवरांनी समाज बांधवांना विविध विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी कार्यक्रमाला जळगांव लोकसभा जिल्हाध्यक्ष संजय सोनवणे, युवा जिल्हाध्यक्ष रविंद सोनवणे, रावेर लोकसभा जिल्हाध्यक्ष निवृत्ती पवार, जिल्हा कार्याध्यक्ष पिंटू गायकवाड, उपजिल्हाध्यक्ष सुरेश सोनवणे, जिल्हा संघटक पिंटू सोनवणे रावेर लोकसभा जिल्हा युवा कार्याध्यक्ष समाधान जाधव तालुकाध्यक्ष गणेश वाघ युवा तालुकाध्यक्ष गणेश नाईक तालुका उपाध्यक्षा…

Read More

साईमत लाईव्ह पिंपळगाव कमानी ता जामनेर : वार्ताहर हरित क्रांतीचे प्रणेते तसेच भूमिहीनांना सुमारे एक लाख एकर जमीन मिळवून देणारे महाराष्ट्राचे सर्वाधिक काळ पदावर असलेले मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतरावजी नाईक साहेब यांची जयंती अत्यंत उत्साहात नगरपालिका चौक जामनेर येथे साजरी करण्यात आली. यावेळी राजकीय क्षेत्रातील सामाजिक क्षेत्रातील व आध्यात्मिक क्षेत्रातील अग्रगण्य व्यक्तिमत्व हे उपस्थित होते. यावेळी विचार मांडताना सर्वांनी वसंतरावजी नाईक साहेब यांनी दाखवलेल्या मार्गावर चालण्याचा सर्वांनी प्रयत्न करावा जेणेकरून समाजाची व राज्याची तसेच पर्यायाने देशाचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही. यावेळी भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, जामनेर तालुका सोसायटीचे सचिव जितेंद्र पाटील, नगरसेवक गटनेते प्रशांत भोंडे, महेंद्र बाविस्कर, अतिश झाल्टे,…

Read More

साईमत लाईव्ह यावल :  सुरेश पाटील पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांनी काल दि.30 रोजी यावल पोलीस स्टेशनचा पदभार स्वीकारला शासकीय कामकाज करताना ते कोणत्याही बाबतीत बेशिस्तपणा खपवून घेणार नसल्याचे त्यांनी सांगितले. यावल शहरात मेन रोडवर आणि यावल भुसावल रोडवर टी पॉइंट पासून फैजपुर रोड आणि चोपडा रोडवर,बुरुज चौकापासून तहसील कार्यालय तसेच सातोद कडे जाणाऱ्या रस्त्यावर,बोरावल गेट परिसरात,सुदर्शन चित्रमंदिर भागात बेशिस्त प्रवासी व दुचाकी चार चाकी वाहनांच्या पार्किंगमुळे विरुद्ध दिशेने सुसाट वेगाने धावणाऱ्या वाहनधारकांमुळे, वाहतुकीमुळे तसेच भर रस्त्यावर आणि रस्त्याच्या आजूबाजूला झालेल्या अतिक्रमणामुळे यावलकरांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे बऱ्याच वेळेला किरकोळ भांडण तंटे होत असतात एखाद्या वेळेस कायदा व…

Read More

साईमत लाईव्ह मुंबई प्रतिनिधी : मागील १० दिवसांपासून सुरू असलेल्या सत्ता संघर्षाचा काल अखेर शेवट झाला. दहा दिवस चाललेले शिवसेनेतील राजकीय बंड, त्यानंतर आलेले ट्विस्ट या सगळ्या घडामोडीत एकनाथ शिंदे(Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीसांनी (Devendra fadnavis)शपथ घेतली. त्यानंतर कॅबिनेटची बैठक घेत काही निर्णयही घेतले. मात्र असे असले तरी कालपासून चर्चा रंगतेय ती फडणवीसांच्या नाराजीची आणि भाजपच्या (BJP) अंतर्गत वादांची. यावर भाजपचे नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी स्पष्टीकरण दिले आहे. आशिष शेलार म्हणाले, जे काही राजकीय घडामोड घडली ती राज्याच्या हितासाठी आहे. त्यानुसार पक्ष नेतृत्वाने दिलेला निर्णय देवेंद्र फडणवीस यांनी स्वीकारला आहे. त्याने मन आभाळ एवढे मोठे आहे, त्यांनी निर्णय…

Read More

साईमत लाईव्ह मुंबई प्रतिनिधी : एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या शपधविधीनंतर पहिल्याच बैठकीत शिंदे-फडणवीस सरकारने दोन मोठे निर्णय घेतले. पहिला म्हणजे मुंबईतील आरे कॉलनीत मेट्रो कारशेड बवण्याचा आणि दुसरा म्हणजे जलयुक्त शिवार योजना पुन्हा सुरू करण्याचा. हे निर्णय होताच आज पुन्हा मोठ्या घडामोडी सुरू आहेत. यातच मुंबईचे नवे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीनंतर आता वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत. शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात कोण असेल आणि कोणाला कुठली खातील मिळतील हे अद्याप निश्चित झालेलं नाही. पण मंत्रिमंडळात कुणाची वर्णी लागू शकते याच्या चर्चा मात्र रंगू…

Read More

साईमत लाईव्ह मुंबई प्रतिनिधी : महाराष्ट्राच्या राजकारणात नवा अध्याय सुरू झाला असून महाराष्ट्राचे २० वे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांनी नुकतीच शपथ घेतली. त्यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांनी ही उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. आतापर्यंत अनेक राजकीय नेत्यांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदाच्या शुभेच्छा दिल्या. आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut)यांनी शुभेच्छा देत नवा संसार सुखाने करा असे म्हटले आहे. तसेच आम्ही नव्याने स्थापन झालेल्या सरकारमध्ये अडथळे निर्माण करणार नाही. त्यामुळे त्यांनी जनतेसाठी काम करावे, असे राऊत यांनी म्हटले आहे. शिवसेना कमकुवत झाली आहे आणि नाराज आहे का, असा प्रश्न पत्रकारांनी विचारल्यावर राऊत म्हणाले, मला वाटत नाही की आमची संघटना…

Read More

साईमत लाईव्ह मुंबई प्रतिनिधी : शिवसेना (Shivsena) प्रमुख उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) मोठा धक्का देत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी भाजपसोबत हातमिळवणी करत काल रात्री मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. तर भाजप (BJP) नेते देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री पदी विराजमान झाले. हा शपथविधी सोहळा आटोपल्यानंतर सागर बंगल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट झाल्याची माहिती समोर येत आहे. या भेटीबाबत कमालीची गुप्तता बाळगण्यात आली होती. मात्र, आज सकाळी ही माहिती समोर आली आहे. माहितीनुसार, मुंडे हे गुरुवारी रात्री साडेबाराच्या सुमारास देवेंद्र फडणीवस यांच्या सागर बंगल्यावर गेले होते. याठिकाणी फडणवीस आणि धनंजय मुंडे यांच्यात साधारण…

Read More

पॅन कार्ड आणि आधार कार्ड सध्या किती महत्वाचे आहेत, हे सर्वांनाच माहिती आहे. जास्तीत जास्त ऑनलाइन कामांसाठी याचा वापर केला जात आहे. बँक किंवा नवीन डॉक्यूमेंट बनवण्यासाठी याचा वापर केला जात आहे. पॅन कार्डला आधार कार्डशी लिंक करणे बंधनकारक करण्यात आले आहे. (Linking PAN Card With Aadhaar) यासाठी ३० जून डेडलाइन ठरवली गेली होती. आता ही डेडलाइन संपली आहे. आता जर तुम्हाला पॅन कार्ड सोबत आधारला लिंक करायचे असेल तर डबल दंड भरावा लागू शकतो. सुरुवातीला यूआईडीएआय (UIDAI) ने पॅन कार्डला आधार कार्ड (Aadhar Card) शी लिंक करण्यासाठी ३१ मार्च ही तारीख ठरवली होती. नंतर ५०० रुपये दंड सोबत ३०…

Read More