साईमत लाईव्ह मुंबई प्रतिनिधी : शिवसेनेतील बंडाळीमुळे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांना मुख्यमंत्रिपदावरून पायउतार व्हावे लागले. मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांच्या गटात शिवसेनेचे (Shivsena)जवळपास सर्वच आमदार सहभागी झाल्याने महाविकास आघाडीचे सरकार अल्पमतात आले होते. त्यानंतर सर्व राजकीय परिस्थिती बघता उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा राज्यपालांकडे सोपवला. त्यामुळे आपसूकच महाविकास आघाडीचे सरकार (MVA Govt)कोसळले. तर दुसरीकडे भाजपने शिंदे गटाला सोबत घेऊन सत्ता स्थापनेसाठी हालचाली सुरू केल्या आहेत. आता राज्यात भाजपाशासित सरकार येणार हे जवळपास निश्चित मानले जात असून पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) मुख्यमंत्रिपदावर बसणार आहे. अशातच राष्ट्रवादी आणि काँग्रेसने विरोधी बाकावर बसण्याची तयारी दर्शवली आहे. राज्याच्या विधानसभेचा विरोधी पक्षनेता खरंतर ‘शॅडो मुख्यमंत्री’ म्हणून ओळखला…
Author: Saimat
साईमत लाईव्ह मुंबई प्रतिनिधी एकनाथ शिंदे यांच्यासोबत अनेक आमदारांने केलेल्या बंडखोरीमुळे सरकार अल्पमतात आले होते. या बंडखोर आमदारांमध्ये बच्चू कडू यांचाही सहभाग होता. इकडे सरकार कोसळलं अन् तिकडे बच्चू कडू यांना एका गैरव्यवहार प्रकरणी क्लीन चिट मिळाली आहे. अकोल्याचे मावळते पालकमंत्री बच्चू कडूंना तीन रस्त्यांच्या कामात गैरव्यवहार केल्याच्या प्रकरणातून क्लीनचीट मिळाली आहे.. अस्तित्वात नसलेल्या तीन रस्त्यांच्या कामात तब्बल एक कोटी 95 लाखांच्या गैरव्यवहाराचा आरोप त्यांच्यावर होता. वंचित बहूजन आघाडीच्या तक्रारीनंतर त्यांच्यावर आरोप झाले होते. हे प्रकरण कोर्टात दाखल होतं. सिटी कोतवाली पोलिसांत बच्चू कडूंवर फसवणूकीचे गुन्हे दाखल झालेले होते. संपुर्ण प्रकरणात पुरावे नसल्यानं प्रकरणच तथ्यहिन असल्याचं पोलिसांकडून स्पष्टीकरण देण्यात आले…
साईमत लाईव्ह मुंबई प्रतिनिधी गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात सुरू असलेल्या सत्तानाट्यावर अखेर पडदा पडला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतर भाजपकडून सत्तास्थापनेसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. नव्यासरकारच्या सत्तास्थापनेबाबत नवी माहिती समोर येत आहे ,फडणवीस सरकारची शपथविधी १ जुलै ला होण्याची शक्यता आहे. सुत्रांनी ही माहिती दिली आहे. आज भाजप सत्तास्थापनेचा दावा करणार आहे. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे दोन्ही नेते 1 जुलैला शपथ घेण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे यांनी बुधवारी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. याच पार्श्वभूमीवर आज सकाळी 11 वाजता सागर बंगल्यावर भाजपाची महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीला चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन,…
जळगाव : प्रतिनिधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर राज्यात सत्तांतर होणार आहे. यानंतर जळगाव महापालिकेतही सत्तांतर होण्याचे संकेत आहेत. सध्या या महापालिकेत शिवसेनेची सत्ता आहे, यात शिवसेनेचे बनखोर नेते एकनाथ शिंदे यांची मोठी भूमिका आहे. याआधी जळगाव महापालिकेत भारतीय जनता पक्षाची सत्ता होती. मात्र, शिवसेना नेतृत्वावर विश्वास ठेवत महापालिकेतील भारतीय जनता पक्षाच्या २७ नगरसेवकांनी पक्ष सोडला आणि सत्तेसाठी शिवसेनेला पाठिंबा दिला. त्यामुळे महापालिकेत शिवसेनेची सत्ता आली. जळगाव महापालिकेत सत्तातंर करण्याच्या मोहिमेचे नेतृत्व एकनाथ शिंदे यांनी केले होते. भाजपाच्या बंडखोर नगरसेवकांना एकनाथ शिंदे यांच्याकडे नेण्यात आले. त्यांनी या नगरसेवकांची हॉटेलमध्ये राहण्याची सोय केली. महापौर व उपमहापौर निवडणुकीच्या मतदानासाठी हे बंडखोर…
मुंबई : वृत्तसंस्था राज्याचे मंत्री एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर बहुमत गमावलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शक्तिपरीक्षेला सामोरे जाण्यापूर्वी बुधवारी रोजी राजीनामा दिला. महाविकास आघाडी सरकार कोसळले. यावर प्रतिक्रिया देताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमेय खोपकर यांनी “मुख्यमंत्र्यांबद्दल मनसेच्या कार्यकर्त्यांना तिळमात्र सहानुभूती नाही” असा संताप व्यक्त केला. काल रात्री साडेअकराच्या सुमारास अमेय खोपकर यांनी ट्विटरवरुन एक स्क्रीनशॉर्ट शेअर करत प्रतिक्रिया नोंदवली. खोपकर म्हणालेत “प्रत्येक प्रसंगात राज ठाकरेंचे नुकसान करणाऱ्या, राज ठाकरेंची माणसं फोडणाऱ्या, राज ठाकरेंबद्दल सतत द्वेषाचे राजकारण करणाऱ्या उद्धव ठाकरेंबद्दल आम्हाला मनसेचा महाराष्ट्र सैनिक म्हणून तिळमात्र सहानुभूती नाही.” बहुमत चाचणीसाठी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज…
साईमत लाईव्ह मुंबई प्रतिनिधी मागील आठ दिवसांपसून राज्यात सुरु असणाऱ्या सत्तासंघर्षानंतर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने शिवसेनेनं दाखल केलेली बहुमत चाचणीविरोधातील याचिकेवर सुनावणी करताना शिवसेनेविरोधात निकाल दिल्यानंतर लगेचच मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिलाय. मला मुख्यमंत्री पद सोडण्याची खंत अजिबात नाहीय, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला. यावेळी बोलताना उद्धव ठाकरेंनी, “आज मला विशेषतः शरद पवार आणि सोनिय गांधी आणि सहकाऱ्यांना धन्यवाद द्यायचे आहे. आज निर्णय घेतांना फक्त चार शिवसेनेचे मंत्री होते. बाकीचे तुम्ही जाणताच. या निर्णयाला कोणी विरोध केला नाही, सर्वांनी मान्यता दिली. ज्यांचा विरोध आहे हे भासवलं जात होतं त्यांनी पाठिंबा दिला,” असं म्हणत सहकारी…
राज्यात सुरू असलेल्या उलथापालथीमध्ये आता वेगाने घडामोडी घडू लागल्या आहेत. एकीकडे भाजपानं पहिल्यांदाच या सगळ्या वादामध्ये उडी घेत थेट राज्यपालांची भेट घेत राज्य सरकारला बहुमत सिद्ध करण्याचे आदेश देण्याची विनंती केली. त्यापाठोपाठ राज्यपालांनी ३० जूनला विश्वासदर्शक ठरावासाठी विशेष अधिवेशन पाचारण केलं आहे. मात्र, राज्य सरकार या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असल्याची भूमिका मांडण्यात आली आहे. राज्यात सत्तासंघर्ष सुरु असताना सुप्रीम कोर्टाने महत्वाचा निकाल दिला आहे. महाविकास आघाडी सरकारला उद्या बहुमत सिद्ध करावं लागणार आहे. सुप्रीम कोर्टाने शिवसेनेची याचिका फेटाळली असल्याने उद्या होणाऱ्या विश्वासदर्शक ठरावावर स्थगिती आणण्यास नकार दिला आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी बहुमत सिद्ध करण्याचा आदेश दिल्यानंतर शिवसेनेने…
साईमत लाईव्ह जळगांव प्रतिनिधी जळगाव जिल्हा पोलीस दलातील साहित्यिक, कवी, समीक्षक पोलीस नाईक विनोद अहिरे(Vinod Ahire) यांचा नुकताच ‘हुंकार वेदनेचा’ काव्यसंग्रह प्रकाशित झाला असून, विनोद अहिरे हे आपल्या खाजगी कामानिमित्त मुंबई येथे गेले असता त्यांनी मुंबईचे सह पोलीस आयुक्त कायदा-सुव्यवस्था विश्वास नागरे पाटील यांची भेट घेऊन त्यांना आपला ‘हुंकार वेदनेचा’ काव्यसंग्रह भेट दिला. नागरे पाटील यांनी काही कवितांचे अवलोकन केले असता ते अहिरेंना म्हणाले की, आपल्या कविता नुसत्याच रंजन करणाऱ्या नसून तर त्या वास्तववादी,अत्यंत मार्मिक, पोलिसांचा धैर्याचा शौर्याचा, त्यांच्या बलिदानाच्या कथा सांगणाऱ्या आहेत त्या भावी पिढीला प्रेरणा देतील. अशा शब्दात अहिरे यांचे कौतुक करून पुढील साहित्य प्रवासा साठी शुभेच्छा दिल्या.…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील पद्मालय विश्रामगृह येथील हॉटेलजवळ काहीही कारण नसताना ७ ते ८ जण हातात लोखंडे व तीक्ष्ण हत्यार घेऊन एकमेकांशी वाद घातल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील पद्मालय विश्रामगृह येथे जवळ असलेल्या हॉटेल रंगोली समोर मंगळवारी २८ जून रोजी दुपारी ३ वाजता काही कारण नसताना गणेश रवींद्र सोनवणे, अक्षय पाटील, गणेश उर्फ जग्गू सोनवणे, साबू, अण्णा राठोड, गौरव गायकवाड, दीपक सुकलाल सोनवणे, सुनील रसाल राठोड यांच्यासह इतर सात ते आठ अज्ञात व्यक्ती एकमेकांमध्ये काही कारण नसताना हातात लोखंडी व तिक्ष्ण हत्यार घेऊन वाद…
यावल : तालुका प्रतिनिधी अमळनेर येथील गौशाळेची जनसेवा आणि धार्मिक विधीयुक्त,पर्यावरण पूर्वक अग्निसंस्कार कसा करावा हे यावल येथील देशमुख वाड्यातील नागरिकांनी आज प्रथम अनुभवले. यावल येथील मोठा मारोतीची सेवा करणारे आणि मोठा मारोतीवर दृढ श्रद्धा असलेले शरद शिंदे यांची पत्नी सौ.कल्पना शरद शिंदे यांचे काल मंगळवार दि.28 रोजी दुपारी एक वाजता अचानक आलेल्या हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले. त्यांच्यावर आज सकाळी नऊ वाजता धार्मिक रितीरिवाजाप्रमाणे अंत्यसंस्कार करताना यावल येथील हिंदू स्मशानभूमीत अमळनेर येथील जनसेवा फाउंडेशन व अमळनेर गौशाळा संचालक प्रा.डॉ.अरुण कोचर, नानाभाऊ धनगर,सुयोग धनगर यांनी मुंबई येथील के.एल.झवेरी यांचे धार्मिक विचारांना प्राधान्य देत समाजहिताचे निर्णय आणि उद्दिष्टानुसार धार्मिक…