सोनी नगरातील अनधिकृत अतिक्रमण काढले

0
4
जळगाव : प्रतिनिधी
महानगरपालिका हद्दीतील पिंप्राळा शिवारातील  सावखेडा रोड जवळील सोनी नगरात अनेकांनी 9 मीटरच्या रस्त्यावर अनधिकृत सिमेंटचे ओटे बांधण्यात आली होती. याबाबत परिसरातील महिला उपमहापौर कुलभूषण पाटील यांची भेट घेऊन आपबीती सांगितले असता  उपमहापौर पाटील यांनी तात्काळ  दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना करताच त्वरित दि.30 रोजी गुरुवारी सकाळी 10 वाजता जेसिबीच्या साहाय्याने काढण्यात आले.
सविस्तर वृत्त असे की, सोनी नगरात अनेकांनी 9 मीटरच्या रस्त्यावर अनधिकृत सिमेंटचे ओटे बांधण्यात आले होते त्यामुळे रस्त्यावर वाहनांची वर्दळ असल्याने वाहन चालकांना वाहन चलवितांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. तसेच येण्या-जाण्यासाठी पण जागा शिल्लक नसल्याने अनेकांना याचा त्रास होत होता.त्यामुळे  याबाबत परिसरातील महिलांनी उपमहापौर कुलभूषण पाटील यांची भेट घेऊन आपबीती सांगितले असता  उपमहापौर पाटील यांनी तात्काळ  दखल घेत सोनी नगरातील महिलांना भेटून पाहणी केली असता उपमहापौर म्हणाले की,  9 मीटरच्या रस्त्यावर ज्यांनी ज्यांनी अतिक्रमण केले आहेत ते नियमाने काढण्यात येईल. त्यावेळी नागरिकांनी होकार दिल्यानंतर उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्यानंतर अधिकाऱ्यांनी  परिसरातील नागरिकांना दोन दिवस अगोदर प्रत्येकांना सूचना  केल्या की, आपण रस्त्यावर अतिक्रमण केले असून आम्ही जेसीबीच्या साह्याने काढणार आहे.  याबाबत कोणीही हरकत घेतली नाही. त्यानंतर  दि.30 रोजी गुरुवारी सकाळी 10 वाजता जेसिबीच्या  साहाय्याने अनधिकृत अतिक्रमण काढण्यात आले आहे. याबाबत उपमहापौर कुलभूषण पाटील व त्यांचे सहकारी दीपक पवार व जयेश सोनवणे यांचे महिलांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here