Author: Saimat

साईमत लाईव्ह जळगांव प्रतिनिधी मराठा सेवा संघातर्फे शनिवारी केरळी मंदिर परिसरातील मराठा भवनात बऱ्हाणपूरचे खासदार ज्ञानेश्वर पाटील व सुरतचे खासदार सी. आर. पाटील, मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील व चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांचा मराठा भूषण पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. मराठा सेवा संघाचे अध्यक्ष विजय घोगरे, राज्य महासचिव मधुकर मेहकरे, राज्य कार्याध्यक्ष अर्जुनराव तनपूरे, उपमहापौर कुलभूषण पाटील, माजी जि. प. अध्यक्षा रंजनाताई पाटील, प्रा.डी.डी. बच्छाव, प्रदीप पवार, अशोकराव महाले, माधुरी भदाणे, अनिल पाटील, हिरामण चव्हाण, दिनेश कदम आदी उपस्थित होते. खासदार सी. आर. पाटील यांच्यावतीने त्यांचे भाऊ अरूण पाटील यांना सन्मानित करण्यात आले. मराठा सेवा संघ प्रणित कक्षांचा घेतला आढावा…

Read More

धानोरा ता. चोपडा ः वार्ताहर येथुन जवळच असलेल्या देवगाव येथे मुख्य चौकात बंद घर पाहून चोरट्यांनी डल्ला मारल्याची घटना आज रात्री एक ते दोनच्या सुमारास घडली असून सकाळी ही घटना उघडकीस आली.त्यामुळे देवगावात खळबळ उडाली आहे. देवगाव येथील रहिवासी असलेले प्रगतशील शेतकरी प्रकाश नथ्थु महाजन हे त्यांच्या कुटूंबासह राहतात. गावात त्यांचे दोन घरे आहेत त्यापैकी एक घरबंद असते. हेच बंद असलेले घराचे कुलुप चोरट्यांनी तोडुन घरात प्रवेश केला व घरात असलेले गोदरेज कपाटाचे कुलुप तोडले. महाजन कुटुंब हे सुरत येथे आपल्या नातेवाईकांकडे गेले होते. त्यांच्या पत्नी ह्या घरी एकट्या होत्या. आज सकाळी त्या दुस़ऱ्या घरात फ्रीजमधील दुध घेण्यासाठी गेल्या असता…

Read More

अहमदाबाद : वृत्तसंस्था देशाच्या 25 राज्यांत मुसळधार पाऊस सुरू आहे. सर्वाधिक फटका गुजरातला बसला आहे. राज्यात पुरामुळे गत 24 तासांत 7 जणांचा, तर मागील 2 दिवसांत तब्बल 65 जणांचा बळी गेला आहे. अहमदाबादेत रविवारी रात्री 219 मिमी पाऊस झाला. तर सूरतसह 6 जिल्ह्यांत रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. दुसरीकडे, मध्य प्रदेश व राजस्थानात सोमवारी मुसळधार पाऊस झाला. हवामान खात्याने एमपीच्या भोपाळ, इंदूर व जबलपूरसह 33 जिल्ह्यांसाठी अलर्ट जारी केला आहे. या ठिकाणी पुढील 3 दिवस मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे. तर बिहार, झारखंड व उत्तर प्रदेशच्या काही भागांना अद्याप पावसाची प्रतीक्षा आहे. येथे 4 दिवसांत हलका ते मध्यम स्वरुपाचा…

Read More

मुंबई : प्रतिनिधी साईमत लाईव्ह राष्ट्रपती पदाची निवडणूक होत आहे. द्रौपदी मुर्मू यांच्याबाबत चर्चा झाली. प्रत्येकाचे मत समजून घेतले जात आहे. शिवसेनेची भूमिका एक ते दोन दिवसात स्पष्ट होईल. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे याबाबत निर्णय घेतील, अशी माहिती शिवसेना प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी आज दिली. त्याचवेळी त्यांनी नाराजीवर स्पष्टीकरण दिले. मला ‘सामना’त काम होते, त्यामुळे बैठक संपल्यावर मी निघून गेलो. मी नाराज नाही. मी बैठकीतून उठून गेलो, या बातम्या दिल्या ती लोक मूर्ख आहेत. अशा बातम्या देण्यासाठी एक यंत्रणा काम करतेय, असा आरोप त्यांनी यावेळी केला. आदिवासी क्षेत्रात काम करणारे अनेक कार्यकर्ते शिवसेनेत कार्यरत आहेत. त्यामुळे द्रौपदी मुर्मू यांच्याबद्दल…

Read More

मुंबईः प्रतिनिधी आरे कारशेडविरोधात केलेल्या आंदोलनात लहान मुलांचा वापर केल्याचा ठपका ठेवत राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगाने मुंबई पोलिसांना पत्र पाठवून युवा सेना नेते आदित्य ठाकरे (aaditya thackeray) यांच्यावर तातडीने कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. आयोगाकडून सोमवारी मुंबईचे पोलिस आयुक्त विवेक फणसळकर यांना याबाबत नोटीस पाठवली. त्यामुळे आदित्य ठाकरे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. नुकत्याच सत्तेवर आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारने आरेच्या जमिनीवरच कारशेड उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर या निर्णयाविरोधात पर्यावरणवादी संस्थांनी पुन्हा एकदा आरे परिसरात आंदोलन सुरू केले. आदित्य ठाकरे यांनी रविवारी या आंदोलनात सहभाग घेतला होता. यावेळी लहान मुलांचा वापर केल्याची तक्रार सह्याद्री राइट्स फोरमचे लिगल हेड दृष्टिमान जोशी…

Read More

यावल :  साईमत प्रतिनिधी लाईव्ह  दि.9रोजी यावल येथिल जे.टी. महाजन इंग्लिश स्कूल तर्फे आषाढी एकादशी निमित्त यावल शहरात भव्य दिंडी सोहळा संपन्न झाला. दिंडी सोहळ्यामध्ये विद्यार्थ्यांनी विठ्ठल रुक्मिणी संत तुकाराम, संत मुक्ताबाई,संत ज्ञानेश्वर,संत, मीराबाई अशा विविध संतांच्या वेशभुषा साकारण्यात आल्या होत्या.सोहळ्यात विठ्ठल रुक्मिणी पालखी काढण्यात आली होती. सर्व विद्यार्थी वारकरी वेशभुषेत आले होते.टाळमृदुंग व हरीनामाच्या गजरामध्ये जे.टी. महाजन शाळेपासून ते गावातील विठ्ठल रुक्मीणी मंदिरापर्यंत भव्य दिव्य दिंडी सोहळा साजरा करण्यात आला. दिंडी सोहळ्यामध्ये यावल येथिल पीएसआय खांडबहाले यांच्यासह अनेक पोलीस कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभले.त्याचप्रमाणे दिंडी सोहळ्यामध्ये शाळेच्या प्राचार्या श्रीमती पाटील मॅडम तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी दिंडी सोहळा…

Read More

यावल : प्रतिनिधी साईमत लाईव्ह रविवारी सुट्टी असल्याने सोमवार दि.11 रोजी सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मिडियम स्कूल मध्ये आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल रुक्मिणी यांची वेशभूषा परिधान करीत विद्यार्थ्यांनी आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात साजरी केली. शिक्षक शिक्षकेतेतर कर्मचाऱ्यांनी आयोजित स्तुत्य उपक्रमास विद्यार्थ्यांच्या पालकांसह विद्यार्थ्यांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.शिला तायडे मॅडम यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले व कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमात सहभागी सर्व विद्यार्थ्यांनी विठ्ठल व रुक्मिणी यांची वेशभूषा धारण केली होती.विद्यार्थी बहुसंख्येने शाळेत उपस्थित होते.तसेच त्यांच्या या वेशभूषेमुळे कार्यक्रमाला अलौकिक आणि लक्षवेधी स्वरूप प्राप्त झाले होते.काही विद्यार्थ्यांनी राम,लक्ष्मण व सिता तसेच…

Read More

साईमत लाईव्ह सोयगाव तालुका प्रतिनिधी सोयगांव येथे काही दिवसापासून वीज पुरवठा सतत खंडीत होत आहे.काही वेळा तर रात्र भर विजे अभावी रात्र अंधारात काढावी लागते. दिवसा देखील अनेकवेळा वीज गायब होत असल्यामुळे विजेवर अवलंबून असलेल्या छोटया मोठया व्यवसायावर याचा परिणाम होतो.पाऊसामुळे डास, मच्छर वाढले आहे त्यात लाईट नसल्याने त्याचा त्रास होतो. याविषयी आज नागरिकांनी महावितरण कार्यालयात जाऊ शाखा अभियंता श्री गौर यांची भेट घेऊन चर्चा केली व निवेदन दिले. लोकप्रतिनिधी व महावितरण च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यात लक्ष घालून समस्या सोडवावी अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी नगरसेवक बंटी काळे, अजित काळे, राजू दुतोंडे, पप्पू पठाडे, पूनम परदेशीं, सुधीर पठाडे,धीरज काळे,अतुल…

Read More

साईमत लाईव्ह मुंबई प्रतिनिधी आज शिवसेनेचे (Shivsena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मातोश्री येथे खासदारांची बैठक पार पडली. या बैठकीत १४ खासदार उपस्थित होते. या खासदारांनी राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये भाजपच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याची मागणी केली. अशातच या बैठीकीत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासमोरच इतर खासदार आणि संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यामध्ये चांगलीच वादावादी झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. खासदारांच्या मागणीला राऊत यांनी विरोध केल्याची माहिती मिळत आहे. मात्र मुर्मू यांना पाठिंबा देण्याबाबत सर्व खासदारांनी आपली भूमिका स्पष्टपणे बोलून दाखवली. त्यामुळे राऊत हे बैठकीनंतर कुणाशीही न बोलता मातोश्रीवरून रवाना झाले. राऊत अन्य खासदारांच्या भूमिकेवर नाराज असल्याचे सांगितले जात आहे.…

Read More