साईमत लाईव्ह जळगांव प्रतिनिधी
मराठा सेवा संघातर्फे शनिवारी केरळी मंदिर परिसरातील मराठा भवनात बऱ्हाणपूरचे खासदार ज्ञानेश्वर पाटील व सुरतचे खासदार सी. आर. पाटील, मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील व चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांचा मराठा भूषण पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
मराठा सेवा संघाचे अध्यक्ष विजय घोगरे, राज्य महासचिव मधुकर मेहकरे, राज्य कार्याध्यक्ष अर्जुनराव तनपूरे, उपमहापौर कुलभूषण पाटील, माजी जि. प. अध्यक्षा रंजनाताई पाटील, प्रा.डी.डी. बच्छाव, प्रदीप पवार, अशोकराव महाले, माधुरी भदाणे, अनिल पाटील, हिरामण चव्हाण, दिनेश कदम आदी उपस्थित होते. खासदार सी. आर. पाटील यांच्यावतीने त्यांचे भाऊ अरूण पाटील यांना सन्मानित करण्यात आले.
मराठा सेवा संघ प्रणित कक्षांचा घेतला आढावा रविवारी सकाळी 10 वाजता माता जिजाऊ यांचे प्रतिमेचे पूजन होऊन मराठा सेवा संघ प्रणित 33 कक्षांचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर दुपारी 1 वाजता नवीन इतर कक्षांची जिल्हा अध्यक्ष निवड व सभेची सांगता झाली.दुपारी 3 वाजता विविध विषयांवर चर्चा झाली.